What is Misophonia : अनेकदा असं होतं की, कुणी चिप्स खात असताना येणारा कचरकचर आवाज, चहा पितानाचा आवाज, पेनाचा टिक-टिक आवाज कानावर पडला की राग येतो, चिडचिड होते. काही लोकांना या आवाजाचा काही फरक पडत असेल, पण काही लोकांसाठी हे असे आवाज फारच त्रासदायक ठरतात. मुळात ही होणारी चिडचिड सामान्य चिडचिड नाही. याला मेडिकल सायन्समध्ये मिसोफोनिया म्हणतात. चला तर पाहुयात ही सामान्य गोष्ट इतकी त्रासदायक कशी ठरते.
काय असतो मिसोफोनिया?
मिसोफोनिया दोन शब्दांनी बनून तयार झालाय. मिसोस म्हणजे तिरस्कार आणि फोन म्हणजे आवाज. याचा सरळ अर्थ असा होतो की, आवाजाचा तिरस्कार वाटणं. ही एक अशी न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे, ज्यात व्यक्ती काही खास आवाजांबाबत जास्त संवेदनशील होतो.
कोणत्या आवाजांनी ट्रिगर होतो मिसोफोनिया?
मिसोफोनियाने पीडित लोकांना प्रत्येक आवाजाचा त्रास होत नाही, तर काही खास आवाज त्यांच्यात तीव्र रिअॅक्शन तयार करतात. या आवाजांना ट्रिगर म्हटलं जातं. ही स्थिती प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असू शकते. एखाद्याला केवळ एकच आवाज ट्रिगर होऊ शकतो. तर कुणाला वेगवेगळे आवाज ट्रिगर होऊ शकतात.
सगळ्यात कॉमन ट्रिगर्स
तोंडाशी संबंधित आवाज - पदार्थ चावणे, जोरजोरात श्वास घेणे, ओठांचा आवाज करणे, घोरणे किंवा च्युइंगम चघळण्याचा आवाज.
इतर काही आवाज - कीबोर्डवर टायपिंग, पेनाची टिकटिक, घड्याळाच्या काट्यांचा आवाज, नळातून पाणी टपकण्याचा आवाज किंवा कारच्या वायपरचा आवाज.
मिसोफोनियाची लक्षणे
- अचानक खूप जास्त राग येणे
- घाबरल्यासारखं वाटणे, अस्वस्था आणि एंझायटी
- आवाज करणाऱ्या व्यक्तीचा राग येणे
काही लोकांमध्ये ही स्थिती इतरी गंभीर होते की, ते त्या अशा जागांवर जाणं टाळतात जिथे ट्रिगर करणारे आवाज येण्याची शक्यता असते. लोक असे ठिकाण सोडून लगेच निघून जातात. काही स्थितींमध्ये व्यक्ती फारच आक्रामक होते. आवाज बंद करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला रागावणे, त्याच्यावर चिडणे किंवा वाद घालणे अशा गोष्टीही होतात.
यावर उपाय काय?
मिसोफोनियाने पीडित लोक मुद्दामहून असं करत नाही. हे त्यांच्या मेंदूतील एका संरचनेमुळे होतं. यावर काही उपाय नाही. पण काही गोष्टी करून याला मॅमेज केलं जाऊ शकतं. ट्रिगर करणारे आवाज ओळखा, ट्रिगरवेळी ईअर प्लग्स किंवा नॉइस कॅन्सलिंग ईअर फोन्सचा वापर करा, व्हाइट नॉइज मशीनचा वापर करा.
