भयाण वास्तव! दोन महिने हॉटेलमध्येच लटकत होता मृतदेह; मोहोळमध्ये कामगाराची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 12:23 IST2020-08-30T16:49:11+5:302020-08-31T12:23:48+5:30

हॉटेल कामगाराने लॉकडाऊनच्या काळात गावाकडे जाण्याची सोय झाली नाही तर येथे खाण्यापिण्याची ही सोय झााली नाही म्हणुन बंद असलेल्या हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली.

Baap re ...; The body had been hanging in the hotel for two months; Suicide of a worker in Mohol | भयाण वास्तव! दोन महिने हॉटेलमध्येच लटकत होता मृतदेह; मोहोळमध्ये कामगाराची आत्महत्या

भयाण वास्तव! दोन महिने हॉटेलमध्येच लटकत होता मृतदेह; मोहोळमध्ये कामगाराची आत्महत्या

मोहोळ : सोलापूर - पुणे रोडवरील मोहोळ शहरानजीक बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये हॉटेल कामगाराने लॉकडाऊनच्या काळात गावाकडे जाण्याची सोय झाली नाही तर येथे खाण्यापिण्याची ही सोय झााली नाही म्हणुन बंद असलेल्या हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना रविवारी ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आली.  मागील दोन - अडीच महिन्यापासुन मृतदेह लटकत राहिल्याने आपोपाप त्याचे मुंडके गळुन बाजुला पडल्याचे दिसून आले .

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील कन्या प्रशाला चौकातील हॉटेल रूची हे लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन बंद होते. हॉटेलच्या मूळ मालकाने हे हॉटेल इतर दोघांना चालविण्यास दिले होते. २४ मार्चपासून लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद होते. या हॉटेलात तिघे कामगार परराज्यातील होते. परंतू गावाकडे जाण्यासाठी दोन कामगारांना पास मिळाला एकास पास न मिळाल्याने तो हॉटेलमधेच राहिला होता.

लॉकडाऊनच्या काळात काही दिवस त्याने मिळेल त्या जेवनावर काढले त्यानंतर खाण्यापिण्याची सोय झाली नाही म्हणुन त्याने वैतागुन हॉटेलच्या किचनमधेच अँगलला साडी बांधुन गळफास घेतला. ही घटना ३० ऑगस्ट रोजी सकाळी आसपासच्या नागरिकांनी दुर्गधी येत असल्याची माहिती पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले असता हा प्रकार उघडकीस आला असून त्यांच्या जवळ सापडलेल्या कागदपत्रावरून त्याची ओळख पटली आहे.  त्याचे नांव कुलदिपसिंग सोलसिंग मरावी असे असून तो मध्यप्रदेशचा रहिवासी असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर. बाडीवाले, ढाकणे, व्ही.जी. माने, ए.जी बोरकर, ए.ई. जाधव तपास करीत आहेत.

Web Title: Baap re ...; The body had been hanging in the hotel for two months; Suicide of a worker in Mohol