Kitchen Tips : किचन घरातील एक अशी जागा आहे जिथे रोज वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून कितीतरी कामे केली जातात. कधी दूध उसू जाऊ नये म्हणून काही केलं जातं, तर कधी भाजी खराब होऊ नये म्हणून अजून काही केलं जातं. रोज कितीतरी ट्रिकने महिलांना किचनमधील कामात बरीच मदत मिळते. सध्या अशीच एक ट्रिक ट्रेंडमध्ये आहे. ती म्हणजे फ्रीजरमध्ये स्टीलचा चमचा ठेवणे. आता फ्रीजरमध्ये स्टीलचा चमचा ठेवून नेमकं काय होतं? असा प्रश्न आपल्यालाही पडला असेलच. पण खरंच ही एक ट्रिक फारच कामाची आहे.
फ्रीजरमध्ये चमचा ठेवून काय होतं?
खरंतर फ्रीजरमध्ये स्टीलचा चमचा ठेवण्याची ही छोटीशी ट्रिक अन्न खराब होण्यापासून रोखते. यासाठी आपल्याला एक स्टेनलेस स्टीलचा चमचा फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. जेव्हाही आपल्याला एखादा गरम पदार्थ लवकर थंड करायचा असेल तर त्यात हा थंड चमचा टाका. याने पदार्थ लवकर थंड होईल आणि खराब होण्याचा धोकाही कमी होईल.
जर विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर स्टील एक असं मेटल आहे जे लवकर थंड होतं. जेव्हा चमचा फ्रीजरमध्ये थंड होतो आणि तो आपण एखाद्या गरम भाजीत किंवा पदार्थात टाकतो तेव्हा चमचा लगेच पदार्थातील उष्णता शोषून घेतो. त्यामुळे पदार्थाचं तापमान लगेच कमी होतं.
मुळात जेव्हा एखादा पदार्थाचं तापमान ४ ते ६० डिग्री सेल्सिअस दरम्यान असतं, तेव्हा त्यात बॅक्टेरिया होण्याचा धोका अधिक असतो. अशात जर पदार्थ या तापमानात जास्त वेळ राहत असेल तर तो लवकर खराब होऊ शकतो.
कशी कराल ट्रिक?
ही छोटीशी ट्रिक आपण रोज करू शकता. म्हणजे समजा जर आपण आताच सूप किंवा डाळ बनवली असेल आणि ते आपल्याला थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवायचं असेल. ते तसंच ठेवाल तर थंड होण्यास वेळ लागेल. अशात त्यात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. पण जर आपण त्यात फ्रीजरमध्ये ठेवलेला स्टीलचा चमचा ठेवला सूप किंवा डाळ लवकर थंड होईल.
इतरही काही फायदे
फ्रीजरमध्ये ठेवलेला थंड स्टीलचा चमचा डोळ्यांखाली हलके लावल्यास सूज, puffiness कमी होण्यास मदत होऊ शकते.
कपाळावर थंड चमचा काही क्षण ठेवला तर थंडावा मिळू शकतो.
गरम पाण्यात न ठेवता थंड चमचा वापरल्यास काही डेझर्ट्ससोबत उपयोग होऊ शकतो.
काय काळजी घ्याल?
चमचा खूप वेळ फ्रीजरमध्ये असेल तर त्वचेवर थेट जास्त वेळ लावू नका.
लहान मुलांच्या हातात देऊ नका.
ओल्या त्वचेवर चिकटण्याचा धोका कमी असला तरी काळजी घ्या.
