धाराशिव: अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
तुळजापूर : "अजितदादांच्या विमान अपघाताबाबतचा जो प्राथमिक अहवाल समोर आला आहे, त्यावर आम्ही अजिबात समाधानी नाहीत. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे," अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली.
व्यापार: टाटा समूहाला मोठ्या तोट्याचा अंदाज, 'हुकुमाचे एक्के' ठरताहेत अपयशी?
टाटा समूहासाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ फारसं चांगलं राहिलेलं नाही. या काळात समूहाला व्यवस्थापनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागले. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, टाटा सन्सच्या अंतर्गत सुरू झालेल्या काही नवीन व्यवसायांना (ज्यांना समूहाचे 'हुकुमाचे एक्के' मानले जात होते) आर्थिक वर्ष २६ मध्ये एकूण २९,००० कोटी रुपयांचा तोटा होण्याचा अंदाज आहे.
व्यापार: एअर इंडियाच्या सीईओंचा राजीनामा; कंपनीला नव्या नेतृत्वाची प्रतीक्षा
एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, जोपर्यंत नवीन सीईओची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत ते कंपनीसोबत काम करत राहतील. 'हिंदुस्तान टाइम्स'नं या प्रकरणाची माहिती असलेल्या चार व्यक्तींच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय. एअर इंडिया सध्या ऑपरेशनल समस्या, वाढता खर्च आणि या वर्षातील विक्रमी तोट्याची शक्यता अशा अनेक आव्हानांचा सामना करत असताना हा बदल समोर येत आहे.
तंत्रज्ञान: एआय डेटा सेंटर्स बनताहेत जागतिक तापमानासाठी वाढता धोका
एआय डेटा सेंटर्समुळे स्थानिक तापमान वाढत आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासानुसार डेटा सेंटर्सच्या वाढीमुळे तापमान वाढत आहे, विशेषत: मेक्सिको आणि स्पेनसारख्या क्षेत्रांमध्ये ग्लोबल वार्मिंग वाढत आहे आणि आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कूलिंग सिस्टीम हे त्याचे मुख्य कारण आहे.
राष्ट्रीय: राष्ट्र समृद्ध तर व्यक्ती समृद्ध: सरसंघचालक मोहन भागवत
राष्ट्र सुरक्षित आणि समृद्ध असेल तरच व्यक्तीची भरभराट शक्य, असे मोहन भागवत म्हणाले. करिअर आणि देशसेवा परस्परविरोधी नाहीत. योग्य मार्ग निवडणे हेच सर्वांत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तरुणांनी राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
व्यापार: सोन्याचे दर वाढले तरी आयात जोरात; स्विस सोन्याची भारताला भुरळ
भाव वाढूनही भारतातील सोन्याची आयात २८.७३% नी वाढून ६९ अब्ज डॉलर्स झाली आहे, ज्यामुळे व्यापार तूट वाढली आहे. स्वित्झर्लंडच्या सोन्याचा यात मोठा वाटा आहे. सरकारने दागिने आयातीचे नियम कडक केले असून परवाना आवश्यक आहे. यातून स्वदेशी उद्योगाला चालना मिळणार आहे.
नांदेड: ‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
नांदेड शहरात वर्चस्ववादातून शुक्रवारी (दि. ३) मध्यरात्री तिहेरी हत्याकांड घडले. एकमेकांवर झालेल्या हल्ल्यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या जखमीची शासकीय रुग्णालय परिसरात भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, रुग्णालयातील हत्या पोलिस आणि सुरक्षारक्षकांच्या समोरच घडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
छत्रपती संभाजीनगर: प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांचा राजीनामा, मुंबई विद्यापीठात होणार रुजू
डॉ. वाल्मिक सरवदे यांनी प्र-कुलगुरू पदाचा राजीनामा दिला असून ते मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू होणार आहेत. काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.
राष्ट्रीय: तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, पश्चिम बंगाल आणि असम या राज्यांतील निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीपूर्वी MATRIZE या संस्थेने केलेल्या ओपिनियन पोलमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपामध्ये अत्यंत चुरशीची लढत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय: भारताविरुद्ध पाकिस्तानचा कुरापती प्लॅन; आता मुनीर अक्कल पाजळणार
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताविरोधात मोठा धक्का बसल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाने २०२५ मध्ये एक मोहीम सुरू केली आहे. ज्याला ते 'स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स मास्टर प्लॅन' असं म्हणत आहेत. असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली भारताची जागतिक प्रतिमा मलिन करण्यासाठी मीडिया व थिंक टँकद्वारे 'माहिती मोहीम' चालवणार आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची प्रामुख्याने उर्दू-केंद्रित माध्यमे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरली, त्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत.
नांदेड: बापाने गाडी पेटवल्यावर मुलाने बापालाच ढकलले आगीत; उपचारादरम्यान मृत्यू.
नांदेडमध्ये, बापाने मुलाची गाडी पेटवल्यानंतर मुलाने रागाच्या भरात बापालाच पेटलेल्या गाडीवर ढकलले. उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेने व्यसनाधीनता आणि कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आले.
राष्ट्रीय: महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ 2025 दरम्यान चर्चेत आलेले IIT बाबा अभय सिंह आता आपल्या लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभय सिंह सोमवारी (6 एप्रिल) आपल्या पत्नीससह हरियाणातील झज्जर येथील निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी हिमाचल प्रदेशातील अघंजर महादेव मंदिरात लग्न केल्याची माहिती आहे.
सखी: वात: कारणं, लक्षणं आणि सोपे घरगुती उपाय
वात म्हणजे शरीरात वाढणारा गॅस. कोरडेपणामुळे पचनाच्या समस्या, सांधेदुखी आणि कडकपणा जाणवतो. गरम ताजे अन्न खा, पुरेसे पाणी प्या, नियमित व्यायाम करा आणि ताण कमी घ्या. साधे घरगुती उपाय आराम देऊ शकतात. वाताचा त्रास असेल तर सांधेही आखडतात. वेळीच उपाय करा.
आंतरराष्ट्रीय: सौदी अरेबियाच्या निर्णयाने तेल महागणार; पेट्रोल-डिझेल दर वाढणार?
सौदी अरेबियाने आशियाई देशांसाठी तेल दरवाढ केल्याने चिंता वाढली आहे. भारताची तेल आयातीवरील निर्भरता आणि सौदी अरेबियावरील अवलंबित्व पाहता, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. सरकारी मालकीची सौदी अरामको कंपनीने मे महिन्यातील विक्रीसाठी आपल्या अरब लाईट क्रूडची किंमत आशियाई रिफायनर्सकरिता प्रादेशिक मानकापेक्षा जास्त म्हणजेच प्रति बॅरल १९.५० डॉलर ठेवणार आहे असा ब्लूमबर्गने रिपोर्ट दिला आहे.
सखी: सब्जा उन्हाळ्यात कुणी खावा, कुणी टाळावा ?
सब्जा शरीर थंड ठेवतो, पचनास मदत करतो. पण ५ वर्षांखालील मुले, लो बीपी, आयबीएस, जुलाब असणाऱ्यांनी टाळावा. ॲसिडिटी, उष्णता, बद्धकोष्ठता, घाम येणाऱ्यांसाठी फायदेशीर.
आंतरराष्ट्रीय: अमेरिका-इराण युद्ध संपेना, चीन-रशियाच्या मदतीने संघर्ष वाढतोय?
अमेरिका-इराण संघर्षाला एक महिना उलटला तरीही अद्याप तोडगा नाही. दोन्ही देशांमधील चर्चा निष्फळ ठरत आहेत तर इराणने पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळला. मध्यस्थामार्फत पाठवलेला हा शांतता प्रस्ताव इराणने नाकारला आहे. आम्ही हे युद्ध अमेरिकेच्या अटींवर संपवणार नाही. कोणतीही वाटाघाटी आमच्या राष्ट्रीय हिताचा विचार करूनच केली जाईल असं इराणने स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या इशाऱ्याचा इराणवर फारसा प्रभाव दिसत नाही. त्यामुळे ट्रम्प जास्त भडकलेत.
आंतरराष्ट्रीय: पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मात्र, आता पाकिस्तानने तयार केलेला 15 सूत्रीय शांतता प्रस्ताव इराणने नाकारल्याचे समोर आले आहे. युद्धविरामाबाबत कोणतीही चर्चा इराणच्या राष्ट्रीय हितांच्या आधारेच होईल, अशी स्पष्ट भूमिका इराणने घेतली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली.
नांदेड: सोनू कल्याणकर हत्या प्रकरण: अटकेनंतर चौथ्या आरोपीशी पोलिसांची चकमक
सोनू कल्याणकर यांच्या हत्येनंतर नांदेड पोलिसांनी तीन अल्पवयीनांना अटक केली. मुख्य आरोपी अंकुश गंदमवारसोबत चकमक झाली, तो जखमी झाला व त्याला पकडले. जलद कारवाईसाठी पोलिसांचे कौतुक.
व्यापार: कॅन्सर औषधांच्या किमती ५०% ने वाढणार; कंपन्यांची सरकारकडे मोठी मागणी, नेमकं कारण काय..?
कॅन्सरवरील औषधे बनवणाऱ्या औषध कंपन्यांनी सरकारकडे औषधांच्या किमतीत ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची परवानगी मागितली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात प्लॅटिनम धातूच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे कॅन्सर औषधांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या किमतीत उत्पादन तयार करणे कंपन्यांसाठी तोट्याचे ठरत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय: 'काँग्रेसने तेच गाणे गायले, जे पाकिस्तानने लिहिले..', पीएम मोदींची असाममधून टीका
असाममधील बारपेटा येथे निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्ष सैन्याच्या शौर्याचा अपमान करतो आणि त्यांच्या नेत्यांचा पाकिस्तानशी संबंध देशासाठी घातक ठरतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
व्यापार: अमेरिकेत पेट्रोल दरवाढ; ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकन नागरिकांनाच फटका
इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वेगाने वाढ झाली आहे, ज्याचा थेट आणि मोठा फटका अमेरिकेतील सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. अमेरिका हा जगातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश असूनही, तेथील कच्च्या तेलाचा भाव आज ११५ डॉलर प्रति बॅरल या उच्चांकी पातळीवर पोहोचलाय.
व्यापार: सोनं-चांदी महागले: दरात मोठी वाढ; नवे दर तपासा
सोने आणि चांदीच्या किमतीत आज मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या तुलनेत चांदीचा दर ६ हजार रुपयांनी वाढला आहे. 'इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन'नं (IBJA) नवीन किमती जाहीर केल्या आहेत. शुक्रवार ते रविवार सुट्टी असल्यामुळे IBJA नं नवीन दर जारी केले नव्हते, मात्र आज किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.
अन्य क्रीडा: हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
Payal Nag: जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते, याचे ताजे उदाहरण म्हणजे 18 वर्षीय पायल नाग. दोन्ही हात आणि पाय गमावूनही पायल नागने बँकॉक येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, पायलने तिचे प्रेरणास्थान असलेल्या विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन शीतल देवी हिला पराभूत केले.
सखी: गुडघ्यापर्यंत केस वाढवा! आयुर्वेदिक तेलाने मिळवा जाड- लांब केस
केसगळती रोखण्यासाठी घरगुती खास आयुर्वेदिक तेल आणि शाम्पू कसं बनवायचं पाहूया.
आंतरराष्ट्रीय: मध्यपूर्वेतील युद्धात भारत निभावू शकतो मोठी भूमिका; भारताच्या कूटनीतीचे इराणकडून कौतुक
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. इतके दिवस होऊनही युद्धविराम किंवा होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्किए हे देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजून अंतिम करारावर सहमती झालेली नाही. अशातच, इराणने भारताच्या कूटनीतीचे कौतुक केले आणि भारत मोठी भूमिका बजावू शकतो असे म्हटले आहे.
लातुर: लातूर-बीडमध्ये शक्तिपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध तीव्र; आंदोलनाचा निर्धार.
लातूर-बीडमधील 'शक्तिपीठ' महामार्ग आराखड्यात बदलाअभावी शेतकरी संतप्त. इतरत्र बदल असूनही, मूळ आराखडा कायम असल्याने शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, भूमी सर्वेक्षणास नकार आणि आंदोलनाचा निर्धार.
नांदेड: मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या; नांदेड हादरले
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या. पूर्ववैमनस्यातून भरदिवसा झालेल्या हल्ल्याने शहरात तिसऱ्या दिवशीही खुनाचे सत्र सुरूच राहिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
व्यापार: 'ही' कंपनी कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
सामान्यतः नोकरी ही केवळ कर्मचाऱ्यापुरती मर्यादित मानली जाते, परंतु जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलसाठी कर्मचारी हा केवळ एक असेट नसून कुटुंबाचा भाग आहे. कंपनी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाची काळजी घेते आणि आर्थिक मदत सुरू ठेवते. गुगलची मूळ कंपनी 'अल्फाबेट' ही मार्केट कॅपच्या दृष्टीनं जगातील तिसरी मोठी कंपनी आहे.
व्यापार: PPF: सुरक्षित, करमुक्त गुंतवणूक; दरमहा गुंतवणुकीवर उत्तम परतावा
: जर तुम्ही दीर्घकाळासाठी सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच PPF ही एक उत्कृष्ट योजना ठरू शकते. नियमितपणे दरमहा ११,००० रुपये गुंतवल्यास ही योजना तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा देते आणि काळानुसार मोठा निधी तयार करण्यास मदत करते.
व्यापार: कच्च्या तेलाच्या दरात वाढ; ट्रम्प यांच्या धमकीनं सामान्यांचं बजेट कोलमडलं
६ एप्रिल म्हणजेच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळत आहे. क्रूड ऑईलचा दर आता ११२ डॉलर प्रति बॅरलच्या पार गेला असून, आज सकाळी तो ११५ डॉलरपर्यंत पोहोचला होता. ब्रेंट क्रूडची किंमतही ११० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या नवीन धमकीनंतर ही दरवाढ झाली.
क्राइम: राज्याच्या अर्थ खात्यातील अधिकारी लाच घेताना गजाआड
राज्याच्या अर्थ खात्यातील एका अधिकाऱ्याला ६.३७ लाख रुपयांची लाच घेताना अटक झाली. विलास लाड याला खारघरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. यामुळे मंत्रालयातील भ्रष्टाचार उघडकीस आला. या कारवाईने इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.