दीप अमावस्या स्पेशल : पाहा पारंपरिक दिव्यांचे एक से एक सुंदर प्रकार

Published:July 17, 2023 02:54 PM2023-07-17T14:54:44+5:302023-07-17T15:01:10+5:30

Dive Traditional Patterns Dip Amavasya Special

दीप अमावस्या स्पेशल : पाहा पारंपरिक दिव्यांचे एक से एक सुंदर प्रकार

पूर्वी वीज नव्हती तेव्हा दिव्यांशिवाय पर्यायच नसायचे. त्यावेळी घरोघरी कंदिल, लामण दिवे असे दिव्यांचे खूप सुंदर प्रकार असायचे. इतकेच नाही तर अनेक घरांमध्ये तिन्हीसांजेला लावल्या जाणाऱ्या समईच्या प्रकाशातच कित्येक गोष्टी व्हायच्या (Dive Traditional Patterns Dip Amavasya Special).

दीप अमावस्या स्पेशल : पाहा पारंपरिक दिव्यांचे एक से एक सुंदर प्रकार

हा दिव्यांमधील अतिशय जुना प्रकार असून आता आपण दिवाळीमध्ये लावतो ती मातीची पणती नियमितपणे वापरली जायची.

दीप अमावस्या स्पेशल : पाहा पारंपरिक दिव्यांचे एक से एक सुंदर प्रकार

हाही अतिशय पारंपरिक आणि राजेरजवाड्यांमध्ये ठेवला जाणारा प्रकार. आजही देवघरातील लहा समयांपासून ते मोठमोठ्या कित्येक फुटी नक्षीदार समया पाहायला मिळतात.

दीप अमावस्या स्पेशल : पाहा पारंपरिक दिव्यांचे एक से एक सुंदर प्रकार

हा देवघरातला अतिशय शांत आणि कित्येक काळ तेवत राहणारा पण भरपूर प्रकाश देणारा दिवा. निरांजन लावल्यावर घरात अतिशय प्रसन्न वाटते.

दीप अमावस्या स्पेशल : पाहा पारंपरिक दिव्यांचे एक से एक सुंदर प्रकार

देवाजवळ कित्येक तास तेवत राहणारा दिवा म्हणजे अखंड दिवा. आतल्या बाजुने वात घालायची असल्याने आणि या दिव्याचे तोंडही मोठे असल्याने यात बरेच तेल मावते आणि ते कित्येक तास तेवत राहते.

दीप अमावस्या स्पेशल : पाहा पारंपरिक दिव्यांचे एक से एक सुंदर प्रकार

मशाल हा दिव्यांतील एक महत्त्वाचा प्रकार. शिवकाळात या मशालीला विशेष महत्त्व होते. मशाल पेटवण्याची पद्धत आणि तिचा प्रकाश यांचे एक वेगळेच गणित असायचे. आता मात्र मशाल फारशी वापरली जात नाही.

दीप अमावस्या स्पेशल : पाहा पारंपरिक दिव्यांचे एक से एक सुंदर प्रकार

पारंपरिक पद्धतीचा काचेच्या आत लावला जाणारा दिवा म्हणजे लामण दिवा. हा दिवा अनेकदा लटकता असायचा. तो घराच्या मध्यभागी खुंटीला लटकवून लावला जायचा. जेणेकरुन त्याचा घरभर प्रकाश पडायचा.

दीप अमावस्या स्पेशल : पाहा पारंपरिक दिव्यांचे एक से एक सुंदर प्रकार

नेहमीच्या निरांजनीप्रमाणेच पण वाटीसारखा आकार असलेल्या या निरांजनीत कापूर, फुलवात लावण्याची रीत आहे. आजही अनेक घरांमध्ये ही निरांजन आवर्जून वापरली जाते.

टॅग्स :खरेदीShopping