>सुखाचा शोध > फार स्ट्रेस आला तर तुम्ही काय करता? फक्त ३ उपाय, व्हा स्ट्रेस फ्री

फार स्ट्रेस आला तर तुम्ही काय करता? फक्त ३ उपाय, व्हा स्ट्रेस फ्री

Get Relax: कोणत्यातरी गोष्टीचा खूप ताण stress आलाय? स्वत:वर आणि दुसऱ्यांवर उगाच चिडचिड वाढलीये? मग मनावरचा ताण हलका करण्यासाठी आणि थोडं रिलॅक्स होण्यासाठी हे घरगुती उपाय करून बघा... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 07:28 PM2021-11-21T19:28:04+5:302021-11-21T19:29:58+5:30

Get Relax: कोणत्यातरी गोष्टीचा खूप ताण stress आलाय? स्वत:वर आणि दुसऱ्यांवर उगाच चिडचिड वाढलीये? मग मनावरचा ताण हलका करण्यासाठी आणि थोडं रिलॅक्स होण्यासाठी हे घरगुती उपाय करून बघा... 

What do you do when you get stressed? Only 3 remedies, be stress free | फार स्ट्रेस आला तर तुम्ही काय करता? फक्त ३ उपाय, व्हा स्ट्रेस फ्री

फार स्ट्रेस आला तर तुम्ही काय करता? फक्त ३ उपाय, व्हा स्ट्रेस फ्री

Next
Highlightsताण कमी कसा करावा हा प्रश्न पडला असेल, तर हे साधे सोपे उपाय करा... मग बघा मन अगदी हलकं- फुलकं आणि फ्रेश होऊन जाईल.

कधी- कधी एखाद्या गोष्टीचा आपण इतका ताण घेतो की त्या नादात आपण काय करतो आहोत, हेच आपल्याला कळत नाही. ताण साध्या- सुध्या गोष्टींमुळे आलेला असो किंवा मग कुठल्या मोठ्या गोष्टीमुळे.... मनावर ताण येतो आणि तो आपल्याला डिस्टर्ब करतो, हेच खरं. मनावर आलेलं हे दडपण, ओझं वेळीच उतरवलं नाही, तर त्यातून अनेक शारीरिक समस्याही निर्माण होऊ शकतात. शिवाय आपण दडपणात असलो, तणावात असलो की उगाच दुसऱ्यांवर चिडचिडही करू लागतो. यामुळे मग नात्यात दुरावा येण्याचीही शक्यता असते. म्हणूनच मनावरचा ताण चटकन उतरवून टाकत जा. ताण कमी कसा करावा हा प्रश्न पडला असेल, तर हे साधे सोपे उपाय करा... मग बघा मन अगदी हलकं- फुलकं आणि फ्रेश होऊन जाईल.

 

असा घालवा मनावरचा ताण
१. झरझर लिहून काढा

कधीकधी आपल्या मनात असा काहीतरी विचार चालू असतो, जो आपण इतर कुणाशीच शेअर करू शकत नाही. बोलल्यामुळे मनावरचा ताण कमी होतो असं म्हणतात. पण काहीकाही गोष्टी अशा असतात, ज्या आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीलादेखील सांगू शकत नाही. अशावेळी मग सरळ एक डायरी आणि पेन घ्या. तुमच्या मनातला गोंधळ झरझर त्यावर लिहून काढा. त्यावर काय उपाय करता येईल, ते सगळंही लिहून ठेवा आणि हा कागद घरातलं दुसरं कुणीच वाचू शकणार नाही, अशा जागी ठेवून द्या. हवं तर मनातला गोंधळ कमी झाल्यावर हा कागद फाडून फेकून दिला तरी चालेल. करून बघा हा उपाय, कुणाशीच बोलता आलं नाही, तर कागद- पेन घेऊन मांडा मनातला गोंधळ आणि मोकळं करा तुमचं मन.

 

२. व्यायाम करा
व्यायाम केल्याने फक्त शरीरच मोकळं होतं, असं नाही. व्यायाम केल्यामुळे तुमच्या मनालाही आराम मिळतो. व्यायाम केल्यामुळे शरीरासोबतच आपलं मन देखील फ्रेश होतं. सकारात्मक विचार मनात येतात आणि आपोआपच मनावरची मरगळ दूर होऊन ताणतणाव कमी व्हायला मदत होते. हॅप्पी हार्मोन्सचे शरीरातील प्रमाण वाढवायलाही व्यायाम उपयुक्त ठरतो. त्यामुळे तणावात असाल, तर जरूर व्यायाम करा. तुम्हाला जो व्यायाम आवडत असेल तो करा. हवं तर मोकळ्या हवेत फिरायला जा किंवा घरच्याघरीच एखादं म्युझिक लावून व्यायाम करा. लवकरच रिलॅक्स वाटू लागेल. 

 

३. छंदासाठी वेळ द्या 
खूप तणावात असताना एक गोष्ट आपण करू शकतो, ती म्हणजे आपले छंद जोपासण्याची. मान्य आहे की तणावात असताना काहीच करावंसं वाटत नाही. पण असं नाही. जी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडते, ती गोष्टी तुम्ही कितीही ताण असला तरी करू शकता. त्यामुळे गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं, गार्डनिंग करणं असं काहीही जे तुम्हाला आवडतं ते करा आणि रिलॅक्स व्हा.

 

४. छान स्वयंपाक करा
स्वयंपाक करणं हे काम नाही, तर मनावरचा ताण, थकवा घालविणारी ती एक सकारात्मक ॲक्टीव्हिटी आहे, असं काही अभ्यासकांनी सांगितलं आहे. रोज- रोज तोच स्वयंपाक करायचा असला की कंटाळा येतो. पण आपण जेव्हा एखादा आपल्याला येत नसलेला नवा पदार्थ करायला घेतो, तेव्हा नक्कीच आपल्याला नवा हुरूप आलेला असतो. हा अनुभव स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकीने कधी ना कधी घेतलेला आहे. त्यामुळे जर उदास, नाराज वाटत असेल, तर सरळ स्वयंपाक घरात जा आणि एखादा आजवर न बनविलेला किंवा तुम्हाला खूप आवडत असणारा पदार्थ बनवायला सुरूवात करा. बघा पदार्थ जसा तयार होत जाईल, तसं तुमचं मन हलकं आणि रिलॅक्स होऊ लागेल. 


 

Web Title: What do you do when you get stressed? Only 3 remedies, be stress free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Homemade energy drink : तिशी-चाळीशीतही पंचविशीसारखे फिट दिसाल; 'हा' घ्या चांगल्या तब्येतीचा जबरदस्त उपाय  - Marathi News | Homemade energy drink for weakness : How to make energy drink to relieve fatigue and weakness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिशी-चाळीशीतही पंचविशीसारखे फिट दिसाल; 'हा' घ्या चांगल्या तब्येतीसाठी जबरदस्त उपाय 

Homemade energy drink for weakness : रोज चांगलं खाऊनही थकवा जाणवतो? तर कधी सर्दी खोकल्याचा त्रास वाढतो? मग हे घरगुती एनर्जी ड्रिंक प्या आणि थकवा, अशक्तपणा कायमचा दूर घालवा. ...

थंड गारठल्या रात्री जेवणात करा 3 प्रकारचे सूप; भूकही भागेल, मूडही होईल खूश - Marathi News | 3 types of soup for a dinner in cold night; Hunger will go away and mood will be happy with these 3 types of soups | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंड गारठल्या रात्री जेवणात करा 3 प्रकारचे सूप; भूकही भागेल, मूडही होईल खूश

स्वयंपाकाचा कंटाळा आणि लागलेली भूक या दोन्ही गरजा भागवायच्या असतील तर मग सूपसारखा दुसरा चविष्ट, पोटभरीचा आणि पौष्टिक पर्याय नाही. तीन प्रकारचे सूप केवळ एक वाटीभर घेतलं तरी पोट भरतं. जे वेटलाॅससाठी योग्य सूपच्या शोधात असतील त्यांच्यासाठी हे तीन प्रकार ...

1 ग्लास हिरव्या मटारची स्मूदी, आरोग्य-फिटनेस-सौंदर्य-एक स्मूदी फायदे 3 - Marathi News | 1 glass of green pea smoothie gives health-fitness-beauty benefits. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :1 ग्लास हिरव्या मटारची स्मूदी, आरोग्य-फिटनेस-सौंदर्य-एक स्मूदी फायदे 3

चांगलं आरोग्य, सुंदर त्वचा, सुडौल बांधा यासाठी स्मूदी भाज्या, फळं आणि सुकामेवा यांचा समावेश असलेली स्मूदी घेणं आवश्यक असतं. हिवाळ्यात हिरव्या मटारची स्मूदी अवश्य घ्यावी असं तज्ज्ञ म्हणतात. हिरव्या मटारची स्मूदी करण्याचे प्रकार दोन. दोन्ही प्रकार सोपे ...

थंडीत हवा गरमागरम नाश्ता, चटकन होणारा आणि चविष्ट; करून पाहा ३ पदार्थ - Marathi News | 3 Super healthy breakfast recipe specially for winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत हवा गरमागरम नाश्ता, चटकन होणारा आणि चविष्ट; करून पाहा ३ पदार्थ

Food and recipe: रोज रोज नाश्त्याला काय पदार्थ करावेत, असा प्रश्न पडतो. म्हणूनच तर हे घ्या त्याचं एक सोपं उत्तर...  ...

Foods for diabetes : वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील हे ६ पदार्थ; अचानक डायबिटीस वाढण्याचा टळेल धोका - Marathi News | Foods for diabetes :  6 bitter food diabetics may include in their diet to control diabetes and increase insulin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील हे ६ पदार्थ; अचानक डायबिटीस वाढण्याचा टळेल धोका

Foods for diabetes : तुम्हाला  डायबिटीस असेल तर रिफाइंड कार्ब्स तुमच्यासाठी हानिकारक असू शकतात. तुमच्या आहारात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असल्याची खात्री करा. ...

टीनएजर मुलींच्या आरोग्य समस्या गंभीर, पोषणाचा अभाव; खाण्यापिण्याचे नखरे कराल तर...   - Marathi News | Health problems of teenage girls will become serious with lack of nutrition. Nutrition thruough diet is must for teenager girls. Narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टीनएजर मुलींच्या आरोग्य समस्या गंभीर, पोषणाचा अभाव; खाण्यापिण्याचे नखरे कराल तर...  

किशोरवयीन मुलींच्या पोषणाकडे पालकांनी दुर्लक्ष करणं मुलींच्या आरोग्यावर कायमस्वरुपी परिणाम करतं. हे परिणाम भविष्यात त्यांच्या जननक्षमतेवरही परिणाम करण्याइतके घातक असतात.  ...