सोलापुरातून वंचितकडून राहूल गायकवाड अन् माढ्यातून रमेश बारसकर यांनी भरला अर्ज
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: April 15, 2024 17:54 IST2024-04-15T17:52:17+5:302024-04-15T17:54:11+5:30
असंख्य कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली.

सोलापुरातून वंचितकडून राहूल गायकवाड अन् माढ्यातून रमेश बारसकर यांनी भरला अर्ज
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमदेवार राहूल काशिनाथ गायकवाड यांनी तसेच माढ्यातून रमेश नागनाथ बारसकर यांनी सोमवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. असंख्य कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरसाठी तसेच अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी माढ्यासाठी अर्ज स्वीकारला. यांच्यासोबत शिवाजी चंद्रकांत सोनवणे यांनी अपक्ष म्हणून सोलापूर मधून अर्ज भरला.
तसेच श्रीरामचंद्र मायप्पा घोटकुडे यांनी अपक्ष म्हणून माढ्यातून अर्ज दाखल केला. १९ एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून मंगळवार, १६ एप्रिल रोजी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे या अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.