
संपादकीय: मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!
मुंबई महापालिकेत २२७ जागा आहेत. त्यांपैकी भाजपला १६० ते १७० जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. काही जागा मित्रपक्षांना द्यायच्या आहेत. याचा अर्थ मुंबईमध्ये शिंदेसेनेला ५० ते ६० जागादेखील मिळणार नाहीत. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये महापौरपद स्वतःकडेच हवे आहे. याशिवाय प्रमुख महापालिकांच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमनपदही भाजपलाच हवे आहे.

आंतरराष्ट्रीय: सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनाने केपी शर्मा ओली यांची सत्ता उलथून टाकली. त्यानंतर आता देशाचे नेतृत्व कोण करणार? हे जवळजळ निश्चित झाले आहे. या आंदोलनामुळे चर्चेत आलेले बालेंद्र शाह यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. आंदोलक तरुणांनी बालेन यांना पंतप्रधान करण्याची मागणी केली होती, पण त्यांना यास नकार दिला आहे. आपल्या अधिकृत फेसबूक पेजवरुन त्यांनी ही घोषणा केली आहे.

महाराष्ट्र: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सी.पी. राधाकृष्णन राजीनामा देणार
सी.पी. राधाकृष्णन देशाचे उपराष्ट्रपती बनले, महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा देणार. एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळवले. १२ सप्टेंबरला शपथ घेणार. स्थिर सरकारमध्ये महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार, याकडे लक्ष.

सखी: कढीपत्ता: पांढऱ्या केसांसाठी नैसर्गिक उपाय
पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? कढीपत्ता आहे उपाय! कढीपत्ता केसांना नैसर्गिकरित्या काळे करतो. पेस्ट किंवा तेल स्वरूपात लावा, आवळा किंवा मेहंदीसोबत पेस्ट करुन लावला तर अजून चांगले.

आंतरराष्ट्रीय: वॉशिंग्टन सुरक्षित; ट्रम्प यांचे हॉटेलमध्ये भोजन, घोषणाबाजीने गदारोळ!
वॉशिंग्टन सुरक्षित आहे हे दाखवण्यासाठी ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले. मंत्र्यांसोबत असताना 'फ्री पॅलेस्टाईन' आणि हिटलरच्या घोषणांनी गोंधळ उडाला. ट्रम्प यांना अनपेक्षित विरोधाचा सामना करावा लागला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ट्रम्प आल्याने रेस्टॉरंटमधील सर्वच लोक शॉक झाले. परंतू, तिथे काही पॅलेस्टीन प्रेमीही होते. त्यांनी ट्रम्प यांना पाहून लगेचच फ्री पॅलेस्टीनचे नारे देण्यास सुरुवात केली.

मुंबई: मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची जम्बो टीम; २१ नेत्यांची समिती घोषित
शिंदेसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २१ जणांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम निवडणुकीची रणनीती ठरवणार आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिंदेसेनेची जोरदार तयारी सुरू आहे. मागील आठवड्यातच शिंदेसेनेने शहरातील प्रभारी विभाग प्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची निवड केली होती. महापालिकेत जास्तीत जास्त जागा जिंकून उद्धव ठाकरेंना धक्का देण्याची रणनीती शिंदेंकडून आखली जात आहे.

मुंबई: शिवाजी पार्कवर ठाकरेंचा 'दसरा मेळावा'; BMC कडून हिरवा कंदील!
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी BMCची परवानगी दिली आहे. काही अटींसह ही परवानगी देण्यात आली आहे. येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी हा दसरा मेळावा पार पडेल. यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कुणावर प्रहार करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. १९६६ मध्ये पक्ष स्थापनेनंतर पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला होता.

सखी: फक्त २० रुपयांत मिळवा डायमंड फेशियल ग्लो!
कच्च्या दुधाने घरीच करा सोपे फेशियल! क्लींजिंग, स्क्रबिंग, मसाज आणि फेस मास्क अशा चार स्टेप्समध्ये मिळवा चमकदार आणि मऊ त्वचा. टॅनिंग आणि कोरडेपणा दूर करा..पाहा सोपा उपाय

सखी: गूळ-ज्वारीचा केक: करा फक्त १५ मिनिटांत!
घरीच बनवा गूळ-ज्वारीचा केक! मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट. ज्वारीचे पीठ, गूळ, कोको पावडर आणि ड्राय फ्रुट्स वापरून केक झटपट तयार करा. बाहेरच्या केकपेक्षा उत्तम, आरोग्यदायी पर्याय!

सखी: नाजूक जागेचं दुखणं महिलांसाठी त्रासदायक
योनीला खाज येण्याची अनेक कारणं असू शकतात, जसे कोरडेपणा, ऍलर्जी किंवा हार्मोनल बदल. सुती कपडे वापरा, साध्या पाण्याने धुवा आणि मसालेदार पदार्थ टाळा. समस्या वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आंतरराष्ट्रीय: फ्रान्समध्ये सरकारविरोधात मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ, तोडफोड
नेपाळनंतर फ्रान्सच्या रस्त्यांवर सरकारविरुद्ध लोकांचा रोष दिसून येत आहे. लोक रस्त्यावर उतरले असून इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारच्या धोरणांविरुद्ध मोठं आंदोलन करत आहेत. पॅरिसमध्ये तोडफोड, जाळपोळ होत आहे. काही लोक पोलिसांवर दगडफेक करत आहेत. लोकांचं म्हणणं आहे की, मॅक्रॉन सरकारने लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी काहीही केलेलं नाही. सोशल मीडियावर Block Everything या आवाहनानंतर ही निदर्शनं सुरू झाली.

महाराष्ट्र: राज-उद्धव यांच्यात 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवतीर्थ या निवासस्थानी अडीच तास चर्चा झाली. या भेटीनंतर आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-मनसे युती होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. येत्या दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू यांच्या युतीची घोषणा होऊ शकते असं बोलले जाते. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिका निवडणुकीत युती झाल्यास भाजपा महायुतीला मोठा धक्का बसू शकतो असं राजकीय विश्लेषक सांगतात.

व्यापार: सीबीआय पाठोपाठ आता ईडीची एंट्री! अनिल अंबानी २,९२९ कोटी प्रकरणी रडारवर
अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ! सीबीआय पाठोपाठ आता ईडीने २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. एसबीआयच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली असून अंबानींच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. दरम्यान, अंबानींनी आरोप फेटाळले आहेत.

सखी: भेंडी कितीही आवडली तरी कुणी खाऊ नये?
भेंडी फायदेशीर असली तरी काहींसाठी हानिकारक! किडनी स्टोन, गाउट, पोटाच्या समस्या, रक्त पातळ करण्याची औषधे घेणारे आणि ऍलर्जी असणाऱ्यांनी ती टाळावी. अन्यथा दवाखाना गाठावा लागेल!

सखी: घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? ५ उपाय
घामाची दुर्गंधी अनेकांना रोजचं जगणं मुश्किल करते. प्रचंड घाम येतो, त्यातून इन्फेक्शनही होतेच. आणि अनेकजण नाकाला रुमालही लावतात, त्यामुळे अपमानास्पदही वाटतं. त्यासाठी खास उपाय

सखी: नवरात्री २०२५: अखंड दिव्यासाठी २ उत्तम पर्याय; वात बदलताना भीती नाही!
नवरात्री २०२५ मध्ये अखंड दिवा लावायचा आहे? पाहा खास दोन नवे पर्याय. अखंड उजळेल दिवा आणि दिसेलही सुंदर.

मुंबई: मुंबईत घर घेणे परवडत नाही; ८१% लोकांचे मत, सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव
एकीकडे गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत गृहविक्रीने जोर पकडला असला तरी दुसरीकडे जवळपास ८१ टक्के लोकांनी मुंबईत घर घेणे परवडत नसल्याची माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या अॅनारोंक कंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे.

मुंबई: ब्रेकिंग! उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पुन्हा 'शिवतीर्थ'वर पोहचले
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा 'शिवतीर्थ'वर जात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत संजय राऊत, अनिल परब हेदेखील उपस्थित होते. या भेटीमुळे शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. गणेश दर्शनानंतरची ही दुसरी भेट राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढवणारी ठरली आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी हे पक्ष एकत्र येणार का? हे पुढच्या काही काळात स्पष्ट होणार आहे.

आंतरराष्ट्रीय: नेपाळचे माजी पंतप्रधान देउबांना पत्नीसह बेदम मारहाण, सैन्याने वाचवले!
नेपाळचे माजी पंतप्रधान शेर बहादुर देउबा आणि त्यांच्या पत्नीवर जमावाने हल्ला केला. सोशल मीडिया बंदीविरोधात सोमवारी नेपाळमध्ये Gen Z युवकांनी आंदोलन पुकारले. त्यात पोलिसांकडून झालेल्या कठोर कारवाईमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यातच आंदोलनकर्त्यांनी राजकीय नेत्यांना टार्गेट केले. देउबा आणि त्यांच्या पत्नीला सैन्याने वाचवले. सोशल मीडिया बंदीच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने नेत्यांच्या घरांची तोडफोड झाली. सैन्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात आणली.

मुंबई: भुजबळ म्हणाले, जीआर रद्द करा; रद्द करण्याची गरज नाही, विखेंचं उत्तर
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने २ सप्टेंबरला जारी केलेला शासन निर्णय (जीआर) रद्द करा किंवा त्यातील संदिग्धता दूर करा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. तर हा शासन निर्णय मागे घेण्याची किंवा रद्द करण्याची आवश्यकता नसल्याचे जलसंपदामंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर घातपात? खिळ्यांमुळे टायर पंक्चर, मध्यरात्री वाहतूक ठप्प!
समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ सावंगी ते जांभळा इंटरचेंजदरम्यान खिळ्यांमुळे अनेक गाड्या पंक्चर झाल्या. वाहतूक ठप्प, प्रवाशांकडून घातपाताचा संशय. यापूर्वीही घटना घडल्या, प्रशासनाकडून कारवाईची मागणी. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

सखी: जुन्या चहाच्या गाळणीला करा नव्यासारखी! खास ट्रिक..
चहाची गाळणी स्वच्छ करण्याच्या सोप्या युक्त्या शोधत आहात? स्टीलची गाळणी जाळून आणि प्लास्टिकची गाळणी बेकिंग सोडाने स्वच्छ करा. लिंबू आणि व्हिनेगरचे द्रावण देखील प्रभावी आहे. सोपे किचन क्लीनिंग हॅक्स!

व्यापार: दिवाळीपर्यंत सोनं ₹१.२५ लाखांपर्यंत? काय म्हणाले एक्सपर्ट
सोन्याच्या दरात येत्या काळात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत दर १.२५ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक संकटामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढच्या वर्षी दर १.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो. चांदीच्या दरातही वाढ संभवते.

राष्ट्रीय: सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
चंद्रपूरम पोंनुसामी राधाकृष्णन (जन्म २० ऑक्टोबर १९५७) हे राजकीय नेते, उद्योजक आणि कृषी व्यावसायिक असून, ३१ जुलै २०२४ पासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत. राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूमधील तिरुपूर येथे सी. के. पोंनुसामी आणि के. जानकी यांच्या घरी झाला. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व नंतर जनसंघाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले.

क्रिकेट: आशिया कप २०२५: सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन केले? व्हिडीओ व्हायरल
आशिया कपमध्ये पत्रकार परिषदेत भारत-पाक कर्णधार समोरासमोर आले. पत्रकार परिषदे संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने स्टेजवरून खाली उतरताना सलमान अली आगाशी हस्तांदोलन केले. सुरुवातीला वाटले की त्यांनी हस्तांदोलन केले नाही, पण नंतर 'शेक हँड'चा व्हिडीओ व्हायरल झाला.

आंतरराष्ट्रीय: ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमने; मोदींनी दिली मैत्रीपूर्ण प्रतिक्रिया!
रशियातील तेल आणि टॅरिफमुळे भारत-अमेरिका संबंधात तणाव असताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मैत्रीचा हात दिला. मोदी माझे चांगले मित्र असल्याचे सांगत व्यापार चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मोदींनी सकारात्मक प्रतिसाद देत भागीदारी अधिक दृढ करण्याची भूमिका मांडली.

राष्ट्रीय: कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी. सुद्रशन रेड्डी यांना फक्त ३०० मते मिळाली आहेत. त्यांना ३१५ मते मिळतील असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला होता. त्यांचे म्हणणे फोल ठरले हे आता सदर निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ आणि पंजाब येथील खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय आहे.

महाराष्ट्र: मराठा आरक्षण: हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल
हैदराबाद गॅझेटियरबाबत शासन निर्णय काढल्यानंतर आता सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार सातारा गॅझेट (१८१८) वर आधारित अहवाल तयार करण्याचे आदेश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीने पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना मंगळवारी दिले.

व्यापार: भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! अमेरिकेचा २५% कर लावण्याचा प्रस्ताव.
भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर आता ट्रम्प भारताला आणखी फटका देण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकी आयटी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना आपले काम तसेच नोकऱ्या देऊ नयेत यासाठी अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर बर्नी मोरेनो यांनी नवा कायदा प्रस्तावित केला आहे.

महाराष्ट्र: मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणी भाजपची माजी खा. प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जणांची निर्दोष सुटका करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बॉम्बस्फोटाचा कट गुप्ततेत रचण्यात आल्याने त्याचा थेट पुरावा असू शकत नाही, असे अपिलात म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय: धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालयातही तोडफोड
नेपाळमध्ये जेन झी या संघटनेच्या प्रेरणेने व विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जनआंदोलनाचा जोरदार तडाखा बसल्याने नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान कार्यालयासह अनेक मंत्रालये काठमांडू येथील 'सिंह दरबार'मध्ये चालवली जातात. नेपाळचे सर्व सरकार येथून चालवले जाते. ही देशातील सर्वांत मोठी प्रशासकीय इमारत आहे.