lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > हे काय भलतंच, तिच्या डोक्यात घुसलं मांजर व्हायचं भूत आणि म्हणून.... वाचा या मांजरबाईंची भन्नाट गोष्ट 

हे काय भलतंच, तिच्या डोक्यात घुसलं मांजर व्हायचं भूत आणि म्हणून.... वाचा या मांजरबाईंची भन्नाट गोष्ट 

Viral Story of Human Cat Chiara Dell Abate: ऐकावं ते नवलच... असं म्हणतात ना ते या बाबतीत अगदी खरं ठरतंय.. तुम्हाला माहिती आहे का ही मांजर होण्याची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 01:54 PM2023-11-01T13:54:51+5:302023-11-01T13:55:33+5:30

Viral Story of Human Cat Chiara Dell Abate: ऐकावं ते नवलच... असं म्हणतात ना ते या बाबतीत अगदी खरं ठरतंय.. तुम्हाला माहिती आहे का ही मांजर होण्याची गोष्ट

22 year old Italian woman named Chiara Dell Abate wants to become a human cat | हे काय भलतंच, तिच्या डोक्यात घुसलं मांजर व्हायचं भूत आणि म्हणून.... वाचा या मांजरबाईंची भन्नाट गोष्ट 

हे काय भलतंच, तिच्या डोक्यात घुसलं मांजर व्हायचं भूत आणि म्हणून.... वाचा या मांजरबाईंची भन्नाट गोष्ट 

Highlightsवयाच्या ११ व्या वर्षी तिला असं वाटलं की तिने मांजर व्हावं आणि त्यासाठी तिने स्वत:वर आतापर्यंत कित्येक शस्त्रक्रियाही करून घेतल्या.

कोणाच्या डोक्यात कधी कोणती गोष्ट घुसेल आणि त्यासाठी ते काय काय करतील, याचा खरच नेम नाही. आता एवढा चांगला मनुष्याचा जन्म मिळाला, तो एन्जॉय करायचं सोडून या बाईंच्या डोक्यात बघा काय भलतंच खूळ घुसलंय... या बाईंना म्हणे मांजर व्हायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी स्वत:वर कित्येक शस्त्रक्रिया करून घेतल्या. ही गोष्ट आहे इटलीमधल्या २२ वर्षीय तरुणीची (22 year old Italian woman named Chiara Dell Abate).  तिचं नाव आहे चियारा डेल एबेट. आयडिन मोड या नावाने ती सोशल मिडियावर ओळखली जाते. वयाच्या ११ व्या वर्षी तिला असं वाटलं की तिने मांजर व्हावं आणि त्यासाठी तिने स्वत:वर आतापर्यंत कित्येक शस्त्रक्रियाही करून घेतल्या. आता ती बरीच मांजरीसारखीही दिसू लागली आहे (Viral Story of Human Cat). 

 

तिच्या एका मुलाखतीत तिने सांगितलं आहे की मांजर होण्यासाठी आतापर्यंत तिने अनेक शस्त्रक्रिया केल्या असून शरीरात जवळपास २० वेगवेगळ्या प्रकारचे बदल करून घेतले आहेत.

लॅपटॉप, कम्प्युटरवर सतत काम करून मान- पाठ दुखतेय? शिल्पा शेट्टी सांगतेय १ खास व्यायाम

ओठ आणि जीभ यांना अनेक छेद दिले असून हे सगळं करून घेण्यासाठी तिला ७२ टाके घ्यावे लागले. एवढंच नाही तर तिची 'ब्लेफेरोप्लास्टी' झाली असून त्याद्वारे तिने तिच्या पापण्यांचा आकारही बदलून घेतला आहे. तसेच डोळ्यांच्या आजुबाजुच्या त्वचेचेही ऑपरेशन केले असून त्यांना मांजरीच्या डोळ्यांप्रमाणे लूक दिला आहे.  

 

मांजरीच्या कानांप्रमाणे तिच्या तिच्या डोक्यावर ऑपरेशन करून चार टेंगूळ करून घेतले आहेत.

World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत..

तसेच हाता- पायाची नखेदेखील मांजरीसारखी वाढवली आहेत. एवढंच नाही तर तिने तिचे निपल्सही ऑपरेशन करून काढून टाकले आहेत. मांजर होण्यासाठी माझं मानवी शरीर मला किती साथ देतं, हे मला पाहायचं आहे, असंही ती सांगते. 
 

Web Title: 22 year old Italian woman named Chiara Dell Abate wants to become a human cat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.