कर्तव्यावर असताना चक्कर येऊन पडले, मिरजेत पोलिसाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:27 IST2024-09-19T12:27:12+5:302024-09-19T12:27:49+5:30

मिरज (जि. सांगली) : मिरजेत शहर पोलिस ठाण्यात अचानक चक्कर येऊन पडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेले पोलिस शिपाई सुशांत ...

policeman died due to dizziness while on duty in miraj sangli | कर्तव्यावर असताना चक्कर येऊन पडले, मिरजेत पोलिसाचा मृत्यू

कर्तव्यावर असताना चक्कर येऊन पडले, मिरजेत पोलिसाचा मृत्यू

मिरज (जि. सांगली) : मिरजेत शहर पोलिस ठाण्यात अचानक चक्कर येऊन पडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेले पोलिस शिपाई सुशांत जाधव (वय ३०) यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गणेशोत्सवादरम्यान शहर पोलिस ठाण्यात एक खिडकी योजनेकडे कार्यरत जाधव यांना दोन दिवसांपूर्वी अचानक चक्कर येऊन पडल्याने मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते.

तेथून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान मंगळवारी रात्री सुशांत यांचा मृत्यू झाला. जाधव हे १२ वर्षांपूर्वी पोलिस दलात दाखल झाले होते.

Web Title: policeman died due to dizziness while on duty in miraj sangli