Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Relationship > ऑफिसात अफेअर्स-प्रेमप्रकरणं वाढली..! फोर्ब्सच्या रिपोर्ट्सने मांडलं धक्कादायक वास्तव

ऑफिसात अफेअर्स-प्रेमप्रकरणं वाढली..! फोर्ब्सच्या रिपोर्ट्सने मांडलं धक्कादायक वास्तव

Office Affairs : एका सर्वेक्षणात सुमारे ६०% लोकांनी आयुष्यात कधीतरी सहकाऱ्यासोबत रोमँटिक नात्यात असल्याचे मान्य केले आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 14:27 IST2026-05-09T14:22:11+5:302026-05-09T14:27:57+5:30

Office Affairs : एका सर्वेक्षणात सुमारे ६०% लोकांनी आयुष्यात कधीतरी सहकाऱ्यासोबत रोमँटिक नात्यात असल्याचे मान्य केले आहे.  

Office Affairs on the Rise? What Forbes Survey Reveals | ऑफिसात अफेअर्स-प्रेमप्रकरणं वाढली..! फोर्ब्सच्या रिपोर्ट्सने मांडलं धक्कादायक वास्तव

ऑफिसात अफेअर्स-प्रेमप्रकरणं वाढली..! फोर्ब्सच्या रिपोर्ट्सने मांडलं धक्कादायक वास्तव

Office Affairs : ऑफिस म्हणजे फक्त काम करण्याची जागा राहिलेली नाही, तर अनेकांसाठी ती मैत्री, भावनिक आधार आणि काही वेळा प्रेमसंबंधांचीही सुरुवात ठरत आहे. कामाच्या वाढत्या तासांमुळे आणि सतत एकत्र वेळ घालवल्यामुळे सहकाऱ्यांमध्ये जवळीक निर्माण होणं आता फारच कॉमन झालं आहे. पण ही जवळीक अनेकदा “ऑफिस अफेअर”मध्ये बदलते आणि त्यानंतर वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यात अनेक गुंतागुंती निर्माण होतात. अलीकडेच Forbes मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये ऑफिस रिलेशनशिप्स आणि अफेअर्सबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यात. या रिपोर्टनुसार, आधुनिक वर्कलाइफमुळे ऑफिसमध्ये भावनिक संबंध निर्माण होण्याचं प्रमाण वाढलंय.   

Forbes च्या अलिकडच्या रिपोर्टनुसार, ऑफिस अफेअर्स आणि वर्कप्लेस रोमॅन्स आता आधीपेक्षा जास्त सामान्य झाले आहेत. एका सर्वेक्षणात सुमारे ६०% लोकांनी आयुष्यात कधीतरी सहकाऱ्यासोबत रोमँटिक नात्यात असल्याचे मान्य केले आहे.  

Forbes मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार

- ७९% कर्मचाऱ्यांनी दीर्घकालीन ऑफिस रोमॅन्सचा अनुभव घेतल्याचे सांगितले

- ४१% लोकांचे नाते वरिष्ठ अधिकारी किंवा मॅनेजरसोबत होते

- ९१% लोकांनी करिअरमध्ये फायदा मिळवण्यासाठी फ्लर्टिंग केल्याचे मान्य केले

- ६९% कर्मचाऱ्यांनी ऑफिस रिलेशनशिपमुळे पक्षपात होत असल्याचे पाहिले

ऑफिसमध्येच का निर्माण होते जवळीक?

तसं पाहिलं तर अनेक कर्मचारी दिवसातील सर्वाधिक वेळ ऑफिसमध्ये घालवतात. सतत एकत्र काम करणे, प्रोजेक्ट्सचा ताण, प्रवास, मीटिंग्स आणि टीमवर्क यामुळे सहकाऱ्यांमध्ये भावनिक कनेक्शन तयार होऊ लागतं. वर्क फ्रॉम होमच्या काळानंतरही अनेक कंपन्यांमध्ये हायब्रिड किंवा ऑफिस कल्चर वाढल्यानं लोक पुन्हा प्रत्यक्ष भेटू लागले आहेत. त्यामुळे सामाजिक संवादही वाढला आहे.

ऑफिस अफेअर्सची मुख्य कारणं

- सततचा एकत्र वेळ

- भावनिक आधाराची गरज

- कामाच्या तणावात मिळणारा सपोर्ट

- वैयक्तिक आयुष्यातील एकटेपणा

- प्रोफेशनल अ‍ॅडमिरेशनमधून निर्माण होणारे आकर्षण

काही वेळा हे संबंध गंभीर नात्यांमध्ये बदलतात, तर अनेकदा ते फक्त तात्पुरते आकर्षण ठरते.

करिअरवर होऊ शकतो परिणाम

महत्वाचा मुद्दा आहे की, ऑफिस अफेअर्समुळे केवळ पर्सनल आयुष्यच नाही तर कामाच्या ठिकाणचं वातावरणही प्रभावित होऊ शकतं. काही कंपन्यांमध्ये अशा संबंधांबाबत स्पष्ट नियम असतात. जर रिलेशनशिपमध्ये वाद झाले, तर त्याचा परिणाम कामाची गुणवत्ता आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. काही वेळा अस्वस्थता किंवा ऑफिस पॉलिटिक्सचाही प्रश्न निर्माण होतो.

सोशल मीडियाचा वाढता प्रभाव

आजकाल ऑफिसमधील संवाद फक्त कामापुरता मर्यादित राहत नाही. चॅट अ‍ॅप्स, सोशल मीडिया आणि व्हर्च्युअल मीटिंग्समुळे लोक सतत संपर्कात राहतात. त्यामुळे भावनिक जवळीक अधिक वेगाने वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title : ऑफिस में प्रेम संबंध बढ़ने का खुलासा: फोर्ब्स की रिपोर्ट

Web Summary : फोर्ब्स की रिपोर्ट के अनुसार ऑफिस में प्रेम संबंध बढ़ रहे हैं, 60% लोगों ने स्वीकार किया। लंबे समय तक साथ काम करना, भावनात्मक ज़रूरतें और सोशल मीडिया कार्यस्थल में संबंधों को बढ़ावा देते हैं, जिससे करियर पर असर पड़ सकता है।

Web Title : Forbes report reveals shocking rise in office affairs, relationships.

Web Summary : Forbes reports a surge in office romances, with 60% admitting involvement. Long hours, emotional needs, and social media fuel workplace connections, leading to potential career consequences and biased environments. The study highlights the impact on personal and professional lives.