जवाहर नवोदय विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 15:22 IST2021-11-30T15:22:13+5:302021-11-30T15:22:16+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग...

जवाहर नवोदय विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील घटना
करमाळा : मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसाहत मधील टाँयलेट मध्ये करमाळा तालुक्यातील मांगी येथील शिक्षण घेत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याने टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे.
सोमवारी (ता. २९) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. देवानंद ज्ञानेश्वर भोसले (वय 17 ) असे त्याचे नाव आहे. दरम्यान आत्महत्ये चे कारण समजलेले नाही. करमाळा तालुक्यातील मांगी येथील विद्यार्थी पोखरापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत होता. या शाळेमध्ये सुमारे ३५० मुले आहेत. त्यात २०५ मुले व 145 मुली आहेत. या सर्व मुलांची नियमित हजेरी घेतली जाते. त्यानुसार सोमवारी भोसले हा दिवसभरात हजेरीला उपस्थित होता. त्यानंतर आठ ते साडेआठपर्यंत सर्व मुले भोजनालयमध्ये जेवण करत असताना हजेरी घेतली जाते. तेथे भोसले हा विद्यार्थी अनुपस्थित होता. त्यानंतर त्याचा शोध घेतला मात्र तो विद्यार्थी कुठेही दिसला नाही. परंतु सदनामधील एका टॉयलेटचा दरवाजा बंद होता. टॉयलेटमध्ये आवाज दिला तेव्हा आतमधून कोणत्याही आवाज आला नाही. दरम्यान दरवाजा तोडून पहिले तेव्हा अनुपस्थितीत असलेला भोसले यांनी टॉयलेटच्या खिडकीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.