जनता फसव्या कुटनितीला भिक घालणार नाही, विनायक राऊतांचा घणाघात
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 24, 2024 17:58 IST2024-04-24T17:57:43+5:302024-04-24T17:58:14+5:30
संतोष पाटणकर खारेपाटण : केंद्रसरकार भारतीय लोकशाही स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम करत आहेत. परंतु हे रोखण्याची ताकद आम्हाला भारतीय ...

जनता फसव्या कुटनितीला भिक घालणार नाही, विनायक राऊतांचा घणाघात
संतोष पाटणकर
खारेपाटण : केंद्रसरकार भारतीय लोकशाही स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम करत आहेत. परंतु हे रोखण्याची ताकद आम्हाला भारतीय संविधानाने दिली आहे. देशातील जनता आता त्यांच्या या फसव्या कुटनीतीला भिक घालणार नाही. असे मत रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राउत यांनी खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या महविकास आघाडीच्या कॉर्नर सभेत केली.
खारेपाटण शिवसेना शाखा कार्यालयाजवळ महाविकास आघाडीची सभा झाली.यावेळी शिवसेना उपनेत्या संजना घाडी, गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर,अल्पसंख्यक समाजाचे प्रतिनिधी रज्जाकभाई रमदुल, सामाजिक कार्यकर्ते संदीप कदम, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव,युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक,कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे आदी उपस्थित होते.