Shivaji Maharaj Statue Collapse: डॉ. चेतन पाटील याचा जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 11:54 IST2024-09-20T11:54:10+5:302024-09-20T11:54:53+5:30
मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. चेतन पाटील याचा जामीन अर्ज ...

Shivaji Maharaj Statue Collapse: डॉ. चेतन पाटील याचा जामीन अर्ज फेटाळला
मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. चेतन पाटील याचा जामीन अर्ज गुरुवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळला.
सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला चेतन पाटील याने जामिनासाठी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. पक्षाची बाजू जाणून घेतल्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी चेतन पाटील याचा जामीन अर्ज फेटाळला. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी, रूपेश देसाई यांनी काम पाहिले.