Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > किचनमधील काळेकुट्ट- चिकट स्विच बोर्ड होतील मिनिटांत स्वच्छ, ४ सोप्या ट्रिक- स्विच बोर्ड चमकेल नव्यासारखा

किचनमधील काळेकुट्ट- चिकट स्विच बोर्ड होतील मिनिटांत स्वच्छ, ४ सोप्या ट्रिक- स्विच बोर्ड चमकेल नव्यासारखा

Kitchen Cleaning Tips: Remove Oil Stains from Switch Board: स्विच बोर्ड साफ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2026 13:00 IST2026-05-19T12:59:14+5:302026-05-19T13:00:47+5:30

Kitchen Cleaning Tips: Remove Oil Stains from Switch Board: स्विच बोर्ड साफ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स पाहूया.

Kitchen Switch Board Cleaning Tips How to Clean Dirty Switch Boards Sticky Switch Board Cleaning Hacks Easy Home Cleaning Tricks | किचनमधील काळेकुट्ट- चिकट स्विच बोर्ड होतील मिनिटांत स्वच्छ, ४ सोप्या ट्रिक- स्विच बोर्ड चमकेल नव्यासारखा

किचनमधील काळेकुट्ट- चिकट स्विच बोर्ड होतील मिनिटांत स्वच्छ, ४ सोप्या ट्रिक- स्विच बोर्ड चमकेल नव्यासारखा

आपल्या किचनमध्ये स्विच बोर्ड असतात. पण अनेकदा स्वयंपाकघरात काम करताना त्यावर तेल, मसाल्यांची वाफ आणि वारंवार हात लागल्यामुळे किचनमधील लाईट स्विच बोर्ड खूप लवकर काळेकुट्ट आणि चिकट होतात.(Kitchen Switch Board Cleaning Tips) आपण नियमितपणे किचनच्या ओटयाची आणि इतर गोष्टींची स्वच्छता करतो पण स्विच बोर्ड साफ करायचे राहून जाते. त्यावर हळूहळू तेलाचे आणि धुळीचे थर साचल्यास चिकट होतात.(Sticky Switch Board Hacks) हे स्विच बोर्ड साफ करणं खरंतर मोठे कष्टाचे काम वाटते आणि साफ करताना करंट बसेल की काय अशी भीती देखील आपल्याला वाटू लागते. त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष देखील करतो. (Easy Home Cleaning Tricks)
किचनमधील कितीही जुना आणि तेलकट झालेला स्विच बोर्ड अगदी काही मिनिटांत नव्यासारखा चकचकीत करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर तो नव्यासारखा चमकेल.(Kitchen Cleaning Marathi) यासाठी आपल्याला जास्त मेहनत करण्याची गरज नाही ना करंट लागण्याची भीती. स्विच बोर्ड साफ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स पाहूया. 

प्रेम म्हणजे..नक्की काय असतं, महागडं गिफ्ट की रोमॅण्टिक मेसेज? खरंखुरं प्रेम ओळखण्यासाठी ५ टिप्स

1. बेकिंग सोडा आणि लिंबू स्विच बोर्ड साफ करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. एका लहान वाटीत दोन चमचे बेकिंग सोडा घेऊन त्यात अर्धा लिंबाचा रस मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट जुन्या टूथब्रशच्या मदतीने स्विच बोर्डवर आणि बटणांवर व्यवस्थित लावा. ५ मिनिचानंतर ब्रशने हलक्या हाताने घासून घ्या. तेलाचे डाग सहज निघण्यास मदत होईल. 

2. आपल्याकडे जास्त वेळ नसेल आणि बोर्ड साफ करायचा असेल तर नेलपेंट रिमूव्हर हा सर्वात सोपा उपाय आहे. सुती कापडावर किंवा कापसाच्या बोळ्यावर थोडे रिमूव्हर घ्या आणि त्याने स्विच बोर्ड पुसून काढा. रिमूव्हरमधील केमिकल चिकटपणा लगेच विरघळवून टाकते. यामुळे बोर्ड अगदी २ मिनिटांत नव्यासारखा चमकेल. 

3. किचनमधील काळेकुट्ट- मेणचट डाग काढण्यासाठी पांढरे व्हिनेगर अतिशय प्रभावी ठरते. एका वाटीत थोडे व्हिनेगर घ्या आणि त्यात २ थेंब भांडी घासण्याचे डिशवॉश जेल मिक्स करा. यात जुना टूथब्रश बुडवून स्विच बोर्ड स्क्रब करा. यामुळे बोर्डवरील काळेकुट्ट डाग आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. 

4. टूथपेस्ट किंवा शेव्हिंग क्रीमने सुद्धा स्विच बोर्डवरील मळ काढण्यासाठी वापरता येते. बोर्डवर थोडी टूथपेस्ट किंवा शेव्हिंग क्रीम लावून पसरवून ठेवा. ५ मिनिटानंतर ओलसर कापडाने हलक्या हाताने पुसा. यामुळे स्विच बोर्ड नव्यासारखा चमकेल. 

महत्त्वाच्या टिप्स 

स्विच बोर्ड साफ करण्यापूर्वी मेन स्विच बंद करा. पायात प्लास्टिकची किंवा रबराची चप्पल नक्की घाला आणि ओल्या हाताने बोर्डला स्पर्श करु नका. बोर्ड साफ करताना पाणी किंवा कोणतेही लिक्विड बटणाच्या आत जाणार नाही, याची काळजी घ्या.

Web Title : इन आसान ट्रिक्स से मिनटों में साफ करें किचन के स्विचबोर्ड।

Web Summary : किचन के स्विचबोर्ड आसानी से चिकने हो जाते हैं। बेकिंग सोडा और नींबू, नेल पॉलिश रिमूवर, सफेद सिरका या टूथपेस्ट से साफ करें। मेन स्विच बंद करना और गीले हाथों से बचना याद रखें।

Web Title : Clean greasy kitchen switchboards in minutes with these simple tricks.

Web Summary : Kitchen switchboards get greasy easily. Clean them with baking soda and lemon, nail polish remover, white vinegar, or toothpaste. Remember to turn off the main switch and avoid wet hands.