शरीरावर ‘या’ ५ ठिकाणी टॅटू काढणं अत्यंत धोक्याचं, त्वचेचं तर वाटोळं होईलच पण..

Updated:May 13, 2025 19:49 IST2025-05-13T19:42:18+5:302025-05-13T19:49:37+5:30

Body parts to avoid for tattoos: Worst places to get a tattoo: आपण देखील पहिल्यांदाच टॅटू काढणार असू तर शरीराच्या या भागांवर टॅटू काढू नका. जाणून घेऊया याबद्दल

शरीरावर ‘या’ ५ ठिकाणी टॅटू काढणं अत्यंत धोक्याचं, त्वचेचं तर वाटोळं होईलच पण..

आपल्यापैकी अनेकांना टॅटू काढण्याची इच्छा असते. आपल्या आजूबाजूला इतके टॅटूप्रेमी असतात की, त्याच्या शरीरावर संपूर्ण ठिकाणी टॅटू पाहायला मिळतात. (Body parts to avoid for tattoos)

शरीरावर ‘या’ ५ ठिकाणी टॅटू काढणं अत्यंत धोक्याचं, त्वचेचं तर वाटोळं होईलच पण..

काही लोक फॅशन किंवा ट्रेंड म्हणून टॅटू काढतात. पण जर आपण देखील पहिल्यांदाच टॅटू काढणार असू तर शरीराच्या या भागांवर टॅटू काढू नका. जाणून घेऊया याबद्दल (Worst places to get a tattoo)

शरीरावर ‘या’ ५ ठिकाणी टॅटू काढणं अत्यंत धोक्याचं, त्वचेचं तर वाटोळं होईलच पण..

हाताची त्वचा ही सगळ्यात जास्त नाजूक आणि सैल असते. यावर आपण बॉडी ऑइल आणि मॉइश्चरायझरचा वापर करतो. त्यामुळे टॅटू काढल्यानंतर तो काही काळाने फिकट होतो. तसेच सूर्याची किरणे देखील त्यावर पडतात. ज्यामुळे त्याचा रंग उडू लागतो.

शरीरावर ‘या’ ५ ठिकाणी टॅटू काढणं अत्यंत धोक्याचं, त्वचेचं तर वाटोळं होईलच पण..

अनेकांना काखेमध्ये टॅटू काढण्याची हौस असते. हात सतत हलवणे, घाम येणे यांसारख्या हालचालीमुळे आतील भागात घर्षण होत असते. ज्यामुळे टॅटूवरील शाई हलकी होत राहाते. तसेच हा टॅटू दिसत देखील नाही.

शरीरावर ‘या’ ५ ठिकाणी टॅटू काढणं अत्यंत धोक्याचं, त्वचेचं तर वाटोळं होईलच पण..

हाताचे कोपर यावर देखील अनेकजण टॅटू काढतात. परंतु, कोपराची बाह्य बाजू इतर काही भागांपेक्षा लवकर फिकट होते. तसचे कामाच्या ठिकाणी कोपरांवर जास्त ताण येतो. ज्यामुळे घाम येण्याची शक्यता असते. यामुळे टॅटूचा रंग हलका होऊ लागतो.

शरीरावर ‘या’ ५ ठिकाणी टॅटू काढणं अत्यंत धोक्याचं, त्वचेचं तर वाटोळं होईलच पण..

पायांवरचे टॅटू हे सतत सॉस आणि शूज घातल्यामुळे फिकट होतात. सॉसचा वास येऊ नये म्हणून आपण सतत पाय देखील धुतो. ज्यामुळे रंग हलका होतो.

शरीरावर ‘या’ ५ ठिकाणी टॅटू काढणं अत्यंत धोक्याचं, त्वचेचं तर वाटोळं होईलच पण..

तळाहातांवर टॅटू काढणे म्हणजे त्वचेचे नुकसान करुन घेणे आहे. आपली तळहाताची त्वचा नाजूक असते. सतत साबणाचा वापर आणि घरातील इतर कामे केल्यामुळे यावर शाई जास्त दिवस टिकून राहात नाही. ज्यामुळे तो हळूहळू दिसेनासा होतो.