शेती अवजारे विक्रीचे दुकान फोडले; १८ लाखांचे ब्लोअर अन् साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:03 IST2020-06-10T11:57:31+5:302020-06-10T12:03:22+5:30
बार्शी शहरातील घटना; बंद असलेल्या दुकानाचा घेतला चोरट्यांनी फायदा

शेती अवजारे विक्रीचे दुकान फोडले; १८ लाखांचे ब्लोअर अन् साहित्य लंपास
सोलापूर : बार्शी शहरातील वेअर हाऊस रोडवरील पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केटमधील शेती अवजारे विक्रीचे दुकान फोडून १८ लाखांचे ब्लोअर व त्यासाठी लागणारे साहित्य अज्ञात चोरट्यांनीचोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत सादिक चांद शेख (वय ३५ रा़ मांगळे चाळ, बार्शी) यांनी बार्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १४ ते २७ मे या लॉकडाऊन काळात पंडीत जवाहरलाल नेहरू मार्केटमध्ये असलेले शेती अवजारे विक्रीचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले़ यातील ब्लोअर, रबरी बेल्ट, बॅटरी पंप, एसटीपी, बॅटरी पंप स्प्रे, इटालियन पंप, इटालियन जॉईन्ड, प्रेशर पाईप, ड्रागन इटालियन टँक, नोझल, पेट्रोल स्प्रे, रोटर आॅईल असा एकूण १७ लाख ८३ हजार ३६० रूपयांचा माल बंद दुकानाचे मागील बाजूस असलेले शटरचे कुलूप तोडून चोरून नेला आहे.
याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार हे करीत आहेत.