lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Sunny Leone's lungi dance : अर्ध्या रात्री भर रस्त्यात सनी लियोनीचा लुंगी डान्स; व्हायरल होतोय जबरदस्त व्हिडीओ

Sunny Leone's lungi dance : अर्ध्या रात्री भर रस्त्यात सनी लियोनीचा लुंगी डान्स; व्हायरल होतोय जबरदस्त व्हिडीओ

Sunny Leone's lungi dance : व्हिडीओमध्ये सनी रात्री लुंगी घालून डान्स करताना दिसत आहे. सुनसान रस्त्यावर ती तिच्या अप्रतिम डान्स मूव्ह्ज दाखवत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 02:38 PM2021-12-12T14:38:30+5:302021-12-12T15:26:50+5:30

Sunny Leone's lungi dance : व्हिडीओमध्ये सनी रात्री लुंगी घालून डान्स करताना दिसत आहे. सुनसान रस्त्यावर ती तिच्या अप्रतिम डान्स मूव्ह्ज दाखवत आहे.

Sunny Leone's lungi dance in the middle of the night; Great video going viral | Sunny Leone's lungi dance : अर्ध्या रात्री भर रस्त्यात सनी लियोनीचा लुंगी डान्स; व्हायरल होतोय जबरदस्त व्हिडीओ

Sunny Leone's lungi dance : अर्ध्या रात्री भर रस्त्यात सनी लियोनीचा लुंगी डान्स; व्हायरल होतोय जबरदस्त व्हिडीओ

सनी लिओनी  (Sunny Leone) चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ती नेहमीच आपले  फोटो पोस्ट करते. सनी लिओनी चाहत्यांना कधीही निराश करत नाही आणि अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ त्यांच्यासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. तिने आता तिचा आणखी एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लुंगी डान्स (Sunny Leone Lungi Dance) करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये सनी रात्री लुंगी घालून डान्स करताना दिसत आहे. रिकाम्या रस्त्यावर ती तिच्या अप्रतिम डान्स मूव्ह्ज दाखवत आहे. तिची स्टाइल नेटिझन्सना खूप आवडली असून कमेंट करून अभिनेत्रीवरचे ते प्रेम व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सनीचा हा व्हिडिओ तिच्या 'आगामी प्रोजेक्ट 'ओह माय घोस्ट' च्या सेटवरील आहे, जो चेन्नईमध्ये शूट होत आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'चेन्नईतील 'ओह माय घोस्ट'च्या सेटवरील माझा आवडता शो. तुम्हाला आमचा लुंगी डान्स आवडतो का?'

सनीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय

सनी लिओनीचे चाहते तिच्या प्रत्येक कृतीवर जीव ओवाळून टाकतात. या व्हिडीओलाही चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे.  सनीने सुमारे 20 तासांपूर्वी हा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यावर 2.5 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. सनी एक चांगली डान्सर आणि अभिनेत्री देखील आहे.

व्हिडिओमध्ये सनी लुंगी घालून अनेक लोकांसोबत डान्स करत आहे. अभिनेत्री गुलाबी शर्ट आणि निळ्या रंगाची लुंगी परिधान केलेली दिसत आहे. तिने एखाद्या टपोरीसारखा गळ्यात रुमाल बांधला आहे. नृत्यातील अभिनेत्रीची चाल आणि ऊर्जा पाहण्यासारखी आहे. एका यूजरने लिहिले की, 'स्ट्राँग परफॉर्मन्स' तर अनेकांनी सौंदर्याची प्रशंसा केली आहे.
 

Web Title: Sunny Leone's lungi dance in the middle of the night; Great video going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.