बाणगंगा नदीत पोहण्यास गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 15:01 IST2022-10-02T14:58:27+5:302022-10-02T15:01:37+5:30
पद्मावती मंदिरा समोरील बाणगंगा नदीत जास्त पाणी असलेल्या डोहाजवल पोहण्यासाठी गेले होते.

बाणगंगा नदीत पोहण्यास गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू
फलटण (प्रतिनिधी) - फलटण शहरालगत ठाकूरकी (तालुका फलटण) गावच्या हद्दीत बाणगंगा नदीमध्ये पोहायला गेलेल्या एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. सुदैवाने एकाला वाचविण्यात यश आले आहे. मृत मुलाचे नाव अथर्व मांढरे (वय 15) असे असल्याचे समजते.
फलटण शहरातील बुधवार पेठ आणि शुक्रवार पेठ येथील पाच शालेय मुले आज सकाळी अकराच्या दरम्यान शहरानजीक ठाकूरकी गावच्या हद्दीत पद्मावती मंदिरा समोरील बाणगंगा नदीत जास्त पाणी असलेल्या डोहाजवळ पोहण्यासाठी गेले होते. त्यामध्ये दोघेजण पोहत असताना बुडू लागल्याने बाकीचे तीन जण पळून गेली तेथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी दोघेजण बुडत असल्याचे पाहून पाण्यात उड्या टाकल्या, त्यातील एकाला वाचविण्यात यश आले. तर दुसरा पाण्यात बुडाला दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे.