माढ्यात भगदाड पाडल्यानंतर आता विजयदादांची नजर बारामतीवर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:53 PM2019-04-09T12:53:50+5:302019-04-09T12:56:28+5:30

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट

After breaking the beard, Vijayadad's eyes are now on Baramati! | माढ्यात भगदाड पाडल्यानंतर आता विजयदादांची नजर बारामतीवर..!

माढ्यात भगदाड पाडल्यानंतर आता विजयदादांची नजर बारामतीवर..!

Next
ठळक मुद्देभाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ माढा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आता बारामती मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यातचमोहिते-पाटील यांच्याप्रमाणे हर्षवर्धन पाटील हे देखील राष्ट्रवादीवर नाराज आहेत़ २०१४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून झालेला पराभव ते आजही विसरू शकलेले नाहीत

अकलूज : भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ माढा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आता बारामती मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर येथे भेट घेतली. या भेटीत काय खलबते झाली हे अस्पष्ट असले तरी माढ्यात विजयदादांनी भगदाड पाडल्यानंतर आता नजर बारामतीवर ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानलेल्या माढा लोकसभेसाठी विद्यमान खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांची पक्षाने उमेदवारी जाहीर न केल्याने रणजितसिंह मोहिते-पाटील व मोहिते-पाटील परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विरोधात माढा मतदारसंघात प्रचार सुरु केला. त्यानंतर आता खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपला प्रचार दौरा बारामतीच्या दिशेने वळविला. 

सोमवारी खा. मोहिते-पाटील यांनी सकाळी माजी सहकार राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. मागील आठवड्यात पंढरपुरात सुधाकरपंत परिचारक यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी मिळून सांगोल्याचे आ. गणपतराव देशमुख यांना भेटून चर्चा केली होती. दरम्यान, सोमवारी हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यातच आहे. 

मोहिते-पाटील यांच्याप्रमाणे हर्षवर्धन पाटील हे देखील राष्ट्रवादीवर नाराज आहेत़ २०१४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून झालेला पराभव ते आजही विसरू शकलेले नाहीत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे, तरी देखील इंदापूरची जागा कोणाकडे असेल हे निश्चित झालेले नाही़ त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांसह खुद्द शरद पवार यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज विजयसिंह मोहिते-पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. सोमवारी इंदापूर तालुक्यातील काही भागाला भेट देऊन खा. मोहिते-पाटील यांनी कुल यांचा प्रचार करीत बारामतीकरांना बारीक चिमटा काढून आपली चुणूक दाखविली आहे. दुपारनंतर खा. विजयदादांनी माढा मतदारसंघातील फलटण, कोरेगाव येथे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात सहभागी झाले.

शंकरच्या सभासदांचीही घेतली भेट
शंकरनगर-अकलूज येथील स़ म़ शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याचे इंदापूर तालुक्यातही कार्यक्षेत्र आहे़ इंदापूर तालुक्यात मोहिते-पाटील कारखान्याचे मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक सभासद आहेत़ त्यामुळे खा. विजयसिंह मोहिते-पाटील या ऊस उत्पादक शेतकºयांच्या भेटी घेतल्याची माहिती मिळते़ इंदापूर तालुक्यातील दौºयाला फार मोठे महत्त्व आल्याची चर्चा होत आहे.

Web Title: After breaking the beard, Vijayadad's eyes are now on Baramati!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.