Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > उन्हाळ्यात लाल मुंग्या वाढल्यात? घरातच्या कोपऱ्यात किचनमधले ५ पदार्थ ठेवा, गायब होतील मुंग्या

उन्हाळ्यात लाल मुंग्या वाढल्यात? घरातच्या कोपऱ्यात किचनमधले ५ पदार्थ ठेवा, गायब होतील मुंग्या

How To Get Rid Of Ants At Home : मुंग्या मारण्यासाठी लोक केमिकलयुक्त स्प्रे वापरतात तर  काहीजण हानीकारक द्रव्य शिंपडतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 19:55 IST2026-04-23T18:53:50+5:302026-04-23T19:55:18+5:30

How To Get Rid Of Ants At Home : मुंग्या मारण्यासाठी लोक केमिकलयुक्त स्प्रे वापरतात तर  काहीजण हानीकारक द्रव्य शिंपडतात.

How To Get Rid Of Ants At Home : How To Remove Ants From House | उन्हाळ्यात लाल मुंग्या वाढल्यात? घरातच्या कोपऱ्यात किचनमधले ५ पदार्थ ठेवा, गायब होतील मुंग्या

उन्हाळ्यात लाल मुंग्या वाढल्यात? घरातच्या कोपऱ्यात किचनमधले ५ पदार्थ ठेवा, गायब होतील मुंग्या

उन्हाळा सुरू होताच किचनमध्ये मुंग्या दिसायला सुरूवात होते.  लाल मुंग्या तयार होऊ लागल्या की त्या  कपड्यांमध्येही शिरतात आणि चावतात यामुळे पुरळ येणं, खाज येणं अशा समस्या उद्भवू शकतात. मुंग्या चावणं हे खूपच वेदनादायक असतं (How To Remove Ants From House). मुंग्या मारण्यासाठी लोक केमिकलयुक्त स्प्रे वापरतात तर काहीजण हानीकारक द्रव्य शिंपडतात ज्यामुळे मुंग्या मरतात पण केमिकल्सच्या वापरामुळे एलर्जी होण्याची भिती असते. (How To Get Rid Of Ants At Home)

लाल मुंग्यांना पळवून लावण्याचे सोपे घरगुती उपाय ( Solutions Of Ants In Home)

 1) व्हिनेगर

किचनमध्ये असलेलं व्हिनेगर लाल मुंग्यांना पळवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. मुंग्यांना व्हिनेगरचा तीव्र वास अजिबात आवडत नाही. मुंग्या व्हिनेगरचा वास येताच दूर पळतात. इतर मुंग्यांही त्याच्या मागे घराबाहेर पळतात. एका स्प्रे बॉटलमध्ये अर्ध पाणी आणि अर्ध व्हिनेगर मिसळा. जिथे जिथे मुंग्या असतात तिथे हे व्हिनेगर शिंपडा. ज्यामुळे मुंग्या दूर पळण्यास मदत होईल.

2) दालचिनी

 दालचिनीचा सुगंध खूपच तीव्र असतो. हा सुगंध मुंग्यांना अजिबात आवडत नाही. दालिचीनी पावडर घेऊन ज्या ठिकाणी मुंग्या येतात तिथे ठेवा आणि मुंग्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर शिंपडा. दालचिनीच्या तेलात कापसाचे बोळे बुडवून अशा ठिकाणी ठेवा जिथून मुंग्या येतात.

3) लिंबाची सालं

जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर हा एक स्वस्त आणि सोपा उपाय आहे. लिंबातील एसिडीक एसिड मुंग्यांना रस्ता भटकवण्यापासून  वाचवते.  लिंबाची  सालं अशा ठिकाणी ठेवा जिथे मुंग्या जास्त येतात. लिंबाची सालं किचनच्या कोपऱ्यात ठेवा. लिंबाचा आंबट वास मुंग्यांना सहन होत नाही आणि मुंग्या कमी होतात.

4)  पुदिन्याच्या तेलाचा वापर

मुंग्यांना पुदिन्याचा तीव्र वास अजिबात आवडत नाही. जर तुम्ही किचन किंवा खिडक्यांजवळ पुदिन्याची काही पानं ठेवली किंवा पुदिन्याचे तेल ठेवले तर मुंग्या येण्याचं प्रमाण कमी होईल.

5) टॅल्कम पावडर

खडू किंवा टॅल्कम पावडरमध्ये कॅल्शियम कार्बोनेट असते. जे मुंग्यांसाठी बाधा निर्माण करू शकते. ज्या ठिकाणाहून मुंग्या येतात तिथे ही पावडर घातल्यानं मुंग्या कमी होतात. ही पावडर मुंग्यांची चाल मंद करते आणि त्यांची रांग वाढण्यापासून रोखते.

Web Title : चींटियों से छुटकारा: 5 रसोई सामग्री जो आएंगी काम!

Web Summary : गर्मी में चींटियाँ बढ़ जाती हैं! सिरका, दालचीनी, नींबू के छिलके, पुदीने का तेल और टैल्कम पाउडर चींटियों को भगाने में कारगर हैं। ये प्राकृतिक उपाय रासायनिक स्प्रे का सुरक्षित विकल्प हैं, जो काटने और एलर्जी से बचाते हैं। इन्हें कोनों में रखने से चींटियाँ दूर रहती हैं।

Web Title : Get rid of ants: 5 kitchen ingredients to the rescue!

Web Summary : Summer brings ants! Vinegar, cinnamon, lemon peels, mint oil, and talcum powder effectively repel them from your kitchen. These natural solutions offer a safe alternative to chemical sprays, preventing bites and allergies. Keep these items in corners to keep ants away.