Emotional Story: "महादेवा, माझ्या बाबांची दारू सुटू दे रे!" चिमुकलीचे देवाला साकडं; काळजाला भिडणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:53 IST2026-02-14T14:49:03+5:302026-02-14T14:53:01+5:30

Emotional Story: अलिगडमधील ९ वर्षांच्या या चिमुकलीने खांद्यावर कावड उचलली, ती कोणत्याही हट्टासाठी नाही तर आपल्या उद्ध्वस्त होणाऱ्या घराला वाचवण्यासाठी. दिल्लीहून अलिगडला आपल्या आजी-आजोबांकडे आलेल्या या मुलीने महादेवाच्या मंदिरात एकच आर्त साकडे घातले.

Emotional Story: 9-Year-Old Girl Carries Kanwar to Lord Shiva, Praying for Father to Quit Alcohol | Emotional Story: "महादेवा, माझ्या बाबांची दारू सुटू दे रे!" चिमुकलीचे देवाला साकडं; काळजाला भिडणारी कहाणी

Emotional Story: "महादेवा, माझ्या बाबांची दारू सुटू दे रे!" चिमुकलीचे देवाला साकडं; काळजाला भिडणारी कहाणी

लहान मुलांना सणासुदीला खेळणी, नवीन कपडे किंवा मोबाईल हवा असतो. पण अलिगडच्या गंभीरपुरा परिसरात एका ९ वर्षांच्या चिमुकलीने देवाकडे जे मागितले, ते पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. आपल्या वडिलांचे दारूचे व्यसन सुटावे आणि घरात रोज होणारी भांडणे थांबावीत, या एकाच आर्त इच्छेपोटी या चिमुकलीने खांद्यावर कावड घेऊन महादेवाच्या मंदिरात हजेरी लावली.

मूळची दिल्लीची असलेली ही मुलगी अलिगडला आपल्या आजी-आजोबांकडे आली आहे. तिचे वडील दारूच्या आहारी गेल्यामुळे घरात रोज वाद आणि मारामारी होते. या घरगुती कलहाचा तिच्या कोवळ्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. वडिलांच्या व्यसनामुळे वैतागलेल्या या मुलीने श्रावणाच्या पवित्र महिन्यात तिने कावड यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.
 
कावड घेऊन मंदिरात पोहोचलेल्या या चिमुकलीच्या डोळ्यात अश्रू होते. तिने हात जोडून प्रार्थना केली की, "महादेवा, माझ्या बाबांची दारू सुटू दे, ते दारू पिऊन आल्यावर घरात खूप भांडतात. मला शांतता हवी आहे." तिच्या या निष्पाप प्रार्थनेने मंदिरातील भाविकही स्तब्ध झाले. तिला पूर्ण विश्वास आहे की महादेव तिचे नक्की ऐकेल आणि तिचे वडील दारू सोडतील.

दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात, हे आपण अनेकदा पाहिले किंवा वाचले वाचतो. परंतु, या चिमुकलीनं उचललेली कावड ही त्या वेदनेचे जिवंत उदाहरण ठरले आहे. थकलेल्या चेहऱ्यावर आशेचा किरण घेऊन चालणाऱ्या या मुलीची ही यात्रा केवळ धार्मिक नसून, ती व्यसनाधीनतेच्या विरोधात एका लहान मुलाने दिलेला मोठा संदेश आहे.

Web Title : छोटी बच्ची की प्रार्थना: 'महादेव, मेरे पिता की शराब छुड़ा दो!'

Web Summary : अलीगढ़ की एक नौ वर्षीय बच्ची, अपने पिता की शराब की लत और घरेलू झगड़ों से परेशान होकर, 'कावड़' लेकर तीर्थयात्रा पर निकली। उसने भगवान महादेव से अपने पिता की लत छुड़ाने और अपने परिवार में शांति लाने की प्रार्थना की, जिससे उसकी मासूम गुहार से भक्त भावुक हो गए।

Web Title : Little Girl's Prayer: 'Mahadev, Make My Father Quit Alcohol!'

Web Summary : A nine-year-old girl from Aligarh, burdened by her father's alcoholism and domestic disputes, undertook a pilgrimage carrying a 'kawad'. She prayed to Lord Mahadev to end her father's addiction and bring peace to her family, moving devotees with her innocent plea.

टॅग्स :aligarh-pcअलीगढ