Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > सुटीतली धमाल-मस्तीची कमाल, मुलं विसरतील मोबाइल- फक्त ३ गोष्टी करा आणि मुलांची सुटी होईल यादगार

सुटीतली धमाल-मस्तीची कमाल, मुलं विसरतील मोबाइल- फक्त ३ गोष्टी करा आणि मुलांची सुटी होईल यादगार

Holiday plans for children, play and learn as well , activities for children and parents to do together : सुट्टीत मुलांसोबत खेळाही आणि त्यांना शिकवा नवीन गोष्टी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2026 17:42 IST2026-05-12T17:37:50+5:302026-05-12T17:42:42+5:30

Holiday plans for children, play and learn as well , activities for children and parents to do together : सुट्टीत मुलांसोबत खेळाही आणि त्यांना शिकवा नवीन गोष्टी.

Holiday plans for children, play and learn as well , activities for children and parents to do together | सुटीतली धमाल-मस्तीची कमाल, मुलं विसरतील मोबाइल- फक्त ३ गोष्टी करा आणि मुलांची सुटी होईल यादगार

सुटीतली धमाल-मस्तीची कमाल, मुलं विसरतील मोबाइल- फक्त ३ गोष्टी करा आणि मुलांची सुटी होईल यादगार

शाळांना सुट्टी लागली की मुलांचा जास्त वेळ मोबाइल, टीव्ही किंवा गेम्समध्ये जातो. मुलं आता पूर्वीसारखे पूर्ण वेळ खेळण्यात घालवत नाहीत. जास्त वेळ तर क्रिनसमोरच घालवतात. काही वेळ मनोरंजनासाठी हे ठीक असले तरी सतत स्क्रीनसमोर बसल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. (Holiday plans for children, play and learn as well , activities for children and parents to do together )त्यामुळे सुट्टीच्या काळात मुलांनी थोडा वेळ अशा गोष्टींमध्ये घालवणे गरजेचे असते ज्यामुळे त्यांना मजाही येईल आणि नवीन काही शिकायलाही मिळेल. विशेष म्हणजे यासाठी दिवसभर वेळ देण्याची गरज नाही. रोज फक्त एक तास काही क्रिएटिव्ह आणि मजेदार अॅक्टिव्हीटी केल्या तर मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळू शकते.

जसं की चित्रकला आणि क्राफ्ट. या मजेशीर आणि मुलांसाठी खूप चांगल्या कृती आहेत. रंगकाम, पेपर क्राफ्ट, जुन्या वस्तूंमधून नवीन वस्तू तयार करणे किंवा छोट्या सजावटीच्या वस्तू बनवणे यामुळे मुलांची कल्पनाशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर त्यांची एकाग्रता, संयम आदी वरही चांगला परिणाम होतो. अनेक मुलांना स्वतःच्या हाताने काही तयार करण्यामध्ये खूप आनंद मिळतो.

पझल्स, शब्दकोडी किंवा बुद्धिबळासारखे खेळही मुलांच्या मेंदूसाठी फायदेशीर ठरू शकतात. अशा खेळांमुळे विचार करण्याची सवय वाढते आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांनीही मुलांसोबत हे खेळ खेळल्यास त्यांचा उत्साह अधिक वाढतो. इतरही अनेक बुद्धीला चालना देणारे खेळ आहेत. जसं की नाव गाव फळ फुल. आदी.

कथा वाचन किंवा गोष्टी सांगणे ही आणखी एक छान क्रिया आहे. रोज थोडा वेळ मुलांना पुस्तक वाचायला दिल्यास त्यांची भाषाशैली, कल्पनाशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारू शकते. काही पालक मुलांकडून गोष्ट तयार करून घेण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊ शकते.

याशिवाय छोट्या घरगुती कामांमध्ये मुलांना सहभागी करून घेणेही उपयोगी ठरते. झाडांना पाणी घालणे, खेळणी व्यवस्थित ठेवणे किंवा स्वयंपाकघरातील सोपी मदत करणे यामुळे मुलांमध्ये जबाबदारीची भावना विकसित होऊ शकते.
सुट्टी म्हणजे फक्त अभ्यासापासून ब्रेक नाही, तर मुलांना नवीन गोष्टी शिकण्याची संधीही असते. त्यामुळे रोज फक्त एक तास अशा विविध कृती करु दिल्यास मुलांचा वेळ चांगला जाऊ शकतो आणि त्यांना मानसिकदृष्ट्याही फायदा होऊ शकतो.

Web Title : छुट्टियों को यादगार बनाएं: इन तीन गतिविधियों से फोन को कहें अलविदा।

Web Summary : छुट्टियों में बच्चों को कला, पहेली और कहानी कहने जैसी रचनात्मक गतिविधियों में शामिल करें। इससे कल्पना, समस्या-समाधान कौशल और भाषा का विकास होता है। जिम्मेदारी को बढ़ावा देने और छुट्टियों को मजेदार और शिक्षाप्रद बनाने के लिए उन्हें सरल घरेलू कार्यों में शामिल करें।

Web Title : Make holidays memorable: Ditch the phone with these three activities.

Web Summary : Engage kids in creative activities like art, puzzles, and storytelling during holidays. These boost imagination, problem-solving skills, and language development. Involve them in simple household chores to foster responsibility and make holidays fun and educational.