Sangli Municipal Election Results 2026: वसंतदादा घराण्याची महापालिकेत ‘एंट्री’; हाय होल्टेज लढतीत हषवर्धन पाटलांनी मारली बाजी

By अविनाश कोळी | Updated: January 16, 2026 16:43 IST2026-01-16T16:42:53+5:302026-01-16T16:43:44+5:30

खासदार विशाल पाटील यांनी भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडवला

Harshvardhan the nephew of former Chief Minister Vasantdada Patil, defeated the BJP candidate from ward number 11 In the Sangli Municipal Corporation | Sangli Municipal Election Results 2026: वसंतदादा घराण्याची महापालिकेत ‘एंट्री’; हाय होल्टेज लढतीत हषवर्धन पाटलांनी मारली बाजी

Sangli Municipal Election Results 2026: वसंतदादा घराण्याची महापालिकेत ‘एंट्री’; हाय होल्टेज लढतीत हषवर्धन पाटलांनी मारली बाजी

सांगली : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आणि ‘हाय होल्टेज’ लढत म्हणून उत्कंठा वाढवणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ मधील लढतीत वसंतदादा पाटील यांचे पणतू हषवर्धन पाटील यांनी विजयी मिळवला. हषवर्धन यांनी भाजपचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांचा पराभव केला. दादा घराण्याकडून प्रथमच महापालिका निवडणूक लढवून हर्षवर्धन यांनी महापालिकेत ‘एंट्री’ केली. त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला.

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील विरूद्ध मनोज सरगर यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. खासदार विशाल पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या मनोज सरगर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला आव्हान दिले होते. तर खासदार विशाल पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. 

वाचा : भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांना धक्का, सांगलीवाडी येथील प्रभाग १३ मध्ये धक्कादायक निकालाची नोंद 

दरम्यानच खासदार पाटील यांनी भाजपमधून तिकिट न मिळालेल्या काही इच्छुकांना आपल्याकडे वळवून घेत राजकीय चाल खेळली. तरी देखील मनोज सरगर यांनी जोरदार टक्कर दिली. त्यांच्या प्रचारात भाजपचे नेते, पदाधिकारी उतरले होते. परंतू खासदार पाटील यांच्या खेळीपुढे भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला. त्यांनी पुतणे हर्षवर्धन याच्याबरोबर इतर तीन उमेदवारांना निवडून आणत करिश्मा दाखवला. 

Web Title : सांगली महानगरपालिका में वसंतदादा परिवार की एंट्री; हर्षवर्धन पाटिल जीते!

Web Summary : वसंतदादा पाटिल के पोते हर्षवर्धन पाटिल ने भाजपा के मनोज सरगर को हराकर सांगली महानगरपालिका चुनाव जीता। यह दादा परिवार की महानगरपालिका में एंट्री है। सांसद विशाल पाटिल की रणनीति से भाजपा पैनल की हार हुई, हर्षवर्धन और तीन अन्य की जीत सुनिश्चित हुई।

Web Title : Vasantdada Family Enters Sangli Municipal Corporation; Harshvardhan Patil Wins!

Web Summary : Harshvardhan Patil, grandson of Vasantdada Patil, won the Sangli Municipal Corporation election, defeating BJP's Manoj Sargar. This marks the Dada family's entry into the corporation. MP Vishal Patil's strategy led to a BJP panel defeat, securing victory for Harshvardhan and three others.