साेलापूर मतदारसंघात बाहेरचा उमेदवार नकाे, भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची भूमिका
By राकेश कदम | Updated: March 14, 2024 20:22 IST2024-03-14T20:21:41+5:302024-03-14T20:22:22+5:30
Solapur: साेलापूर लाेकसभा मतदारसंघात भाजप नेतृत्वाने स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य द्यावे. इतर जिल्ह्यातील नेत्याला उमेदवारी देउ नये, अशी भूमिका भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे.

साेलापूर मतदारसंघात बाहेरचा उमेदवार नकाे, भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची भूमिका
- राकेश कदम
साेलापूर -साेलापूर लाेकसभा मतदारसंघात भाजप नेतृत्वाने स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य द्यावे. इतर जिल्ह्यातील नेत्याला उमेदवारी देउ नये, अशी भूमिका भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे. साेलापूरच्या उमेदवारीसंदर्भात दाेन दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत चर्चा हाेईल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, भाजपचे राज्यातील २० उमेदवार जाहीर झाले आहेत. मागच्या लाेकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात साेलापूरचा उमेदवार जाहीर झाला हाेता. आताही शेवटच्या टप्प्यात उमेदवार जाहीर हाेईल असे वाटते. पण उमेदवार देताना जिल्ह्यातील नेत्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनेक लाेक इच्छूक आहेत. त्यांचाच विचार झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. साेलापूरच्या उमेदवारीबाबत अद्याप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत चर्चा झालेली नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस हे साेलापूरच्या आमदारांसाेबत चर्चा करतील. त्यानंतरच उमेदवारी जाहीर हाेईल. आम्ही आमचे मत पक्षाच्या नेत्यांना कळवणार आहाेत, असेही देशमुख म्हणाले.