Sangli: मिरजेत मुलांच्या भांडणातून हवेत गोळीबार; एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:23 IST2025-01-28T14:23:05+5:302025-01-28T14:23:40+5:30
मिरज (जि. सांगली) : फुटबॉल खेळताना मुलांत झालेल्या भांडणाचा वाद विकोपाला जाऊन मिरजेत इसापुरे गल्लीत भर वस्तीत हवेत गोळीबार ...

Sangli: मिरजेत मुलांच्या भांडणातून हवेत गोळीबार; एकास अटक
मिरज (जि. सांगली) : फुटबॉल खेळताना मुलांत झालेल्या भांडणाचा वाद विकोपाला जाऊन मिरजेत इसापुरे गल्लीत भर वस्तीत हवेत गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी दस्तगीर शौकत बावा (वय ३५) या गॅस डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. रविवारी रात्री इसापुरे गल्लीत ही घटना घडली.
मिरजेत फुटबॉल खेळताना मैदानावर दस्तगीर बावा याच्या मुलाचा इतर मुलांसोबत किरकोळ कारणातून वाद झाला. त्यानंतर हे प्रकरण दोन गटांत मिटविण्यात आले. मात्र, रात्री आठ वाजता इसापुरे गल्लीत दुसऱ्या गटाने दस्तगीर बावा याच्या घराकडे जाऊन काही तरुणांनी तलवार, काठीने हल्ला केला.
यावेळी शौकत बावा याने हवेत गोळीबार करून हल्लेखोरांना पळवून लावले. याची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हवेत गोळीबार करणाऱ्या दस्तगीर बावा यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गोळीबारासाठी वापरलेले गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले.