अजित पवार यांच्या वक्तव्याला जनता उत्तर देईल : रोहित पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 12:15 IST2024-10-30T12:14:09+5:302024-10-30T12:15:32+5:30

तासगाव: आर. आर. आबा प्रामाणिकपणे, स्वच्छपणे काम करत होते. महाराष्ट्रात गृहमंत्रिपदी असताना पारदर्शक भरती करून घेतली. अत्यंत सक्षमपणे त्यांनी ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 People will respond to Ajit Pawar statement says Rohit Patil | अजित पवार यांच्या वक्तव्याला जनता उत्तर देईल : रोहित पाटील

अजित पवार यांच्या वक्तव्याला जनता उत्तर देईल : रोहित पाटील

तासगाव: आर. आर. आबा प्रामाणिकपणे, स्वच्छपणे काम करत होते. महाराष्ट्रात गृहमंत्रिपदी असताना पारदर्शक भरती करून घेतली. अत्यंत सक्षमपणे त्यांनी गृहमंत्रिपद सांभाळले. आज आबांना जाऊन साडेनऊ वर्षे झाली. आज त्यांच्यावर आरोप झाले, ते पाहून अतिशय दु:ख झाले. 

वाचा- आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार

अजित पवार ज्येष्ठ आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केले आहे. त्यांनी जे आरोप केले, ते कुटुंब म्हणून वाईट वाटले. आबा हयात असते तर आबांनी त्याला उत्तर दिले असते. आबांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला, यावेळी त्यांना मोठमोठ्या ऑफर असताना डान्स बार बंदीवर ते ठाम राहिले. महाराष्ट्रातील विचारांचे संरक्षण झाले पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला. या वक्तव्याच्या विरोधात जनता उत्तर देईल, असं सांगत आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 People will respond to Ajit Pawar statement says Rohit Patil