Sangli: पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून, चार जणांना अटक; आरोपीच्या घरावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:19 IST2025-06-04T16:19:16+5:302025-06-04T16:19:45+5:30

जत : जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अचकनहळ्ळी येथे पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून हिरोल उर्फ बाबू मल्लाळकर (वय ...

Sangli: Brutal murder of a young man over a letter shed, four people arrested; Attack on the accused's house | Sangli: पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून, चार जणांना अटक; आरोपीच्या घरावर हल्ला

Sangli: पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून, चार जणांना अटक; आरोपीच्या घरावर हल्ला

जत : जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अचकनहळ्ळी येथे पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून हिरोल उर्फ बाबू मल्लाळकर (वय २६) याचा लाकडी दांडके डोक्यात मारून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी मंजुनाथ नारायण काळे (वय २५), कऱ्याप्पा रामाण्णा कग्गोड, सावित्री नारायण काळे आणि चंदाबाई कऱ्याप्पा कग्गोड (सर्व रा.अचकनहळ्ळी, ता.जत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

गावात गायरान जागेवर आरोपी आणि हिरोल मल्लाळकर एकमेकाचे शेजारी आहेत. पत्र्याची शेड मारण्याच्या कारणावरून आणि रस्त्याच्या वाटेसाठी झालेल्या वादातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. मल्लाळकर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पत्र्याची शेड मारत असताना हिरोल याने त्याला विरोध केला. त्याचा राग आल्याने आरोपींनी त्यास धक्काबुक्की केली. यावेळी मंजुनाथ काळे याने लाकडी दांडक्याने हिरोल याच्या डोक्यात, पाठीवर जोरदार मारहाण केली.

या मारहाणीत हिरोल याचा मृत्यू झाला. हिरोल हा मृत झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनीही काळे याच्या घरावर हल्ला करून घरातील साहित्याची तोडफोड केली, तसेच घरापुढे असलेल्या टेम्पोच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले. त्यामुळे मंगळवारी सकाळी आरोपीच्या घरापुढे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

घटनेची माहिती ग्रामस्थांनी जत पोलिसांना दिली. तत्काळ जत पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मंगळवारी पहाटे विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

या प्रकरणी मृताची आई सावित्री रामचंद्र मल्लाळकर यांनी चार जणांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री उशिरा या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.

सात दिवसांची पोलिस कोठडी

अचकनहळ्ळी येथील हिरोल मल्लाळकर खूनप्रकरणी चार आरोपींना मंगळवारी जत येथील न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले. न्यायालयाने या चार संशयित आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Sangli: Brutal murder of a young man over a letter shed, four people arrested; Attack on the accused's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.