
सखी: ChatGPT च्या नादी लागणं पडलं महागात, झाला जीवाशी खेळ
ChatGPT ला सल्ले विचारुन त्याप्रमाणे वागणं आता नवीन राहिलेलं नाही. पण आपले आजार-उपचार यासाठी डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे न जाता वॉरेन टियर नावाच्या गृहस्थांनी चाटजीपीटीच्या सल्ल्याने आपल्या आजाराकडे काहीसं दुर्लक्ष केलं आणि पुढे स्टेज फोर कॅन्सरचं निदान झालं..

आंतरराष्ट्रीय: ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात निदर्शने; हजारो नागरिक रस्त्यावर उतरले, कारण काय?
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले, या रॅलीत 'ऑस्ट्रेलिया फर्स्ट' च्या घोषणा देण्यात आल्या आणि स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मागणी करण्यात आली. प्रचार साहित्यात भारतीय स्थलांतरितांना लक्ष्य केले. निदर्शनांमुळे तणाव वाढला, सरकारने या रॅलीचा निषेध नोंदवला आणि सामाजिक एकतेचे आवाहन केले. ही रॅली सिडनी, मेलबर्न, कॅनबरा यासह अनेक राजधानी शहरांमध्ये झाली ज्यात मुख्यतः भारतीय स्थलांतरितांना लक्ष्य करण्यात आले.

महाराष्ट्र: राज ठाकरेंच्या टीकेला शिंदेंचं सडेतोड उत्तर; 'आधी माहिती घ्यायला हवी होती...'
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मराठा आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धारेवर धरले होते. यावर शिंदेंनी पलटवार करत मराठा आरक्षण कुणामुळे गेले त्यांना राज ठाकरेंनी प्रश्न विचारायला हवा होता. आम्ही मराठा समाजाला १०% आरक्षण दिले, कुणबी नोंदी शोधल्या, नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली. पण आधीच्या सरकारने काय केले? असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

आंतरराष्ट्रीय: रशिया, चीन ब्रिक्सची ताकद वाढवणार; पुतिन यांचा अमेरिकेवर निशाणा!
चीनच्या सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआला दिलेल्या मुलाखतीत पुतिन म्हणाले, 'ब्रिक्स देशांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात अडथळा आणणाऱ्या भेदभावपूर्ण निर्बंधांविरुद्ध रशिया आणि चीनने एक समान भूमिका घेतली आहे. रशिया आणि चीन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी संयुक्तपणे संसाधने एकत्रित करत आहेत आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ब्रिक्स संघटनेची ताकद वाढवण्यासाठी काम करत आहेत. '

महाराष्ट्र: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठकीत काय झाला निर्णय?
सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणापत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या मागण्यांबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली. मागण्यांवर निर्णय घेताना आणि घेतल्यानंतर कायदेशीर पेच निर्माण होऊन नये म्हणून राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेण्याचे ठरले.

मुंबई: मराठा आरक्षण: आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, संतप्त घोषणाबाजी!
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर त्यांची भेट घेतली. आंदोलकांनी 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत शरद पवारांविरोधात घोषणाबाजी केली.

मुंबई: सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाल्या, 'मी आयुक्तांशी बोलते'
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी (३१ ऑगस्ट) मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली. त्यांना इलेक्ट्रॉल घेण्याची विनंतीही केली. यातून आपण सगळे मार्ग काढू असेही त्या जरांगे यांना म्हणाल्या.

मुंबई: मराठा आरक्षण: 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे पवारांनी जाहीर करावं': विखे-पाटील
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विखे-पाटलांनी पवारांवर टीका केली. सत्तेत असताना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण का दिलं नाही? राजकीय स्वार्थासाठी पवारांचे प्रयत्न असल्याचा आरोप विखे-पाटलांनी केला.

राष्ट्रीय: भाजपच्या माजी आमदारासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण
भाजपचे माजी आमदार नलिन कोटडिया, अमरेलीचे माजी पोलीस अधीक्षक जगदीश पटेल, माजी पोलीस निरीक्षक अनंत पटेल यांच्यासह १४ जणांना दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अहमदाबाद शहर लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. २०१८ मध्ये एका बिल्डरचे अपहरण करून बिटकॉइन लुटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने माजी आमदारासह १४ जणांना दोषी ठरवले.

राष्ट्रीय: PM मोदींच्या चीन दौऱ्यावर काँग्रेसचा हल्ला; क्लीन चिट दिल्याची टीका!
पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यावर काँग्रेसने बोचरी टीका केली आहे. गलवानमधील शहीदांना विसरून मोदींनी चीनच्या अध्यक्षांशी हस्तांदोलन केले, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे. तसेच, त्यांनी गलवानसाठी चीननला क्लीन चिट दिल्याची टीकाही केली.

महाराष्ट्र: "मराठा जातीने मागास नाहीत, कोर्टात अडकवायचं आहे का?", चंद्रकांत पाटलांचा जरांगेंना सवाल
सर्व मराठा समाजाला कुणबी करणे कायद्यात बसत नाही. मराठा समाज हात जातीने मागास नाहीये. त्यांना दलितांसारखी वागणूक मिळालेली नाही. त्यांना गावाबाहेर रहा, स्पर्श करू नको, अशी वागणूक मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना सामाजिक आरक्षण देता येत नाही. आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचं आरक्षणच देता येऊ शकते, अशी भूमिका कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर मांडली.

मुंबई: ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक; उद्यापासून जलत्याग करणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही. उद्यापासून पाणी त्यागून उपोषण सुरू करणार. येत्या शनिवारी-रविवारी मुंबईत एकही मराठा घरात थांबणार नाही. सर्वांनी शांततेत आंदोलन करायचे. मुख्यमंत्र्यांनी याला गर्दी समजू नये तर समाजाची वेदना समजावी. आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी शांतता राखायची. काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रीय: इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात; सोमवारी सुनावणी!
इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP-20) चा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. वाहन मालकांना अयोग्य इंधन वापरण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. याप्रकरणी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी होणार आहे.

नागपूर: नागपूर: गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय घडले?
एंजेल जॉन या दहावीत शिकत असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा खून करण्यात आला. ज्याने खून केला तो अल्पवयीन आरोपी आणि मुलगी रिलेशनमध्ये होते. त्यातून दोघांमध्ये बिनसले आणि खून करून अल्पवयीन आरोपी फरार झाला होता. गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी आरोपीने चाकू ऑनलाईन खरेदी केला होता.

क्राइम: ईडीचा छापा: कोट्यवधींचे दागिने, पोर्श, BMW सह १० लग्झरी कार, रोकड जप्त
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे ईडीने २ ठिकाणी छापेमारी केली. या धाडी शक्तिरंजन दास यांच्या घरी आणि त्यांच्या कंपन्या अनमोल माइन्स प्रायव्हेट लिमिटेड, अनमोल रिसोर्सेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयात टाकण्यात आल्या. यात १० लग्झरी कार, ३ सुपरबाइक्स ज्यांची किंमत ७ कोटींहून अधिक आहे. पोर्श केयेन, मर्सिडिज बेंज जीएलसी, बीएमडब्ल्यू एक्स ७, ऑडी ए ३, होंडा गोल्ड विंग बाइक जप्त करण्यात आल्या.

रत्नागिरी: रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
बेपत्ता असलेल्या भक्ती मयेकरच्या हत्येच्या घटनेने रत्नागिरी हादरली. भक्ती आणि दुर्वास पाटील यांचे प्रेमसंबंध होते आणि ती गर्भवती होती. भक्तीचा शोध घेत असताना पोलिसांना तिच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन खंडाळा असल्याची माहिती मिळाली. तिथे तिचा प्रियकर दुर्वास राहत असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.

राष्ट्रीय: एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन लँडिंग, हवेत इंजिनला आग, प्रवासी सुखरूप
दिल्ली-इंदूर एअर इंडिया विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. वैमानिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. प्रवाशांची गैरसोय झाली. एअर इंडियाच्या विमानात वारंवार बिघाड होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई: आरक्षणावरुन पवारांच्या सल्ल्यावर अजितदादा म्हणाले, '१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका!'
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी सरकारला सल्ला दिल्यानंतर अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'ते १० वर्षे सत्तेत होते, त्यामुळे आम्हाला खोलात जायला लावू नका,' असं अजितदादा म्हणाले. मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी मुंबईत उपोषण करत आहेत.

आंतरराष्ट्रीय: नवा 'ट्विस्ट'! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांचे नामांकन?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर मेलानिया ट्रम्प यांच्या नावाची नोबेल शांतता पुरस्कारासाठी चर्चा रंगली आहे. युक्रेन युद्धातील शांतता प्रयत्नांसाठी मेलानिया यांना नामांकन मिळण्याची शक्यता आहे, असा फ्लोरिडा रिपब्लिकनचा दावा आहे. मेलानिया यांनी पुतिन यांना पत्र लिहून युद्धामुळे होरपळ होणाऱ्या मुलांच्या संरक्षणाची मागणी केली होती.

मुंबई: मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द!
गणेशोत्सवासह मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्याना तातडीने हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय: GST सुधारणांना विरोधकांचा पाठिंबा, पण 'या' आहेत महत्वाच्या मागण्या!
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना आठ विरोधी पक्षांच्या राज्यांचा पाठिंबा आहे. मात्र, GST दर कपातीचा फायदा ग्राहकांना मिळावा, राज्यांना नुकसान भरपाई मिळावी, 'पाप' वस्तूंवरील शुल्क राज्यांना मिळावे, अशा महत्वाच्या मागण्या विरोधकांनी केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय: क्वाड परिषदेसाठी ट्रम्प भारतात येणार?
वर्षाच्या अखेरीस भारतात क्वाड शिखर परिषदेचे आयोजन होत आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या परिषदेत सहभागी होणार नाहीत, असा दावा द न्यू यॉर्क टाईम्सने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संबंध कसे बिघडले, याची सविस्तर माहितीही त्यात देण्यात आली आहे.

मुंबई: ब्रेकिंग: मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला मुदतवाढ
मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचे आंदोलन मुंबईत सुरू आहे. आझाद मैदानावर आंदोलनाला आणखी एक दिवसाची परवानगी मिळाली आहे.राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय: 'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात ते म्हणताना दिसत आहे की, पाकिस्तानात जो पूर आला आहे, तो भारताने धरणांमधून पाणी सोडल्यामुळे आला आहे. पण, मूळात डोनाल्ड ट्रम्प असं बोललेच नाहीत. मूळ व्हिडीओसोबत छेडछाड करून हा डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

मुंबई: मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनात लातूरच्या विजय घोगरे या मराठा तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते आंदोलनात सहभागी झाले होते.

महाराष्ट्र: अमित शाहांच्या विमानात बिघाड; एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानात शनिवारी(दि.30) अचानक तांत्रिक बिघाड झाला. गृहमंत्री शाह दोन दिवसांचा मुंबई दौरा आटोपून गुजरातला रवाना होत असताना ही घटना घडली. विमानातील तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पुढे आले अन् गृहमंत्र्यांना त्यांचे विमान उपलब्ध करून दिले.

मुंबई: मनोज जरांगेंना अटक करा, सदावर्तेंचा हल्लाबोल, पवार-ठाकरेंवरही संतापले
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. सदावर्ते यांनी जरांगे यांचे हे आंदोलन फक्त आंदोलन नसून पवित्र आझाद मैदानाला लांच्छन लावणारे आहे अशी टीका केली. त्याशिवाय अत्यंत खालच्या शब्दात जरांगे यांनी धनगर समाजाबाबत अपशब्द वापरले. जरांगेंची भाषा गावगड्याची नसून नीचपणाची आणि मुजोरपणाची आहे. त्यांना अटक करा अशी मागणी केली

राष्ट्रीय: 'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर ठोकला दावा
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या 'मतदार यात्रे'निमित्ताने बिहारचा दौरा करत आहेत. राजद नेते तेजस्वी यादवदेखील त्यांच्यासोबत आहेत. दरम्यान, शनिवारी(दि.३०) ही यात्रा आरा येथे मतदार हक्क यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात तेजस्वी यादव यांनी राहुल गांधींसमोर स्वतःला महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले.

राष्ट्रीय: जम्मू-काश्मीर भूस्खलन: आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात भूस्खलनात एकाच कुटुंबातील ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये आई-वडील आणि त्यांच्या ५ मुलांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील सात जणांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्र: सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी, जरांगे पाटील संतापले; उपोषण सुरूच राहणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. न्या. शिंदे हे जरांगेंसोबत चर्चेसाठी उपोषणस्थळी पोहचले होते. मात्र सरकारसोबतची ही पहिली बैठक निष्फळ ठरली. 'मराठा आणि कुणबी एकच' असा GR काढा, अन्यथा उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. आम्हाला ६ महिन्याचा वेळ द्या, प्रक्रियेसाठी वेळ लागेल तो द्यावा अशी मागणी शिंदे समितीने केली होती

नागपूर: नागपूर: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!
एकतर्फी प्रेमात आंधळ्या झालेल्या अल्पवयीन नराधमाने एंजेलची भररस्त्यात हत्या केली. बेसावध क्षणी तिला भर रस्त्यावर गाठत त्याने तिची हत्या केली. एंजेल जॉन या दहावीतील विद्यार्थिनीला शुक्रवारी (२९ ऑगस्ट) सकाळी तिच्या आईने तिला शाळेत सोडले. मात्र, दुपारी तिला घ्यायला जाणे कुणालाही जमले नाही. आणि आरोपीने एंजेलला गाठलं.