LokSabha2024: सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ९,१६० मतदान यंत्रे पोच

By अशोक डोंबाळे | Published: May 6, 2024 05:56 PM2024-05-06T17:56:36+5:302024-05-06T17:57:14+5:30

छुप्या प्रचारावर भरारी पथकाचा वॉच

9,160 voting machines reach polling booths in Sangli district | LokSabha2024: सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ९,१६० मतदान यंत्रे पोच

LokSabha2024: सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ९,१६० मतदान यंत्रे पोच

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मंगळवार, दि. ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. हे मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. मतदानाची बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन्स असे नऊ हजार १६० यंत्रे मतदान केंद्रावर एसटी बसेसने पोच केली आहेत. आठ हजार ५२ कर्मचाऱ्यांची मतदानासाठी नियुक्ती केली आहेत.

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी चार हजार ३७५ बॅलेट युनिट, दोन हजार ३०४ कंट्रोल युनिट, तर दोन हजार ४८१ व्हीव्हीपॅट मशीन्स आहेत. मतदान यंत्रे आणि आठ हजार ५२ कर्मचाऱ्यांना घेऊन २९२ बसेस मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ, जत या सहा विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळीच रवाना झाल्या आहेत. 

आज, सोमवारी सकाळपासूनच सांगलीतील तरुण भारत मैदानावर व मिरजेतील शासकीय गोदामातून लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतपेट्या वाटप करण्याचे काम सुरू आहे. मतपेट्या गावोगावी पोहोच करण्यासाठी एसटी बसेसची मदत घेण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्राच्या मतदान अधिकारी यांच्या हातात मतपेट्या, बॅलेट युनिट व आवश्यक ते साहित्य देण्यात आले. पोलिस बंदोबस्तात हे साहित्य मतदान केंद्रावर पोहोच केले आहे.

असे आहेत मतदार

सांगली लोकसभेसाठी १८ लाख ६८ हजार १७४ मतदारसंख्या असून, यामध्ये पुरुष नऊ लाख ५३ हजार ७८५, तर महिला नऊ लाख १५ हजार २६ आणि तृतीयपंथीय १२४ मतदार आहेत. प्रशासनाने ७५ टक्केपर्यंत मतदान करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे.

छुप्या प्रचारावर ६८ भरारी पथकाचा वॉच

जिल्ह्यातील मतदान केंद्र आणि मतदान होण्यापूर्वी व्हिडीओ चित्रीकरण टीमसह ६८ भरारी पथके प्रशासनाने नियुक्त केले आहेत. मतदान होण्यापूर्वी एक दिवस प्रचार यंत्रणा थांबली असतानाही वेगवान घडामोडी होत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही आर्थिक गैरव्यवहार होऊ नयेत, म्हणून ६८ भरारी पथकांचा वॉच असणार आहे.

प्रशासनाकडून नियोजन

विधानसभा मतदारसंघ - मतदान केंद्र संख्या - कर्मचारी संख्या
मिरज - ३०९  - १३६०
सांगली  - ३०८  -   १३५५
पलूस-कडेगाव - २८५ -  १२५४
खानापूर  - ३४८ - १५३१
तासगाव-क. महांकाळ - २९९  -  १३१६
जत -  २८१  - १२३६

Web Title: 9,160 voting machines reach polling booths in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.