
पुणे: ‘बालभारती’ची पुस्तके अशी बनवा की मुलांना मोबाइल नको वाटेल: दादा भुसे
‘आज मोबाइल, टीव्ही, ‘एआय’सारख्या आधुनिक माध्यमांच्या आकर्षणामुळे मुलांची नाळ आपल्या संस्कृतीशी आणि मातीतील मूल्यांशी तुटत चालली आहे. अगदी अडीच-तीन वर्षांच्या मुलालाही जेवण करताना मोबाइलवरील कार्टून दाखवल्याशिवाय जेवण जात नाही. हीच स्थिती बदलायची आहे, अशी अपेक्षा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय: कितीही दबाव टाका, आम्ही..; ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
अहमदाबादमधील कार्यक्रमात ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर भाष्य करताना पीएम मोदी म्हणाले, आमच्यासाठी शेतकरी, पशुपालक, लघुउद्योजक महत्त्वाचे आहे. अमेरिकेने कितीही दबाव टाकला तरी, आम्ही आमची ताकत वाढवण्याचे काम करत राहू. आमच्यासाठी देशातील शेतकरी आणि पशुपालकांचे हित सरकारसाठी सर्वोपरी आहे.

महाराष्ट्र: मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकरांनी नितेश राणेंसोबतच्या भेटीबद्दल सोडलं मौन
वैभव खेडेकर यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाकडून अचानक करण्यात आलेल्या कारवाईनंतर खेडेकर यांनी भूमिका मांडली. भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नव्हता. नितेश राणेंची भेट एका कार्यकर्त्यावरील तडीपारीची कारवाई थांबवण्यासाठी घेतली होती, असे खेडेकर म्हणाले.

राष्ट्रीय: कार चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने क्रिकेटरचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये रस्ते अपघातात क्रिकेटर फरीद हुसेनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका कार चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने फरीदची स्कूटर धडकली. फरीदला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना पूंछ जिल्ह्यात घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आंतरराष्ट्रीय: भारताने मोठे मन दाखवत पाकिस्तानला दिला पुराचा इशारा
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले, मात्र आता पाकिस्तानमधील नागरिकांसाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. भारताने जम्मू-काश्मीरमधील संभाव्य पुराबाबत पाकिस्तानला माहिती दिली आणि सतर्क केले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही माहिती पूर्णपणे मानवतेच्या आधारावर शेअर करण्यात आली आहे.

क्रिकेट: ५०० विकेट्स अन् ७००० धावांसह शाकिब अल हसनचा विश्वविक्रम
शाकिब अल हसनने टी २० मध्ये ५०० विकेट्स आणि ७००० धावांसह विश्व विक्रमाला गवसणी घालत इतिहास रचला आहे. कॅरेबियन लीगमध्ये त्याने ५०० विकेट्सचा टप्पा पार केला.

राष्ट्रीय: पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
दिल्ली उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री सार्वजनिक करण्याचा सीआयसीचा आदेश रद्द केला आहे. शैक्षणिक नोंदी आणि डिग्रीचा खुलासा करणे बंधनकारक नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. सीआयसीने यापूर्वी दिल्ली विद्यापीठाला डिग्री सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. यानंतर, विद्यापीठाने या आदेशाला आव्हान दिले होते.

मुंबई: मुंबई: मरीन ड्राइव्ह जवळील समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह
मुंबईतील मरीन ड्राईव्हवरील नरिमन पॉईंटजवळ समुद्रात एका तरुणीचा मृतदेह आढळला. कफ परेड पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मनिता गुप्ता असे तरुणीचे नाव असून, ती २४ वर्षांची आहे, असे पोलिसांनी सांगितले. ती रविवारपासून बेपत्ता होती.

महाराष्ट्र: फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ छाटू; नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ छाटू असा नितेश राणेंनी मनोज जरांगेंना इशारा दिला. जरांगेंनी आरक्षणाची लढाई लढावी. मात्र ही लढाई लढताना आमच्या फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल, तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्यासारख्या ९६ कुळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे असं त्यांनी इशारा दिला. मनोज जरांगे यांनी बीडच्या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती.

सखी: रात्री वारंवार तहान लागून जाग येते का?
झोपेत अचानक घशाला कोरड पडते, पाणी प्यावंसं वाटतं? वारंवार तहान लागते? झोप पूर्ण होत नाही, थकवा जाणवतो, या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. घोटभर पाणी पिऊन पुन्हा झोप तर लागते पण असा त्रास म्हणजे तब्येतीचं गणित बिघडल्याचं लक्षण आहे. तुम्ही एकदा तुमची शुगर तपासायलाच हवी कारण गडबड असूच शकते.

सखी: मऊ रेशमी सुंदर केसांसाठी सोपा उपाय
सध्या तर सर्वत्र हेअर लॉस अवेअरनेस मंथ साजरा होतो. केस गळण्याची समस्या जगभर आहे. सगळ्यांनाच वाटतं आपले केस सिल्की शायनी असावे? विकतच्या केमिकल उपायांपेक्षा हा घरगुती उपाय असरदार. खोबरेल तेलात कडीपत्ता, दूध आणि केळी कालवून लावल्यास केसांवर होते जादू. पाहा नेमके लावायचे कसे..

राष्ट्रीय: ईडीचा छापा, आमदार भिंतीवरून उडी मारून पळाले, फोन नाल्यात, अटक!
शिक्षक भरती घोटाळ्यात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्ण साहा यांना ईडीने अटक केली. छाप्यादरम्यान आमदार भिंतीवरून उडी मारून पळाले, फोन नाल्यात फेकला. न्यायालयाने भरतीतील अनियमिततांच्या चौकशीचे आदेश दिले होते.

जालना: सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारंगे यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबई नारा दिला आहे. त्यांनी मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी, चालक, वारकरी यांनीही मोर्च्यात सहभागी व्हावे. तसेच, पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिकाही सोबत आणाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी मराठा बांधवांना केले.

महाराष्ट्र: खेडचे माजी नगराध्यक्ष खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून बडतर्फ केले आहे. खेडेकर भाजपात जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान ही कारवाई झाली आहे. मनसेच्या स्थापनेपासून वैभव खेडेकर पक्षात कार्यरत होते. २०१४ साली त्यांनी दापोली विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

व्यापार: सोन्यात मोठी वाढ, चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा नवे दर
आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात बंपर तेजी दिसून आली. तर चांदीचा दर २६२७ रुपयांनी वाढून ११६५३३ रुपये प्रति किलो झाला आहे. पाहा काय आहेत सोन्या चांदीचे लेटेस्ट दर.

महाराष्ट्र: मनसेला मोठा धक्का! राज ठाकरेंच्या अत्यंत जवळचा सहकारी भाजपाच्या वाटेवर?
मनसे नेते वैभव खेडेकर भाजपात जाण्याची चर्चा आहे. पक्षातील नाराजीनंतर मनसे नेत्यांनी खेडेकरांच्या मनधरणीचा प्रयत्न केला, मात्र आता वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर अशी त्यांच्या मतदारसंघात चर्चा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मनसेची सत्ता आणण्यात खेडेकरांचा मोठा वाटा होता. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे मनसेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. वैभव खेडेकर हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत काम करत आहेत.

भक्ती: गणेश चतुर्थी २०२५: शुभ मुहूर्त, राहु काळ आणि चंद्रास्ताची वेळ
यंदा २०२५ मध्ये २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. या दिवशी पार्थिव गणपती पूजन केले जाणार आहे. चतुर्थी प्रारंभ २६ ऑगस्टला दुपारी ०१.५४ मिनिटांनी होणार असून, चतुर्थी समाप्ती २७ ऑगस्टला दुपारी ०३.४३ मिनिटांनी होणार आहे. मध्यान्हकाल सकाळी ११.२५ ते दुपारी १.५४पर्यंत आहे. तर राहु काळ बुधवार, २७ ऑगस्टला १२ ते दुपारी १.३० मिनिटांपर्यंत आहे. चंद्रास्त बुधवार, २७ ऑगस्टला रात्रौ ०९.२७ मिनिटाला होणार आहे.

पुणे: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला
पुण्यातील सिंहगडावर किल्ल्यावर मित्रासोबत फिरायला गेल्यानंतर बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पोलिसांना सापडला. रविवारी सांयकाळी (२४ ऑगस्ट) नागरिकांना तो पडलेल्या अवस्थेत दिसला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याने अपहरणाचा बनाव रचल्याचे पोलिसांनी सांगितले.

राष्ट्रीय: धनखड यांनी राजीनामा का दिला? अमित शाहांनी सांगितले कारण
जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणांमुळे राजीनामा दिला असं अमित शाहांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या आरोपांना नाकारत, धनखड यांनी वैयक्तिक आरोग्य समस्यांमुळे पद सोडले, या प्रकरणाचे राजकारण न करण्याचे आवाहन शाहांनी केले.

सखी: जेट लॅग: कुणाला जास्त त्रास, कुणाला कमी? कारणं आणि धोके!
परदेश प्रवास करुन आले की अनेकजण कौतुकानं सांगतात जेट लॅगचा फार त्रास होतो आहे. काही दिवसात तो कमीही होतो पण काही लोकांची झोप, भूक, आणि एनर्जी यांचं गणित बिघडतं. लहान मुलं-वृद्ध माणसं यांना जास्त होतो. वारंवार प्रवास करणाऱ्या काहीजणांनाही त्रास होतो. काहींना कमी, काहींना जास्त त्रास होण्याची कारणं अनेक आहेत आणि धोकाही..

लातुर: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात तिरू नदीच्या पात्रात एक सुटकेस पोलिसांना मिळाली. शेळगाव शिवारात ही सुटकेस आढळून आली. सुटकेसमधील मृतदेह २५ ते ३० वयोगटातील महिलेचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. आजूबाजूच्या शेतांमध्ये दुर्गंधी येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली.

राष्ट्रीय: भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवराजसिंग चौहान, मोहन भागवतांची भेट!
शिवराज सिंह चौहान यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीने भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत रंगत आली आहे. दोन वर्षांनंतर या दोघांची भेट झाली. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर्कवितर्क लढवले जात आहेत. २८ सप्टेंबरआधी राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई: अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत भाजपाचा रेकॉर्ड करणार - फडणवीस
आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपा अध्यक्षपदी निवड! विधानसभेत अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी साटम यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेत भाजपा नवा रेकॉर्ड करणार, असा दावा केला. तसेच मावळते अध्यक्ष आशिष शेलार आणि मंत्री लोढा यांच्या कामाचे कौतुक केले. पत्रकार परिषदेत मतचोरीच्या आरोपांवरून खोट्याला काही आधार नसतो असं विधान करत फडणवीसांनी राहुल गांधींना टोला लगावला.

व्यापार: SBI ग्राहकांना फक्त याच नंबरवरुन कॉल करते; सावध राहा!
SBI नं ग्राहकांना महत्वाचा इशारा दिला आहे. SBI चे संपर्क केंद्र फक्त १६०० आणि १४० ने सुरू होणाऱ्या नंबरवरुनच कॉल करतात. इतर नंबरवरुन कॉल आल्यास सावध राहा आणि कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नका असं स्टेट बँकेनं म्हटलं आहे.

व्यापार: एचडीएफसी बँकसह या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
शेअर बाजारातील अस्थिरतेत, येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये, एचडीएफसी बँक, करूर वैश्य बँक आणि शिल्पा मेडिकेअर यांसारख्या ८ कंपन्या पात्र गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहेत. यासाठी कंपन्यांनी रेकॉर्ड डेटची देखील घोषणा केली आहे. यामध्ये सर्वाधिक २ शेअर्सवर २५ शेअर्स बोनस देण्यात येणार आहे.

क्रिकेट: किंग कोहली परत येतोय... ऑस्ट्रेलियासाठी विराटची लॉर्ड्सवर जोरदार तयारी!
विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी लॉर्ड्सवर सराव करत आहे. बीसीसीआयने कोहली आणि रोहितच्या निवृत्तीच्या अफवा फेटाळल्या. तंदुरुस्त असेपर्यंत क्रिकेट खेळणार, असे विराटने आधीच सांगितले आहे. त्यामुळे आगामी क्रिकेट मालिकेसाठी विराटचा जोरदार सराव सुरू झाला आहे.

क्रिकेट: BCCI ला मोठा धक्का, ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली!
आशिया कप सुरू होण्यापूर्वीच ड्रीम-११ने भारतीय क्रिकेट संघाच्या लीड स्पॉन्सरशिपपासून हटण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हा निर्णय, ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५ मंजूर झाल्यानंतर घेतला. या विधेयकानुसार ड्रीम-११ सारख्या रिअल-मनी गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर बंदी आली आहे. ड्रीम-११ ने २०२३ मध्ये बीसीसीआयसोबत ३५८ कोटींचा ३ वर्षांचा स्पॉन्सरशिप करार केला होता. जो २०२६ पर्यंत होता.

क्रिकेट: ट्रेव्हिस हेडचा धमाका! ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला २७६ धावांनी हरवले
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या वनडेमध्ये २७६ धावांनी धूळ चारली. हेड (१४२), मार्श (१००), आणि ग्रीनच्या (११८*) शतकांनी ऑस्ट्रेलियाने ४३१ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या कॉनोलीने ५ गडी बाद करत आफ्रिकेला १५५ धावांवर रोखले आणि विक्रमी विजय मिळवला.

आंतरराष्ट्रीय: चांगली डील जिथे, तेल घेऊ तिथेच! अमेरिकेला भारताचा इशारा
अमेरिकेच्या टॅरिफला भारताचे सडेतोड उत्तर! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार. राजदूत विनय कुमार म्हणाले, 'जिथे स्वस्त मिळेल, तिथून तेल खरेदी करू,देशहित महत्त्वाचे!' ऊर्जेची गरज पूर्ण करणारच!

महाराष्ट्र: परमेश्वराचे बोलावणे आले? ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, २० भाविकांच्या निर्णयाने खळबळ
अनंतपूरमधील २० भाविकांनी ८ सप्टेंबरला देहत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 'आम्हाला परमेश्वराचे बोलावणे आले आहे' असा दावा हे भाविक करत आहेत.

राष्ट्रीय: 'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरूर भावूक
भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने आज क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३७ वर्षीय पुजाराने आपल्या कारकिर्दीत १०३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले. दरम्यान, पुजाराच्या निवृत्तीनंतर काँग्रेस नेते शशी थरुर यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. थरूर म्हणाले की, पुजारासारख्या फलंदाजाला सन्मानपूर्वक निरोप द्यायला हवा होता.