Satara: विविध नावांची वेगवेगळे कागदपत्रे, भिलकटी येथे बेकायदा वास्तव्य करणारी बांगलादेशी महिला ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:08 IST2025-07-02T14:07:35+5:302025-07-02T14:08:14+5:30

भिलकटी गावचे मतदान कार्ड..

Bangladeshi woman residing illegally in Bhilkati Taluka Phaltan taken into police custody | Satara: विविध नावांची वेगवेगळे कागदपत्रे, भिलकटी येथे बेकायदा वास्तव्य करणारी बांगलादेशी महिला ताब्यात

Satara: विविध नावांची वेगवेगळे कागदपत्रे, भिलकटी येथे बेकायदा वास्तव्य करणारी बांगलादेशी महिला ताब्यात

फलटण : भिलकटी (ता. फलटण) येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेली बांगलादेशी महिला पोलिसांना आढळून आली. काटून एमएसटी एंजेला असे पासपोर्टवर त्या महिलेचे नाव असून, तिच्याकडे विविध नावांची वेगवेगळी कागदपत्रे मिळाली. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना जिल्हा विशेष शाखेकडून फलटण तालुक्यात व्हिसाची मुदत ८ जुलै २४ संपल्यानंतरही एक विदेशी महिला वास्तव करत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर फलटण पोलिस भिलकटी येथे चौकशीसाठी गेले. त्यांना तेथे काटून एमएसटी एंजेला नावाची बांगलादेशी महिला हाजीर राजा साहब शेख (रा. निकमवस्ती, भिलकटी, ता. फलटण) या व्यक्तीसोबत राहत असल्याचे आढळून आले. त्या महिलेकडे कागदपत्रांची तपासणी करून अधिक माहिती घेतली असता तिच्याकडे सलमा काटून असे तेलंगणा राज्याचे आधार कार्ड आढळून आले.

तिच्याकडे सलमा हाजीर शेख या नावाचे महाराष्ट्र राज्याचेही आधार कार्ड आढळून आले. त्याचबरोबर कुरेश मज्जिद फलटण (कुरेशनगर, ता. फलटण) यांच्याकडील निकाह प्रमाणपत्र आढळले. त्यावर ''दुल्हे का नाम हाजीर राजा साहब शेख (रा. निकम वस्ती, भिलकटी, ता. फलटण), तसेच दुल्हन का नाम सलमा हाजी मोहम्मद सरदार (रा. सोलापूर)'' असे आढळून आले.

जन्म तारखांमध्येही विसंगती..

बांगलादेशाच्या पासपोर्टच्या झेरॉक्स प्रतीवर काटून एमएसटी एंजेला असे या महिलेचे नाव आढळले. ९ जुलै २०१९ ला काढलेल्या पासपोर्टची मुदत ८ जून २०२४ ला संपली आहे. या महिलेकडे बांगलादेशचे मतदान कार्डची कलर झेरॉक्स प्रतही सापडली आहे. तिच्याकडे सापडलेल्या पासपोर्ट, महाराष्ट्र राज्य आधार कार्ड व तेलंगणा राज्य आधार कार्ड यावर असलेल्या जन्म तारखेमध्ये विसंगती आढळून आली.

भिलकटी गावचे मतदान कार्ड..

मुदत संपूनही व्हिसाचे नूतनीकरण न करता बेकायदेशीर व बिगरपरवानगीने भिलकटी येथे संबंधित महिलेचे वास्तव्य असल्याचे आढळले. त्या महिलेकडे भिलकटी (ता. फलटण) येथील मतदान कार्डही आढळून आले आहे. संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे विविध ओळखपत्रे..

  • तेलंगणा राज्याचे आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे आधार कार्ड
  • भिलकटी येथील मतदान ओळखपत्र
  • कुरेशीनगर (ता. फलटण) येथील निकाह प्रमाणपत्र


वेगवेगळी नावे..

  • बांगलादेशी पासपोर्टवर : काटून एमएसटी एंजेला
  • तेलंगणा आधार कार्ड : सलमा काटून
  • महाराष्ट्र आधार कार्ड : सलमा हाजीर शेख
  • निकाह प्रमाणपत्र : सलमा हाजी मोहम्मद सरदार

Web Title: Bangladeshi woman residing illegally in Bhilkati Taluka Phaltan taken into police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.