
व्यापार: रशियाचे तेल स्वस्त, अमेरिकेच्या टॅरिफने भारताला संधी आणि आव्हान
रशियाच्या तेलावरील अमेरिकेचा दबाव वाढत असतानाच भारताला रशियाकडून मोठी सवलत मिळाली. त्यातच भारतीय रिफायनरीसाठी अमेरिकन तेल महाग पडते त्यामुळे अमेरिकेसोबत चर्चा सुरू असल्याचे मंत्री पियूष गोयल यांनी माहिती दिली. टॅरिफमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होत असून भारताला निर्यातीत संधी असल्याचे दिसून आले. भारत-चीन संबंध सामान्य होत असल्याचीही नांदी दिसली.

आंतरराष्ट्रीय: भारत माफी मागेल, चर्चेसाठी टेबलवर येईल; ट्रम्प यांच्या सचिवांची धमकी!
भारताने माफी मागावी आणि चर्चेसाठी तयार राहावे, अशी ट्रम्प यांच्या सचिवांनी धमकी दिली आहे. भारत-अमेरिका संबंध ताणले, कारण भारत रशिया आणि चीनच्या जवळ जात आहे. भारताने अमेरिका किंवा रशिया-चीनमध्ये निवड करावी, अन्यथा ५०% कर भरावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

पुणे: वनराज आंदेकर हत्याकांड: बदला! नाना पेठेत आयुष कोमकरचा खून
पुण्यात वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेण्यात आला आहे. आंदेकर टोळीने नाना पेठेत आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली आहे. आयुष कोमकरचा पिता गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे. या घटनेवरून आंदेकर टोळीतील वनराज आंदेकर यांच्या खूनाचा बदला घेण्याची आग अद्याप धुमसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्यापार: सिगारेट, तंबाखू महागणार! ४०% जीएसटीनंतर 'सेस'चा अतिरिक्त भार?
सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर ४०% जीएसटी व्यतिरिक्त 'सेस' लागू होण्याची शक्यता आहे. कराचा भार कमी करण्यासाठी राखण्यासाठी सरकार विचार करत आहे. लक्झरी गाड्यांवर मात्र कोणताही अतिरिक्त कर ठेवलेला नाही. २८% चा हानिकारक उपकर डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

फुटबॉल: अनोळखी अब्जाधीशाने फुटबॉलपटू नेमारला दिली १० हजार कोटींची संपत्ती!
ब्राझीलमधील एका अनोळखी अब्जाधीशाने फुटबॉलपटू नेमार ज्युनियरला १० हजार कोटींची संपत्ती दान केली! दोघांची कधी भेट झाली नाही. नेमारचे वडिलांशी असलेले चांगले संबंध पाहून हा निर्णय घेतला. कोर्टाची मंजुरी बाकी आहे, या अब्जाधीशाने जूनमध्ये आपले मृत्यूपत्र बनविले होते, त्याला मुलबाळ नव्हते.

राष्ट्रीय: भारताचे पीटर नवारोंना चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने आरोप फेटाळले
पीटर नवारो यांच्या दिशाभूल करणाऱ्या विधानांचे भारताने खंडन केले. भारत-अमेरिका संबंध मजबूत असून ते समान हितसंबंध आणि लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.

महाराष्ट्र: 'तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये...'; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
"कुठलीही कागदपत्रे नसतील, तर तुम्ही कुठल्याही प्रवर्गात (आरक्षणात) प्रवेश करू शकत नाही. तुमच्याकडे अनुसूचित जातीची कागदपत्रे नसतील, तर तुम्ही त्या प्रवर्गात कसे जाल? अनुसूचित जमातीची कागदपत्रे नसतील, तर तर त्या प्रवर्गात कसे जाल?", असे म्हणत बावनकुळे मुद्दा समजावून सांगितला.

महाराष्ट्र: "माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना कारवाईपासून रोखले. त्या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे फिरत आहे. या घटनेबद्दल पवारांनी अखेर मौन सोडले. ते म्हणाले, "कायद्याची अंमलबाजवणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा माझा उद्देश नव्हता. परिस्थिती शांत रहावी याची काळजी घेत होतो.'

आंतरराष्ट्रीय: ट्रम्प यांचा दावा: चीनने भारत, रशियाला आपल्याकडे वळवले!
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिकेने भारत आणि रशियाला चीनमुळे गमावले. SCO परिषदेतील तिन्ही देशांच्या भेटीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. ट्रम्प यांनी भारतावर शुल्क लावले होते. तसेच भारत-पाक युद्ध थांबवल्याचा दावा केला होता. यामुळे भारत अमेरिकेपासून लांब होत चालल्याची भीती आता अमेरिकेला वाटू लागली आहे.

परभणी: हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट!
परभणीतील श्री वक्रतुंड गणेश मंडळाने गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपली. अनावश्यक खर्च टाळून एका गरीब जोडप्याचा विवाह लावून दिला व संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या. गंगाखेड येथील वैष्णवी आणि बीडच्या शुभमचा विवाह मंडपात पार पडला. मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक!

आंतरराष्ट्रीय: ॲपलच्या भारतातील गुंतवणुकीवर ट्रम्प नाराज; टीम कुक यांना म्हणाले...
भारतातील गुंतवणुकीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टीम कुक यांना धारेवर धरले. अमेरिकेत किती गुंतवणूक करणार आहात? असा थेट सवाल त्यांनी केला. त्यावर कुक यांनी ६०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले. ट्रम्प यांनी इतर टेक कंपन्यांच्या प्रमुखांनाही गुंतवणुकीबद्दल विचारले.

महाराष्ट्र: मुस्लीम, शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुख्यमंत्री सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षण नाही, असं म्हणत असले, तरी संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कुणबी म्हणून आरक्षणामध्ये जाणार असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हैदराबाद गॅझेटमुळे सर्वांना आरक्षण मिळेल, अशी भूमिका मांडली. त्याचबरोबर मुस्लीम, आदिवासींसह इतर काही घटकांसाठी मंत्रिमंडळ उपसमित्या स्थापन करण्याची मागणी केली आहे.

मुंबई: धमकीचा मेसेज! मुंबईत ३४ वाहनांमधून आत्मघातकी हल्ला, १४ दहशतवादी घुसले
मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर आत्मघातकी हल्ल्याची धमकी आल्याने खळबळ माजली आहे. मुंबई शहरात ३४ वाहनांमध्ये जवळपास ४०० किलो आरडिएक्स प्लांट केले असून १ कोटीहून अधिक लोकांना मारण्याची ही योजना असल्याचं मेसेजमध्ये उल्लेख आहे. लष्कर ए जिहादीचे १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत असा दावा करण्यात आला आहे. या मेसेजची तात्काळ दखल घेत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही बाब कळवली

सोलापूर: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
अवैध उत्खनन प्रकरणी अजित पवारांनी अधिकारी अंजली कृष्णा यांना कारवाई करण्यापासून थांबवले होते, पण ज्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी हे केले, त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

व्यापार: GST कपातीनंतर दूध, ब्रेड स्वस्त! मोठा दिलासा, महागाई घटणार!
GST दरात कपातीमुळे दूध, ब्रेड, पनीर स्वस्त होणार आहे. सौंदर्य प्रसाधने, चॉकलेटसुद्धा स्वस्त होतील. दूध, भाज्यांवरील GST जैसे थे राहील. दैनंदिन खर्चात मोठी बचत होऊ शकेल. तसेच यामुळे महागाई घटू शकते.

लातुर: लातूर: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात एका नदीच्या काठावर सुटकेस मिळाली होती. पोलिसांना सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह मिळाला होता. या महिलेची हत्या तिच्या पतीनेच केली असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिच्या पतीसह पाच जणांना अटक केली आहे.

राष्ट्रीय: भारताचे सिंगापूरसोबत ५ मोठे करार
भारताने सिंगापूरसोबत मोठे करार केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची गुरुवारी (४ सप्टेंबर २०२५) नवी दिल्लीत भेट झाली. यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये ५ महत्त्वाचे करार झाले. ग्रीन शिपिंगपासून ते अवकाशापर्यंत, भारत आणि सिंगापूर एकत्रितपणे येत्या काळात आशिया-पॅसिफिक प्रदेशाच्या राजकारण आणि अर्थव्यवस्थेला नवीन चालना देतील.

राष्ट्रीय: ADR रिपोर्ट: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले मंत्री अन् हजारो कोटींची संपत्ती
देशातील जवळपास ४७ टक्के (३०२) मंत्र्यांवर गुन्हेगारी प्रकरणे दाखल असून, त्यामध्ये खून, अपहरण आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे असा एडीआरचा रिपोर्ट समोर आला आहे. एडीआरने २७ राज्य विधानसभा, तीन केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील ६४३ मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला. ७२ केंद्रीय मंत्र्यांपैकी २९ (४०%) मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. १९ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे आहेत.

मुंबई: उपमुख्यमंत्र्यांनी धमकी देणे शोभते का?; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या!
अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करू नका असं सांगताना अजित पवारांनी अंजली कृष्णा यांनाही दम दिला. अजित पवारांवर यामुळे टीकेची झोड उठली असून, अंजली दमानिया यांनीही संताप व्यक्त केला. अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

क्रिकेट: रॉस टेलरचा 'यू-टर्न'! न्यूझीलंडनंतर आता 'या' देशातून खेळणार
रॉस टेलरने निवृत्ती मागे घेत सामोआकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडसाठी ४० आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा हा खेळाडू आता सामोआला टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही मोठी बातमी आहे.

क्राइम: आईने २ वर्षांच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, स्वतःही मारली उडी
सुरतमध्ये एका आईने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला इमारतीच्या १३व्या मजल्यावरून खाली फेकले आणि स्वतःही आत्महत्या केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

महाराष्ट्र: मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण नाही: मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी सरकारने स्वीकारलेली नाही, ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनाच लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. या जीआरचा अभ्यास केल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्याला मान्यता दिलेली आहे. हा सरसकट जीआर नसून पुराव्यांचाच जीआर आहे. हे राज्य आहे तोवर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही.

महाराष्ट्र: मुंबईकडे कूच करणारच इतक्यात वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश स्थगित, कारण...
मनसेतून बाहेर पडलेले वैभव खेडेकर ४ सप्टेंबर रोजी भाजपात प्रवेश करणार होते, परंतु ओबीसी व मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. लवकरच नवी तारीख जाहीर होईल, असे खेडेकरांनी सांगितले. आयुष्याची ३० वर्ष विरोधात घालवली. सातत्याने संघर्ष केला. कार्यकर्त्यांनी कधीच सत्तेचा उपभोग घेतला नव्हता. आज सत्तापक्षात जाताना त्यांना आनंद होत आहे असं त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय: जीएसटी कपातीच्या बैठकीत राजकीय रणकंदन; विरोधकांचा कडवा प्रतिकार, मतदानाची शक्यता होती
जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठा राजकीय गदारोळ झाला. विरोधी राज्यांनी महसूल नुकसानीवरून तीव्र विरोध दर्शवला, ज्यामुळे बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. मतदानाची वेळ आल्यावर पश्चिम बंगालने मध्यस्थी करत तोडगा काढला आणि कपातीवर एकमत झाले. २२ सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत.

राष्ट्रीय: पुरामुळे भारत-पाक सीमेचे मोठे नुकसान; ११० किमी कुंपण उद्ध्वस्त
भारत-पाक सीमेवर पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. ११० किमी कुंपण उद्ध्वस्त झाले असून ९० बीएसएफ चौक्या पाण्याखाली गेल्या आहेत. बीएसएफ जवान सतर्क असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. ड्रोन, मोठ्या सर्चलाइट्स, बोटींद्वारे या भागात गस्त घातली जात आहे. पंजाबच्या सर्वच्या सर्व २३ जिल्ह्यांतील १४०० हून अधिक गावे पुराच्या पाण्यात बुडालेली आहेत.

राष्ट्रीय: मणिपूर हिंसा: PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी सरकार आणि कुकी समूहामध्ये शांतता करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 सप्टेंबर रोजी मणिपूर राज्याचा दौरा करण्याची चर्चा आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी सरकारला मोठे यश मिळाले आहे. केंद्र आणि मणिपूर सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर २०२५) कुकी-झो कौन्सिल (केझेडसी) सोबत एक नवीन करार केला आहे, ज्याअंतर्गत सर्व पक्षांनी राज्याची प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग-२ उघडण्यास सहमती दर्शविली आहे.

सोलापूर: महिला आयपीएसला धमकी: अजित पवारांनी राजीनामा द्यावा; नेत्याची मागणी
माढ्यात अवैध उत्खनन रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला अजित पवारांनी धमकावल्याचा आरोप अतुल खुपसे यांनी केला. आठ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

मुंबई: मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, कधी असणार सुट्टी?
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन असून, त्यापूर्वी ईद ए मिलाद असल्याने राज्य सरकारने मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टीमध्ये बदल केला आहे. वार्षिक सुट्ट्या जाहीर करताना शुक्रवारी, ५ सप्टेंबर रोजी ईद ए मिलादची सुट्टी जाहीर केलेली आहे. मात्र, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद ए मिलादची सुट्टी सोमवारी असणार आहे. तशी घोषणा राज्य सरकारने केली आहे.

महाराष्ट्र: भुजबळांच्या शंका दूर करू, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही: CM फडणवीस
मराठा आरक्षणासंदर्भात जो जीआर काढलेला आहे. त्याचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही. एका समाजाचे काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही. छगन भुजबळ आणि इतरांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, असे CM फडणवीस यांनी म्हटले आहे.

व्यापार: UPI ची मर्यादा वाढली; आता 10 लाखांपर्यंत व्यवहार करता येणार
NPCI ने UPI व्यवहाराची मर्यादा 1 लाखावरून 10 लाखांपर्यंत वाढवली आहे. कर भरणा, विमा प्रीमियम आणि गुंतवणुकीसाठी 15 सप्टेंबर 2025 पासून हा बदल लागू असेल. मात्र, P2P व्यवहार मर्यादा 1 लाखच राहील.

महाराष्ट्र: इतनी डेरिंग है तुम्हारी! महिला पोलीस अधिकाऱ्याला अजित पवारांनी खडसावले
सोलापुरात अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करणाऱ्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोनवरून खडसावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात अजित पवार यांनी अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, मात्र कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखण्यास नकार दिला. यामुळे संतप्त पवारांनी "तुम पे अॅक्शन लुंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी. मेरा चेहरा तो पहचानोगी ना..' असं सांगत व्हिडीओ कॉल केला.