
shorts: ऑपरेशन सिंदूरमधील रिअल हिरोंना सलाम! दहशतवाद्यांच्या मूळावर घाव घालणाऱ्या यौद्ध्यांना 'वीर चक्र' सन्मान!
ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या हवाई दलाच्या नऊ लढाऊ वैमानिकांना वीर चक्र पदक जाहीर झाले आहे. युद्ध काळात धाडसी कामगिरीसाठी या पदकाने यौद्ध्यांचा सन्मान केला जाणार आहे. पाकमधील मुरिदके, बहावलपूर येथील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याबरोबरच या लढाऊ वैमानिकांनी पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर हल्ले चढवत उत्तर दिले.

महाराष्ट्र: ब्रेकिंग! महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत!
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपाने सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक होत आहे. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असून यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते. ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी पक्षाची निवड अंतिम करण्यासाठी बोलावलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय: योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता
उत्तर प्रदेशात दोन वर्षांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपा १०० हून अधिक आमदारांचे तिकीट कापण्याची शक्यता. सपाच्या भाजपात येऊ इच्छिणाऱ्या आमदारांनाही परीक्षा द्यावी लागणार. लोकसभेतील नुकसानीनंतर भाजपा कमजोर आमदारांना बाजूला करण्याच्या तयारीत. भाजपाला विजयाची हॅटट्रिक साधायची आहे! भाजपाने अंतर्गत हालचाली सुरु केल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्र: पुण्यातील बॅनरवर अण्णा हजारेंनी सोडले मौन; म्हणाले, "हे माझे दुर्दैव..."
"अण्णा आता तरी उठा" पुण्यात झळकलेल्या या बॅनरवर अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली. वयाच्या ९० व्या वर्षानंतर मीच आंदोलन करतच बसू, तुम्ही झोपायचे का? असा सवाल करत तरुणांनी भ्रष्टाचारविरोधी लढा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 'देशासाठी बलिदान देणाऱ्यांची आठवण ठेवा, नुसते तिरंगा हातात घेऊन काही होणार नाही, मी केलेल्या कायद्यांचा तरुणांनी उपयोग करावा,' असे आवाहन करत त्यांनी तरुणाईला जागं होण्याचा संदेश दिला.

कोल्हापूर: कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन झाले. 46 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या इमारतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील नागरिकांना फायदा होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय: ...त्याचवेळी तुम्ही आक्षेप का घेतले नाहीत?; निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना थेट प्रश्न
जेव्हा निवडणूक कार्यालयाकडून महाराष्ट्रातील मतदारांची मसुदा यादी प्रसिद्ध केली गेली, त्याचवेळी दावे आणि आक्षेप का सादर केले नव्हते? परंतु जेव्हा निकाल लागला तेव्हा ते चुकीचे होते ही आठवण झाली. आजपर्यंत एकही आक्षेप पुराव्यासह महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांना मिळाले नाहीत. एखादी गोष्ट तुम्ही दहावेळा, वीस वेळा बोलला म्हणून ते सत्य होईल असं नाही असं सांगत मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले.

राष्ट्रीय: केंद्रीय निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना आव्हान: प्रतिज्ञापत्र द्या, अन्यथा माफी मागा!
मतदार यादीबाबत राहुल गांधी यांनी केलेले आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. हे आरोप चुकीचे असून ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा असं आव्हान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिले आहेत. विना प्रतिज्ञापत्र अशा गंभीर आरोपांवर निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही, कारण ते संविधान आणि निवडणूक आयोग दोघांच्याही विरोधात होईल असं त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय: जिथे नवीन मतदार, तिथे भाजपचा विजय; महाराष्ट्रात EC ने 1 कोटी मतदार निर्माण केले: राहुल गांधी
राहुल गांधींनी बिहारमध्ये 'मतदार हक्क यात्रा' सुरू केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने १ कोटी नवीन मतदार निर्माण केल्यामुळे भाजपचा विजय झाल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले, मात्र ते भाजपला विचारत नाहीत. जेव्हा आम्ही सीसीटीव्ही मागितले, तेव्हा त्यांनी नकार दिला. लोकसभा-विधानसभेच्या मतांची चोरी होत आहे. बिहारमध्येही ते मतदारांना विभागून मतांची चोरी करण्याची तयारी करत आहेत. मात्र, आम्ही त्यांना हे करू देणार नाही, असेही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय: नोबेलसाठी उतावळे ट्रम्प! नॉर्वेला टेरिफची धमकी
नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा उतावळेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यांनी चक्क नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करत टेरिफ लावण्याची धमकी. इस्रायल-हामस युद्ध थांबवल्याचा दावा फोल ठरला आहे. भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचा दावा भारताने फेटाळला आहे. शांततेच्या पुरस्कारासाठी त्या देशालाच धमकी देणे चुकीचे आहे हे ट्रम्प विसरले आहेत. आता ट्रम्प यांना नोबेल मिळणार का? हे पाहणे औत्स्युक्याचे ठरले आहे.

राष्ट्रीय: निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना प्रत्युत्तर, 'मत चोरी'चे आरोप फेटाळले!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'मत चोरी' आणि बिहारमधील SIR वरुन केलेल्या आरोपांबाबत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी(दि. १७) महत्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मत चोरीच्या आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावले. तसेच, "निवडणूक आयोगासाठी सर्व राजकीय पक्ष समान आहेत. निवडणूक आयोग कोणाशीही भेदभाव करत नाही. निवडणूक आयोगाचे दरवाजे चर्चेसाठी नेहमीच सर्वांसाठी समान खुले असतात," असे स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय: आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात
पहलगाम हल्ल्यानंतर भारतापाठोपाठ आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार आहे. तालिबानने नद्यांवर धरणे बांधायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे पाकिस्तान आणि इराणमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानला शेतीसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी पाणी हवे आहे, ज्यामुळे आशियाई देशांमध्ये तणाव आहे. अफगाणिस्तानातून आशियातील सर्व देशांना वाहणाऱ्या नद्यांचे पाणी रोखण्यात येणार आहे.

व्यापार: सौदी-इराण नाही, 'या' देशात सर्वात स्वस्त पेट्रोल; भारताचा कितवा क्रमांक ?
११ ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या जागतिक पेट्रोल किमतींच्या आकडेवारीनुसार, लिबियामध्ये तेलाची किंमत २.४५ रुपये प्रति लिटर आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगभरातील विविध देशांमधील पेट्रोलच्या किमतींची आकडेवारीवर जारी केली आहे. लिबियानंतर, इराण दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे तेलाची किंमत २.५४ रुपये प्रति लिटर आहे. त्यानंतर व्हेनेझुएला येतो, जिथे १ लिटर तेलाची किंमत ३.०७ रुपये आहे. या यादीमध्ये भारताचा २१ वा क्रमांक आहे.

राष्ट्रीय: यंदा दिवाळीला डबल बोनस! पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
पंतप्रधान मोदींनी द्वारका एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले, दिल्लीच्या विकासाचे आश्वासन दिले. जीएसटी सुधारणा आणि दिवाळीत डबल बोनसची घोषणा करत सुधारणांची राज्यांना माहिती पाठवली. सर्व राज्ये सरकारला सहकार्य करतील, अशी आशा व्यक्त केली. दिवाळीत 'मेड इन इंडिया' वस्तू खरेदी करण्याचे मोदींचे आवाहन, स्थानिक व्यापाऱ्यांनाही केले भारतीय वस्तू विकण्याचे आवाहन.

क्राइम: एल्विश यादवच्या घरी भाऊ गँगचा गोळीबार; बेटिंग ॲप ठरले कारण!
बिग बॉस विजेता एल्विश यादवच्या गुरुग्राममधील घरावर भाऊ गँगने गोळीबार केला. नीरज फरीदपूर आणि भाऊ रीतुलिया यांच्या टोळीने बेटिंग ॲपच्या जाहिरातीमुळे हल्ला केला. आरोपींनी हेल्मेट घातलेले होते. यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे. ही गँग चालविणारा गुंड हिमांशू भाऊ पोर्तुगालमध्ये असून त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. हिमांशू भाऊ भारतात ३० हून अधिक गुन्हेगारी आणि संघटित गुन्ह्यांमध्ये हवा आहे.

आंतरराष्ट्रीय: सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान; 'खुदा'ने मला रक्षक बनवले!
भारतीय सैन्याकडून मोठा पराभव झाल्यानंतरही पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लष्करप्रमुख असीम मुनीरला बढती देऊन फील्ड मार्शल बनवले. तेव्हापासून मुनीर दररोज भारताविरुद्ध गरळ ओकत आहे. सध्या पाकिस्तानात सत्तापालटाची चर्चा सुरू असताना, मुनीर म्हणतो की, ''खुदा'ने मला रक्षक बनवले आहे. माझी राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, मला फक्त स्वतःला देशाचा सेवक म्हणून राहायचे आहे. मी एक सैनिक आहे, माझी सर्वात मोठी इच्छा शहीद होणे आहे."

व्यापार: भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण, ट्रम्प यांचा रशियाशी व्यापार वाढला!
एका बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर २५% अतिरिक्त टॅरिफ लादत असताना, दुसऱ्या बाजूला अमेरिकेचा रशियासोबतचा व्यापार २०% वाढला आहे. हा धक्कादायक खुलासा खुद्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलास्का येथील एका परिषदेत केला. यातून ट्रम्प यांचा दुटप्पीपणा समोर आल्याची टीका होत आहे.

राष्ट्रीय: ग्वाल्हेरमध्ये एअर इंडियाच्या विमानाला लँडिंगमध्ये अडथळा, प्रवाशांमध्ये भीती!
बेंगळुरूहून ग्वाल्हेरला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसला लँडिंगमध्ये अडचणी आल्या. पहिल्या प्रयत्नात विमान उतरू शकले नाही, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली. नंतर विमान सुरक्षित उतरले. तपासणीत कोणतीही त्रुटी आढळली नाही.

राष्ट्रीय: उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपची तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला मतदान
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी सुरु आहे. जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह यांच्यात चर्चा झाली आहे. एनडीएच्या मित्रपक्षांशी संपर्क सुरू आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत, थावरचंद गेहलोत, मनोज सिन्हा यांच्या नावाची चर्चा आहे. एनडीए १९-२० ऑगस्टपर्यंत उमेदवार निश्चित करणार असून ९ सप्टेंबरला मतदान होईल.

राष्ट्रीय: राहुल गांधींची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात आंदोलन
राहुल गांधी आजपासून 'व्होट अधिकार यात्रा' सुरू करत आहेत. मतदार यादीतील कथित गैरप्रकारांना ते विरोध करत आहेत. मतदार यादी पुनरावलोकनात नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मतचोरी विरोधात जनता आता जागी झाली आहे, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, आज निवडणूक आयोगही पत्रकार परिषद घेणार आहे.

आंतरराष्ट्रीय: भारतावर दुय्यम शुल्क नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे संकेत
रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवणाऱ्या देशांवर, विशेषतः भारतावर अमेरिका दुय्यम आयात शुल्क लावणार नाही, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दिले आहेत. हे अतिरिक्त शुल्क लागू केले असते तर त्याचा भारतावर मोठा परिणाम झाला असता, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र: रविवारची 'सुट्टी' पाण्यात! मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून संततधार सुरूच असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे. हवामान विभागाने कोकण, मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूरसह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय: मतचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
राहुल गांधींनी केलेले मतचोरीचे आरोप आणि बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणावरून सध्या निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमधून राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

मुंबई: दहीहंडी उत्सवाला गालबोट! मुंबईत थर लावताना एका गोविंदाचा मृत्यू, ३० जखमी
मुंबईत सर्वत्र दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा झाला. काही ठिकाणी उत्सवाला गालबोट लागले. मुंबईतील मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा थर लावताना मृत्यू झाला. तर मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरामध्ये काही ठिकाणी दहीहंडी थर लावताना कोसळल्याने ३० गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही गोविंदांना उपचारानंतर सुटीही दिली गेली.

हिंगोली: 'आता बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही'; जरांगेंचा आंदोलनाआधी सरकारला इशारा
'मराठा बांधव मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल तरी आम्ही तसे होऊ देणार नाही. नेतेमंडळींनी मराठा समाजाला साथ द्यावी. अन्यथा हा समाज नेतेमंडळींचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही', असा इशारा मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे. ते हिंगोली बोलत होते. २९ ऑगस्ट रोजी जरांगे मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत.

फिल्मी: ‘द बंगाल फाईल्स’च्या ट्रेलर प्रदर्शनावेळी कोलकात्यात गदारोळ
विवेक अग्निहोत्री यांच्या 'द बंगाल फाईल्स' चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनादरम्यान कोलकात्यात मोठा गदारोळ झाला. कार्यक्रम रद्द झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये स्क्रीनिंग ठेवण्यात आली, तिथेही गोंधळ झाला. यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ममता बॅनर्जी सरकारवर आवाज दाबत असल्याच आरोप केला. शहरात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?, असा सवाल त्यांनी विचारला.

मुंबई: मुंबई आमचे टार्गेट, ती मराठी माणसाकडेच राहील: संजय राऊत
मोदी-शहांची नजर मुंबईवर आहे, पण ठाकरे बंधूंचे लक्ष्य आहे की, मुंबई मराठी माणसांकडेच राहील. निवडणूक एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू असून, मुंबई हे आमचे टार्गेट आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

व्यापार: ट्रम्प-पुतिन यांची भेट; भारताला शुल्कावरुन दिलासा मिळणार?
भारताकडून शुल्क आकारल्यानं रशिया वाटाघाटीसाठी तयार झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दोन-तीन आठवड्यात अतिरिक्त पुनर्विचार करण्याचा इशारा दिला आहे. भारताने रशियन तेल खरेदी धोरण कायम ठेवलं आहे.

व्यापार: SBI चा ग्राहकांना दिलासा, EMI होणार कमी!
SBI कडून स्वातंत्र्यदिनी ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. गृहकर्ज आणि कार लोनवरील व्याजदर घटल्यानं EMI चा भार कमी होणार. MCLR मध्ये 5 बेसिस पॉइंट्सची कपात झाल्यानं फ्लोटिंग रेट ग्राहकांना फायदा होणार आहे.

मुंबई: मुंबईत रेड अलर्ट: मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, घरातच थांबा!
मुंबईत रेड अलर्ट. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा. रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत. नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन.

सोलापूर: आता वेटिंगची चिंता मिटणार! सोलापूर-मुंबई वंदे भारतला चार डबे जोडणार
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला २८ ऑगस्ट २०२५ पासून चार डबे जोडले जाणार आहेत. यामुळे ३१२ अधिक प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. सिद्धेश्वर आणि हुतात्मा एक्सप्रेसमधील वेटिंगची समस्या कमी होणार. प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय!

राष्ट्रीय: किश्तवाडमध्ये ढगफुटी: ६५ जणांचा मृत्यू, ३८ गंभीर, १०० बेपत्ता!
किश्तवाडच्या चशोटी गावात ढगफुटीमुळे हाहाकार माजला आहे. यात ६५ लोकांचा मृत्यू, ३८ गंभीर, १०० हून अधिक बेपत्ता झालेत. एनडीआरएफ आणि सैन्यानं बचावकार्य सुरू केलं आहे. आरआरचे जवानही या कामात गुंतले आहेत.