Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 21:13 IST2025-10-24T21:11:37+5:302025-10-24T21:13:04+5:30
Satara Phaltan Suicide: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करत असलेल्या एका महिला डॉक्टराने गुरुवारी (२३ ऑक्टोबर २०२५) रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली. या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना या घटनेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महिला डॉक्टरला आत्महत्या करण्यास भाग पाडणे, ही अतिशय दुर्दैवी घटना असून, त्यांनी थेट एका पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
Nagpur, Maharashtra: Former Minister Anil Deshmukh says, "The incident that occurred unnecessarily, in which a police officer harassed a female doctor, and as a result of that harassment, the female doctor was forced to commit suicide, is a very serious and extremely unfortunate… pic.twitter.com/2tcl2VC8xO
— IANS (@ians_india) October 24, 2025
अनिल देशमुख म्हणाले की, "एका पोलीस अधिकाऱ्याला असे कृत्य करण्याचे धाडस कसे होऊ शकते? पोलीस नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आहेत. जर पोलिसांचे सदस्य स्वतः अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असतील, तर ते इतरांना न्याय कसा मिळवून देऊ शकतील?", असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तात्काळ कारवाईची मागणी
"एका पोलीस अधिकाऱ्याच्या कथित लैंगिक अत्याचारामुळे एका महिलेने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. ही अत्यंत गंभीर बाब आहे. राज्य सरकारने हा मुद्दा खूप गांभीर्याने घेतला पाहिजे. जर पोलीस अधिकाऱ्यांना अशी कृत्ये करण्यास धाडस वाटत असेल, तर ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या पायालाच धोका निर्माण करू शकतात. म्हणून, राज्य सरकारने कठोर आणि तात्काळ कारवाई केली पाहिजे", अशीही त्यांनी मागणी केली.
नेमके प्रकरण काय?
संबंधित महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या हातावर एक सुसाईड नोट लिहिली. या नोटमध्ये त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला. एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केला. तर, दुसऱ्या व्यक्तीने आपला सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळामुळे आणि मानसिक त्रासामुळेच आपण आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे तिने नोटमध्ये नमूद केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.