Sangli: मिरजेत सावकार महिलेच्या पतीवर हल्ला, डोक्यात रॉडचा वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:59 IST2025-07-22T12:59:35+5:302025-07-22T12:59:51+5:30

हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही

Husband of moneylender attacked in Miraj sangli, seriously injured | Sangli: मिरजेत सावकार महिलेच्या पतीवर हल्ला, डोक्यात रॉडचा वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी

Sangli: मिरजेत सावकार महिलेच्या पतीवर हल्ला, डोक्यात रॉडचा वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी

मिरज : मिरजेत शहर बसस्थानकाजवळ अकिब जमादार या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. रॉडचा घाव वर्मी बसल्याने त्याला गंभीर जखमी अवस्थेत मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अकिब जमादार याची पत्नी पोलिस रेकॉर्डवरील खासगी सावकार आहे. पत्नीच्या सावकारी रकमेच्या देवाणघेवाणीच्या वादातून अकीब जमादार याच्यावर सोमवारी रात्री आठ वाजता बसस्थानकाजवळ एकाने रॉडने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. 

सावकारी देवाण-घेवाणीतून हा हल्ला झाल्याची चर्चा होती. मात्र, या हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Husband of moneylender attacked in Miraj sangli, seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.