स्त्रिया बहुतेक वेळेस गोंधळलेल्या स्थितीत असतात, विशेषत: निर्णय घेताना अनेकदा मनात विचारांचे काहूर माजलेले असते. घरापासून ऑफिसपर्यंत सर्वच आघाड्यांवर लढताना होणारी ही ओढाताण टाळण्यासाठी आणि निर्णय घेण्याची क्रिया अधिक जलद व अचूक व्हावी, या उद्देशाने या लेखात काही अत्यंत प्रभावी सूत्रे दिली आहेत, जी तुम्हाला एक प्रगल्भ आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण 'सुपरवुमन' बनण्यास मदत करतील.
८ मार्च, जागतिक महिला दिन(Women's Day 2026) जवळ येत आहे. आजच्या धावपळीच्या युगात स्त्रिया घरापासून ऑफिसपर्यंत अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडत आहेत. अशा वेळी 'निर्णयक्षमता' हा गुण स्त्रियांना अधिक सक्षम आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण बनवू शकतो.
१. पर्यायांची मर्यादा निश्चित करा (Limit Your Options)
जेव्हा आपल्यासमोर खूप पर्याय असतात, तेव्हा संभ्रम वाढतो. खरेदी असो किंवा करिअरची निवड, सर्वात महत्त्वाच्या २-३ पर्यायांवरच लक्ष केंद्रित करा. जितके कमी पर्याय, तितका निर्णय घेण्याचा वेग वाढतो.
२. स्पष्ट रेषा ओढा (Draw a Line Between Good and Bad)
चांगल्या आणि वाईट निवडीमधील फरक वेळीच ओळखायला शिका. तुमच्या मूल्यांशी तडजोड करणारी कोणतीही गोष्ट 'वाईट' या श्रेणीत टाका. एकदा का ही स्पष्टता आली की, निर्णय घेणे सहज सोपे होते.
३. अंतर्मनाचा आवाज ऐका (Listen to Your Gut Feeling)
स्त्रियांना उपजतच 'सिक्स्थ सेन्स' किंवा अंतर्ज्ञान लाभलेले असते. जर तुमचं मन एखादी गोष्ट करण्यासाठी साक्ष देत असेल, तर तांत्रिक विश्लेषणापेक्षा तुमच्या 'Gut Feeling' ला प्राधान्य द्या. तुमची आंतरिक शक्ती तुम्हाला कधीही चुकीचा रस्ता दाखवणार नाही.
४. वेळेचे मूल्य ओळखा (Think of Your Time as Money)
महिला अनेकदा इतरांसाठी वेळ देतात पण स्वतःच्या वेळेची किंमत विसरतात. निर्णय घेण्यात घालवलेला प्रत्येक मिनिट हा तुमच्या आयुष्यातील एक मौल्यवान गुंतवणूक आहे. वेळेचे गणित समजून निर्णय घेतल्यास तुम्ही अधिक क्रियाशील बनू शकता.
५. सरावाने आत्मविश्वास वाढवा (Decisiveness Grows with Each Decision)
निर्णय घेण्याची क्षमता ही एका दिवसात येत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. तुम्ही जितके जास्त निर्णय स्वतः घ्याल, तितका तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि भविष्यात मोठे निर्णय घेणे तुम्हाला सोपे वाटेल.
६. द्विधा मनस्थिती टाळा (Indecision Kills)
निर्णय न घेणं किंवा विचार करत बसणं हे संधी गमावण्यासारखं आहे. 'निर्णय चुकला तरी चालेल, पण मी तो घेणार' ही वृत्ती ठेवा. कारण, अर्धवट राहिलेले विचार किंवा संभ्रम प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात.
