पिंपरी -चिंचवड: पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत प्रशासन नाही गंभीर;पाणीप्रश्नावर महापालिकेची चालढकल
पिंपरी : शहराला उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याची तीव्र गरज असताना महापालिकेचे दोन महत्त्वाचे पाणीप्रकल्प अजूनही रखडल्याचे चित्र आहे. तातडीने पाणी मिळावे म्हणून भामा-आसखेड जलवाहिनीच्या ठेकेदाराला बदलण्याची वेळ प्रशासनावर आली, तर दुसरीकडे राज्य शासनाचा ग्रीन सिग्नल मिळालेल्या पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत अजून एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय: पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
US-Iran-Israel: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानात आयोजित उच्चस्तरीय चर्चा निष्फळ ठरली. सुमारे 21 तास चाललेल्या या चर्चेचा उद्देश युद्धविरामाला कायमस्वरूपी शांततेत रूपांतरित करणे हा होता. मात्र, राजनैतिक मतभेद आणि जटिल प्रादेशिक समीकरणांमुळे हा प्रयत्न अपयशी ठरला.
क्रिकेट: IPL 2026: प्रसिद्ध कृष्णाचा भेदक मारा; गिल-बटलरचा अर्धशतकी तोरा! LSG च्या घरच्या मैदानात GT चा रुबाब
प्रसिद्ध कृष्णा आणि कगिसो रबाडा यांच्या भेदक माऱ्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने लखनौचं मैदान मारत यंदाच्या हंगामातील दुसरा विजय नोंदवला. आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामातील १९ व्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लखनौच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात १६४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या संघाने ७ विकेट्स आणि ८ चेंडू राखून विजय निश्चित केला.
पुणे: कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या नाहीत; प्रत्येकाला सन्मान देणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
बारामती : आगामी काळात विकासकामे आणि संघटनात्मक बांधणी करताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविली जाईल. कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या नाहीत, या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येकाला सन्मान दिला जाईल. नव्या दमाच्या सक्षम लोकांना पुढे आणण्यासाठी ठोस निर्णय घेऊन त्यांना कामाची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आगामी रणनीती स्पष्ट केली.
महाराष्ट्र: मतभेद विसरून शिवसेना एकसंध करा; एकनाथ शिंदेंची पदाधिकाऱ्यांना सूचना
एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मतभेद दूर करून एकजूट होण्याचे आवाहन केले. शिवसेना हे कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये काही कुरबुरी असतील काही मतभेद असतील ते दूर करा आणि एकसंघ व्हा. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, कोणाच्या दावणीला बांधलेली नाही. मी आजही कार्यकर्ता आहे. असली कोण आणि नकली कोण हे वारंवार सिद्ध झालंय. विरोधकांचा टांगा पलटी झाला आहे असा टोला शिंदेंनी लगावला.
राष्ट्रीय: माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Odisha Crime: ओडिशा राज्यातील झारसुगुडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने स्वतःच्या दोन लहान मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. त्यानंतर या क्रुर महिलेने स्वतःचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे.
पिंपरी -चिंचवड: Video: आधी ‘थार’ने राडा, नंतर हात जोडले...! पिंपरी-चिंचवडमध्ये स्टंटबाज तरुणाला पोलिसांचा दणका
पिंपरी-चिंचवड - सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करण्याची वाढती प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या ‘थार’ गाडीने भररस्त्यात स्टंटबाजी करत नागरिकांच्या जीवाशी खेळ केला. मात्र, त्याचा हा ‘स्वॅग’ वाकड पोलिसांसमोर फार काळ टिकला नाही.
पुणे: Pune Crime: पुण्यातील ‘रेस्क्यू फाउंडेशन’मधून १३ बांगलादेशी मुलींचे थरारक पलायन; कर्मचाऱ्यांवर हल्ला
पुणे - पुण्यातील हडपसर परिसरातील महंमदवाडी रोडवर असलेल्या ‘रेस्क्यू फाउंडेशन’ या महिला संरक्षण गृहात रविवारी धक्कादायक घटना घडली. मानवी तस्करीतून मुक्त करण्यात आलेल्या १३ बांगलादेशी मुलींनी संस्थेतील कर्मचाऱ्यांवर हल्ला करून थरारक पद्धतीने पलायन केले. या घटनेमुळे महिला संरक्षण केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आंतरराष्ट्रीय: ईस्ट वेस्ट पाइपलाइनबाबत सौदीची घोषणा; भारतासाठी मोठा दिलासा
सौदी अरेबियाची ईस्ट-वेस्ट पाईपलाईन पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू झाली आहे. इथून दिवसाला ७० लाख बॅरेल तेल नेले जाऊ शकते. भारतासाठी हे संजीवनीपेक्षा कमी नाही. आता भारत कुठल्याही अडथळ्याविना इथून तेल खरेदी करू शकतो. पूर्वी हे तेल जगापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग पर्शियन आखात आणि त्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होता. परंतु इराणने हा मार्ग रोखल्याने अनेक देशाला ऊर्जा संकटाचा सामना करावा लागला.
व्यापार: शेअर बाजाराची सुरक्षा वाढली; SEBI ने आणले सायबर सुरक्षेचे 'त्रिशूल', जाणून घ्या...
SEBI Digital Platform: शेअर बाजाराची सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी SEBI ने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. SEBI ने तीन नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करत बाजारातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि डेटा सुरक्षिततेला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
व्यापार: TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
TCS Vacancy: आयटी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. देशातील आघाडीची आयटी कंपनी Tata Consultancy Services (TCS) ने आर्थिक वर्ष २०२७ (FY27) साठी २५,००० फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, आगामी काळात बाजारातील मागणी वाढल्यास भरतीचा आकडा आणखी वाढवला जाऊ शकतो.
सखी: फिटनेस टेक लाखांचे? नक्की काय वाुरत आहेत सगळे ?
ममता बॅनर्जी अनेक फिटनेस उपकरणं वापरताना दिसल्या आणि हा ट्रेंड नक्की काय असा सगळ्यांनाच प्रश्न पडला. विशेष ट्रॅकिंग आणि ऑल-इन-वन सोयीमुळे ट्रेंड वाढला. उपकरणे विविध डेटा देतात, आरोग्य माहितीला दैनंदिन कार्यात्मकतेशी जोडतात. वेअरेबल तंत्रज्ञान विकसित होत आहे.
आंतरराष्ट्रीय: पाकमध्ये अमेरिका-इराण शांतता चर्चेत हाणामारीची वेळ; बैठकीत काय घडलं?
इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण चर्चेत तणाव वाढला. होर्मुझची सामुद्रधुनी हा विटकॉफ आणि अराघची यांच्यातील वादाचा एक प्रमुख मुद्दा बनला. जगातील या सर्वात महत्त्वाच्या जलमार्गाच्या नियंत्रणावरून आणि वर्चस्वावरून त्यांच्यात तीव्र मतभेद झाले. चर्चेत वातावरण अचानक भयंकर तापले होते. जवळपास हाणामारीची वेळ आली होती. पण कसेबसे दोघांना शांत करून तणाव कमी करण्यात आला असा दावा पाकिस्तानच्या मित्र देशाच्या माध्यमांनी केला आहे.
व्यापार: युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
US-Iran war: अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. वर्ल्ड बँखेचे प्रमुख अजय बंगा यांनी याबाबत गंभीर इशारा दिला असून, युद्धविराम (सीजफायर) कायम राहिला तरी त्याचे आर्थिक परिणाम दीर्घकाळ जाणवतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय: इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझजवळ पाकिस्तानी जहाजांचा यू-टर्न
इस्लामाबादमध्ये US-इराण चर्चा अयशस्वी झाल्यानंतर होर्मुझकडे जाणारी दोन पाकिस्तानी जहाजे माघारी फिरली. पर्शियन आखाताकडे निघालेल्या टँकरने वाढता तणाव आणि संभाव्य US नाकेबंदीमुळे मार्ग बदलला, ज्यामुळे प्रादेशिक अस्थिरतेची चिंता वाढली. इराणने इराक आणि पाकिस्तान या दोघांनाही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली होती. मात्र आता पाकिस्तानी जहाजांनी अचानक यू टर्न का घेतला याचे कारण अस्पष्ट आहे.
पुणे: मुलीची ट्यूशन फी मागितल्याने पतीने पत्नीला केली लाकडी काठीने मारहाण
पिंपरी : मुलीच्या ट्यूशनची फी भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने पतीने पत्नीला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना चऱ्होली बुद्रुक येथे बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सखी: प्रेशर कुकर साफ करण्यासाठी टिप्स
महागडा कुकर वर्षानुवर्षे नव्यासारखा चकाचक ठेवायचा असेल आणि सुरक्षितपणे स्वयंपाक करायचा असेल, तर दर १५ दिवसांनी 'या' दोन गोष्टी करणे गरजेचे आहे.
पुणे: एलपीजी गॅस संकट: वितरण गोंधळ; ९६ तासांचा नियम ठरतोय फोल
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस सिलिंडर वितरणातील गोंधळ सुरूच. नियमांनंतरही विलंब कायम, ९६ तासांपेक्षा जास्त. नागरिक एजन्सींच्या प्रतिसादावर नाराज; प्रशासकीय हस्तक्षेपाची मागणी.
पुणे: Pune Crime : लैंगिक छळ प्रकरणात खासगी कंपनीतील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
पुणे : खासगी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह चार जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सखी: लोणच्यासाठी योग्य कैरी: वर्षानुवर्षे टिकणाऱ्या चवीसाठी अचूक निवड.
महाराष्ट्रात लोणच्यासाठी राजापुरी किंवा तोतापुरी कैरीला मोठी पसंती आहे. पण यापासून तयार केलेले लोणचे वर्षभर फ्रेश आणि कडक ठेवायचे असेल तर कैरी कशी निवडायची पाहूया.
पुणे: आरएमसी प्रकल्पांकडे का होतेय प्रशासन, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष ?
पुणे : रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी)प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, पर्यावरणातील प्रदूषणाची पातळी वाढत आहे, गंभीर बाब म्हणजे या प्रकल्पातील राडारोडा आणि केमिकलयुक्त पाणी थेट नदीत बिनदिक्कत सोडले जात आहे, याबाबत वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध होत असतानाही महापालिका प्रशासन, नगरसेवक आणि आमदार यावर काही बोलायला तयार नाहीत? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे अधिकारी संबंधित प्रकल्प बंद केल्याचे सांगतात. मात्र, पाहणी केल्यानंतर सर्व प्रकल्प सुरळीत सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
सखी: दूध पावडर कशी आणि किती वापरावी ?
दूध पावडर झटपट रेसिपीसाठी सोयीस्कर आहे. गुठळ्या टाळण्यासाठी कोमट पाण्यात मिसळा साध्या पाण्यात मिक्स होत नाही. ही पूड गोडवा वाढवते आणि प्रवासासाठी उत्तम आहे. जपून वापरा, दैनंदिन आरोग्यासाठी ताज्या दुधाला प्राधान्य द्या, कधीतरी ही पावडर वापरणे ठिक आहे.
महाराष्ट्र: भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला; आशा भोसले यांचं निधन
प्रसिद्ध गायिका सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झालं आहे. आशाताईंनी हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राला मोठी हानी झाली आहे. गेल्या ८ दशकांहून अधिक काळ आपल्या सुरेल, बहुआयामी आणि जादुई आवाजाने कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा स्वर आज कायमचा शांत झाला आहे.
आंतरराष्ट्रीय: शांतता चर्चा फिस्कटल्याने ट्रम्प संतापले; इराणची नौदल नाकेबंदी करणार
इराणसोबतची शांतता चर्चा अयशस्वी झाल्याने डोनाल्ड ट्रम्प संतापले असून त्यांनी व्हेनेझुएला धर्तीवर इराणला नौदल घेराबंदीची धमकी दिली आहे. यामुळे इराणच्या तेल महसुलावर परिणाम होऊन चीन, भारतासारख्या देशांवर दबाव वाढेल. यूएसएस जेराल्ड फोर्डसह अमेरिकन नौदल होर्मुज सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज आहे. इराणची आर्थिक नाडी असलेल्या खार्ग बेटावर कब्जा करण्याचाही विचार आहे. खार्ग बेट इराणची आर्थिक नाडी आहे.
सखी: घरच्या घरी पेडिक्युअर: स्वयंपाकघरातील ५ गोष्टी वापरून मिळवा सुंदर पाय
पार्लरमध्ये तासनतास बसण्याऐवजी घरच्या घरी आरामात बसून पाय स्वच्छ आणि सुंदर कसे बनवायचे.अवघ्या काही मिनिटांत तुमचे पाय एखाद्या मॉडेलसारखे सुंदर दिसू लागतील.
पुणे: नदी सुधार करताना पर्यावरणकडे लक्ष द्या; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचना
पुणे : नदी सुधार प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण करताना ते पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त होईल, याकडे लक्ष द्या, अशा सूचना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला केल्या. नद्यांचे प्रदूषण थांबविण्यासाठी तसेच नदी पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे: पुण्यात शिकवणीत धक्कादायक! ऑफिस बॉयचा विद्यार्थ्यावर अत्याचार, व्हिडिओ काढला
पुण्यात एका खाजगी शिकवणीतील ऑफिस बॉयने १२ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याचे व्हिडिओ काढले. विकास गायकवाडला अटक. मुलाने वडिलांना डिसेंबर २०२३ पासून सुरू असलेल्या अत्याचाराबद्दल सांगितले. आरोपीने फोटो काढून मानसिक त्रास दिला. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
क्रिकेट: संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने चेपॉकच्या घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सला रोखत आयपीएल २०२६ स्पर्धेतील आपल्या पहिला विजय मिळवला आहे. संजू सॅमसनचं नाबाद शतक आणि आयुष म्हात्रेच्या अर्धशतकासह शिवम दुबेनं केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर चेन्नईच्या संघाने दिल्ली कॅपिटल्ससमोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ १८९ धावांवर ऑलआउट झाला. सलामीवीर निसंका आणि स्टब्सशिवाय एकालाही मोठी खेळी करता आली नाही.
महाराष्ट्र: "शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
"मला असं वाटतं की शरद पवारांचा जो काही लेख आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. मला दुःख आहे की शरद पवारांनी अशा प्रकारचा लेख लिहिला", असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या विधानावर रोखठोक भूमिका मांडली. शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध राहिलेला नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
क्रिकेट: Sanju Samson Century : संजू सॅमसनचा 'शतकी' धमाका! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर विक्रमी खेळी
IPL 2026 CSK vs DC Sanju Samson Century : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मेगा डीलसह राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून चेन्नई सुपर किंग्सचा झालेल्या संजू सॅमसन याने सलग तीन सामन्यातील अपयशानंतर यंदाच्या हंगामातील पहिली सेंच्युरी ठोकली आहे. पहिल्या तीन सामन्यात अनुक्रमे ६, ७ आणि ९ धावांवर अडखळलेल्या संजूनं चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध फलंदाजीचा खास नजराणा पेश करताना IPL मधील आपली चौथे शतक झळकावले. तीन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून शतक झळकवण्याचा खास डाव त्याने या शतकासह साधला आहे.
जालना: आईला मेसेज पाठवल्याने १७ वर्षीय मुलाने मित्राचा खून केला.
जालन्यात आईला मेसेज पाठवल्याच्या रागातून एका १७ वर्षीय मुलाने मित्र निखिल वाघमारे (26) याची हत्या केली. झोपेत असताना धारदार शस्त्राने वार करून आरोपीने निखिलला मारले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तो नुकताच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.