सध्याच्या धावपळीच्या जगात कामाच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला सतत एकाच जागी बसून राहावे लागते. यामुळे पोटाचा घेर वाढणं ही एक सामान्य समस्या बनली आहे.(belly fat reduction) पोटावरची चरबी ही आपल्या सौंदर्यात अडथळा ठरत नसली तरी अनेक आजारांना निमंत्रण देण्याचे काम करते. (foods to reduce belly fat)
वजन कमी करायचं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ते म्हणजे तासनतास जीममध्ये घाम गाळणं किंवा कडक डाएट करुन उपाशी राहणं.(how to lose tummy fat) कामाच्या गडबडीमुळे आपल्या व्यायाम करायला तितका वेळ मिळत नाही. चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर देखील परिणाम होतो.(flat stomach foods) सतत व्यायामाचे टेन्शन घेण्यापेक्षा आहारातील काही गोष्टी बदलल्या तर आपले वजन नक्कीच कमी होऊ शकते. त्यासाठी आपल्याला रोजच्या जेवणात कोणते ५ पदार्थ असायला हवे पाहूया.
दूध तापवताना घाला २ गोष्टी; येईल जाडजूड साय आणि ३ दिवसात मिळेल भरपूर दाणेदार- रवाळ तूप
आपण वजन कमी करण्यासाठी लो-कार्ब्स फूड खायला हवे. आहारातील कार्बोहायड्रेटसचे प्रमाण कमी करुन प्रथिनांचे आणि निरोगी फॅट्सचे प्रमाण वाढवा. आपण आहारात कमी कर्बोदके जेव्हा खातो तेव्हा शरीरात साठवलेल्या चरबीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ज्यामुळे पोटाचा घेर वेगाने कमी होतो. त्यासाठी वजन कमी करण्यासाठी आपल्याला उपाशी राहण्याची गरज नाही, फक्त योग्य पदार्थांची निवड करायची आहे.
कमी कार्ब्सयुक्त आहारात आपण भात, चपाती, ब्रेड, पास्ता आणि मिठाईसारखे पदार्थ कमी खायला हवे. शरीराला कमी कार्बयुक्त पदार्थ मिळतात तेव्हा चरबी कमी होण्यास मदत होते. आपण वजन कमी करण्यासाठी हे केले तर आपल्याला भूक कमी लागेल. गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होईल आणि हळूहळू वजनही कमी होते.
वजन कमी करण्यासाठी आपण आहारात हिरव्या भाज्या खायला हव्या. पालक, मेथी, फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली आणि दुधी भोपळा यांचा समावेश करा. यात फायबर जास्त आणि कार्ब्स कमी असतात. प्रथिनांसाठी आपण डाळी, कडधान्ये, पनीर, अंडी आणि सोयाबीन खाऊ शकतो. प्रथिने खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. ज्यामुळे आपल्याला सारखी भूक लागत नाही.
बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया आणि चिया सीड्स हे आरोग्यदायी फॅट्स देतात. ज्यामुळे आपल्या पोटाची चरबी वितळण्यास मदत होते. आपण जर फळे खात असू तर आंबा, केळी यांसारख्या गोड फळांऐवजी संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी किंवा टरबूज खा. यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. बिस्किटे, व्हाईट ब्रेड आणि मिठाई पूर्णपणे टाळा. हे पदार्थ रक्तातील इन्सुलिन वाढवतात आणि चरबी साठवतात. जेवण्याच्या अर्धा तासाआधी पाणी प्या, ज्यामुळे आपल्याला भूक कमी लागेल आणि पचन सुधारेल. रात्रीच्या जेवणात चपाती किंवा भाताऐवजी सूप किंवा सलाद खा. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
