Sangli: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कार्यकर्त्यांसाठी संजयकाका म्हणतील तेच धोरण..!, भाजपची वाट बिकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 19:16 IST2025-04-28T19:15:55+5:302025-04-28T19:16:23+5:30

राष्ट्रवादी पुनर्वसन करणार का? 

Sanjay Kaka Patil will say the same policy for the workers in Tasgaon Kavathe Mahankal, BJP's path is difficult | Sangli: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कार्यकर्त्यांसाठी संजयकाका म्हणतील तेच धोरण..!, भाजपची वाट बिकट

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कार्यकर्त्यांसाठी संजयकाका म्हणतील तेच धोरण..!, भाजपची वाट बिकट

दत्ता पाटील

तासगाव : माजी खासदार संजयकाका पाटील सध्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी करायचे आहे, असे वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले होते. त्यामुळे संजय काकांच्या भाजप वापसी बाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचे पडसाद तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमटणार आहेत. या मतदारसंघात संजय काकांच्या कार्यकर्त्यांची भूमिका ''काका म्हणतील तेच धोरण'', अशी राहिलेली आहे. त्यामुळे जी भूमिका संजयकाका घेतील तीच भूमिका कार्यकर्ते पार पाडतील हा इतिहास आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर संजयकाकांनी भाजपच्या वापसीसाठी प्रयत्न केले होते. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजयकाकांच्या घर वापसीला सोमवारी ब्रेक लावला. त्यामुळे संजयकाकांची आगामी राजकीय वाटचाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सुरू राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

तसे झाल्यास भाजपसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाटचाल बिकट होणार आहे. यापूर्वी माजी खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. तासगाव नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला होता. कवठेमहांकाळ नगरपंचायतीत देखील भाजपची सत्ता आहे.

मात्र येणाऱ्या काळात राजकीय समीकरणे बदलली, तर भाजपला अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. नुकत्याच झालेल्या भाजपच्या कार्यकारणीत काका समर्थकांचा समावेश नाही. बहुतांश निवडी करताना जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे संजय काका गटाची आजवरची राजकीय वाटचाल ''काका म्हणतील तेच धोरण'' या पद्धतीने राहिली आहे. त्याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटतील, हे नक्की.

राष्ट्रवादी पुनर्वसन करणार का? 

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या काळात मोठी राजकीय उलथापालथ झाली. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी घेतली. त्याचवेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनीही पाटील यांना पाठिंबा देत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतले. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय काकांना निवडून दिल्यानंतर घोरपडे यांना विधानपरिषद देण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ''एक मत दोन आमदार'' असा जोरदार प्रचारही झाला होता. त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुनर्वसनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीकडून संजय काकांचे पुनर्वसन होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

माजी खासदार संजय पाटील यांनी मागील दहा वर्षात खासदारकीच्या काळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याची भूमिका घेतली होती. विधानसभा निवडणुकीत तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कार्यकर्त्यात काही प्रमाणात संभ्रमावस्था आहे. मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमच्यासाठी संजयकाका सांगतील तेच धोरण अंतिम असेल. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संजयकाका लवकरच भूमिका स्पष्ट करतील. - सुनील जाधव, माजी तालुकाध्यक्ष, भाजपा.

Web Title: Sanjay Kaka Patil will say the same policy for the workers in Tasgaon Kavathe Mahankal, BJP's path is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.