Sangli: ट्रकची एसटीला पाठीमागील बाजूस जोरदार धडक, १९ प्रवासी जखमी; अकरा विद्यार्थ्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:16 IST2025-01-08T13:15:56+5:302025-01-08T13:16:15+5:30

मिरज : मिरज -पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे एस.टी. व ट्रक अपघातात १९ प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमीत ११ ...

19 passengers injured in ST and truck accident at Tanang Phata on Miraj Pandharpur road | Sangli: ट्रकची एसटीला पाठीमागील बाजूस जोरदार धडक, १९ प्रवासी जखमी; अकरा विद्यार्थ्यांचा समावेश

Sangli: ट्रकची एसटीला पाठीमागील बाजूस जोरदार धडक, १९ प्रवासी जखमी; अकरा विद्यार्थ्यांचा समावेश

मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे एस.टी. व ट्रक अपघातात १९ प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमीत ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.

अपघातात धनश्री प्रमोद कांबळे, अरमान शाहीर मुलाणी, रोहिणी मल्लिकार्जुन साळुंखे, विराज विशाल बडोनी, कुणाल विनोद साबळे, अभिजित अनिल करपे, शुभम रमाकांत कांबळे, आदिराज आनंद सुर्वे, रूपाली मृत्युंजय हिरेमठ, मृत्युंजय सिद्धमल्ल्या हिरेमठ, संस्कार विकास कांबळे, सुमित शिवाजी बनसोडे, प्रज्ज्वल लहू काळे, समर्थ शैलेश माने, निखिल चंद्रकांत सपकाळ, राहुल सुनील कांबळे, प्रेम उमेश मागाडे, अर्पणा राजेश कांबळे व अन्य एक जखमी झाले. एस.टी. मिरजेतून जतकडे जात होती.

एस.टी. तानंग फाटा येथे आली असता राष्ट्रीय महामार्गावरून मिरजेकडे वळण घेणाऱ्या ट्रकने एस.टी.ला पाठीमागील बाजूने जोरदार धडक दिली. यामुळे एस.टी.त पाठीमागील बाजूस बसलेले १९ जण जखमी झाले. जखमीत विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. या अपघातामुळे मात्र वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Web Title: 19 passengers injured in ST and truck accident at Tanang Phata on Miraj Pandharpur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.