महसूलची कारवाई : माणगंगा नदीपात्रात वाळू चोरीचा धडाका सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 17:33 IST2021-05-10T17:29:48+5:302021-05-10T17:33:49+5:30
Crimenews Satara : माण तालुक्यातील माणगंगा नदीपात्रातून वाळू चोरीचा धडाका सुरुच आहे. मात्र तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल कर्मचाऱ्यांनी वाळू माफियांवर कारवायाचा बडगा उगारल्याने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे. देवापूर येथील माणगंगा नदीपात्रातून वाळूची चोरी करणाऱ्या टेंपोवर महसूल विभागाने कारवाई करत वाळू भरलेला टेम्पो व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे.

महसूलची कारवाई : माणगंगा नदीपात्रात वाळू चोरीचा धडाका सुरुच
म्हसवड : माण तालुक्यातील माणगंगा नदीपात्रातून वाळू चोरीचा धडाका सुरुच आहे. मात्र तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल कर्मचाऱ्यांनी वाळू माफियांवर कारवायाचा बडगा उगारल्याने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे. देवापूर येथील माणगंगा नदीपात्रातून वाळूची चोरी करणाऱ्या टेंपोवर महसूल विभागाने कारवाई करत वाळू भरलेला टेम्पो व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे.
याबाबत माहिती अशी की, हिंगणीचे कोतवालांना अवैध्य वाळू तस्करीची माहिती फोनवरून मिळताच पोलीस पाटील व कोतवाल यांनी हिंगणीकडे जाणाऱ्या टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन पळून जाण्याच्या इराद्याने देवापूरकडे निघाले. याची संपूर्ण माहिती माणच्या तहसीलदारांना देताच त्यांच्या आदेशानुसार सर्कल ऑफिसर उमरसिंह परदेशी व देवापूरचे तलाठी आनंदा सूर्यवंशी यांनी कालापट्टा देवापूर याठिकाणी जाऊन सदर वाहन ताब्यात घेतले.
ही कारवाई करत असताना नदी पलिकडे कोतवाल व पोलीस पाटील यांनी दोन दुचाकी नदी पलीकडे लावली होती. कारवाईनंतर परत जाताना त्यांना दोन्हीही गाडीची मोडतोड केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी विशाल पोपट माने (रा. हिंगणी), दाजी शरद येडगे (दोघे रा. हिंगणी) व अनोळखी एका म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केले आहेत.कारवाईत उमरसिंह परदेशी व देवापूरचे तलाठी आनंदा सूर्यवंशी, हिंगणीचे पोलीस पाटील व कोतवाल यांनी सहभाग घेतला.
कोतवाल व पोलीस पाटलांच्या गाड्यांची मोडतोड
टेम्पोवर कारवाई करून माघारी निघालेल्या कोतवाल व पोलीस पाटलांच्या दोन्ही मोटर सायकलचे अज्ञाताने नुकसान केले आहे. निर्ढावलेल्या वाळू तस्करांचा कायम स्वरुपी बंदोबस्त होण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी जनतेतून होत आहे. माणमध्ये यापूर्वीही जिवे मारण्यापर्यंत हल्ले झाले आहेत.
कोरोनाशी सामना करावा लागत असताना तहसीलदार व त्यांच्या पथकाने अवैध्य तस्करीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला. वाळू तस्करांनी महसूल मधील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून म्हसवड शिरताव, देवापूर याठिकाणी नदीपात्र पोकरण्यास सुरूवात केली.