१९ पैकी ९ लाख मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क
By Appasaheb.patil | Updated: April 23, 2019 16:36 IST2019-04-23T16:33:01+5:302019-04-23T16:36:38+5:30
माढा व फलटण विधानसभा मतदारसंघात चुरशीने मतदान सुरू

१९ पैकी ९ लाख मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क
ठळक मुद्दे- माढा लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू- माढा व फलटण मतदारसंघात चुरशीने मतदान सुरू- दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा वाढल्या
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील १९ लाख ४ हजार ४८५ मतदारांपैकी दुपारी तीन वाजेपर्यंत ८ लाख ४० हजार १२५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला.
मतदानाच्या तिसºया टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान होणार असून, त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांत माढा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
-------
दुपारी तीन वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान विधानसभानिहाय पुढीलप्रमाणे -
करमाळा - १ लाख ३३ हजार ८९३
माढा - १ लाख ५१ हजार २१२
सांगोला - १ लाख २१ हजार ९०९
माळशिरस - १ लाख ४४ हजार १२७
फलटण - १ लाख ४९ हजार ८९७
माण - १ लाख ३९ हजार ८७