चालकाचा ताबा सुटल्याने इन्सुलीत कारला अपघात ; प्रवासी सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 12:07 IST2021-04-09T12:06:04+5:302021-04-09T12:07:26+5:30

Accident Highway Sindhudurg- मुंबई गोवा जुन्या महामार्गावरील इन्सुली ग्रामपंचायत कार्यालयासमोर भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पलटी होऊन अपघातग्रस्त झाली. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

Insulin car accident due to driver's loss of control; Fortunately, all the passengers were safe | चालकाचा ताबा सुटल्याने इन्सुलीत कारला अपघात ; प्रवासी सुखरूप

चालकाचा ताबा सुटल्याने इन्सुलीत कारला अपघात ; प्रवासी सुखरूप

ठळक मुद्देचालकाचा ताबा सुटल्याने इन्सुलीत कारला अपघात सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

बांदा : मुंबई गोवा जुन्या महामार्गावरील इन्सुली ग्रामपंचायत कार्यालयासमोर भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पलटी होऊन अपघातग्रस्त झाली. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

सावंतवाडीहून बांद्याच्या दिशेने जात असताना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुसाट वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यालगतच्या चरात जाऊन अपघातग्रस्त झाली. सुदैवाने कार बाजूच्या दगडी भिंतीला न आदळल्याने मोठा अनर्थ टळला. कार मधील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणालाही दुखापत झाली नाही.

Web Title: Insulin car accident due to driver's loss of control; Fortunately, all the passengers were safe