Sangli Municipal Election 2026: महापालिकेच्या मैदानात राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा, प्रचारात भरणार रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:56 IST2026-01-06T16:54:07+5:302026-01-06T16:56:19+5:30

मुख्यमंत्र्यांनंतर आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभेचे नियोजन 

Planning for state-level leaders' meetings, rallies and gatherings for the Sangli Municipal Corporation elections has also begun | Sangli Municipal Election 2026: महापालिकेच्या मैदानात राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा, प्रचारात भरणार रंग

Sangli Municipal Election 2026: महापालिकेच्या मैदानात राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा, प्रचारात भरणार रंग

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फुटू लागले आहेत. मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू असताना, राजकीय पक्षांनी वरिष्ठ नेत्यांच्या सभा, बैठका, रॅलींचे नियोजनही सुरू केले आहे. भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेनेनी राज्यपातळीवरील नेत्यांना महापालिका निवडणूक मैदानात उतरविण्याची तयारी चालविली आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा प्रचार शुभारंभ झाला. आता उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासह काही नेते प्रचारसभा घेणार आहेत.

सध्या भाजपच्या प्रचाराची धुरा आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जयश्री पाटील, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पवार यांनी सांभाळली आहे. तर काँग्रेसच्या उमेदवारासाठी आमदार डाॅ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांनी पदयात्रा काढल्या. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून आमदार जयंत पाटील यांनी मतदारांशी संवाद सुरू केला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासाठी आमदार इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे प्रचार करीत आहेत. उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून प्रचार सुरू केला असून आता राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा पुढील आठवड्यात होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मारुती चौकात सभा होणार आहे.

वाचा : सकाळी पदयात्रा, दुपारी बैठका आणि रात्री कोपरासभा; प्रचाराचे रान तापले

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार गोपीचंद पडळकर, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध नेत्यांना प्रचारात आणले जाणार आहे. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सना मलिक, तर शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे.

भाजपची ‘वाॅर रूम’ सज्ज

महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणाऱ्या भाजपने प्रमुख प्रचार कार्यालयात ‘वॉर रूम’ बनवली आहे. राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभेचे नियोजन, सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा ‘वाॅर रूम’मधून सांभाळली जात आहे. याशिवाय विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठीची यंत्रणाही या वॉर रूममध्ये उभारली जात आहे. प्रभागनिहाय ‘रोड शो’ आणि रॅलीचे वेळापत्रकही ठरवले जात आहे.

Web Title : सांगली नगर निगम चुनाव 2026: राज्य स्तरीय नेताओं की रैलियां, प्रचार में रंग

Web Summary : सांगली नगर निगम चुनाव प्रचार में राज्य स्तरीय नेता शामिल होंगे। भाजपा, कांग्रेस, और शिवसेना रैलियों की योजना बना रही हैं। मतदाता संपर्क और विरोधियों के दावों का जवाब देने पर ध्यान केंद्रित किया जा रहा है।

Web Title : Sangli Municipal Election 2026: State Leaders to Rally, Campaign Heats Up

Web Summary : Sangli municipal election campaigns gain momentum with state leaders joining rallies. BJP, Congress, and Shiv Sena plan meetings. Focus is on voter outreach and countering opposition claims via war rooms.