Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > केमिकलने होतात आजार, इंटिमेट हायजीनसाठी ७ घरगुती हर्बल वॉश, नाजूक जागेची आग आणि दुर्गंधी टाळा

केमिकलने होतात आजार, इंटिमेट हायजीनसाठी ७ घरगुती हर्बल वॉश, नाजूक जागेची आग आणि दुर्गंधी टाळा

Gentle and effective herbal intimate care tips: How to maintain intimate pH balance naturally: न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्या मते इंटिमेट केअर ही फक्त गरज नसून त्याची आपण नियमितपणे काळजी घ्यायला हवी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2026 14:57 IST2026-05-01T14:56:30+5:302026-05-01T14:57:24+5:30

Gentle and effective herbal intimate care tips: How to maintain intimate pH balance naturally: न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्या मते इंटिमेट केअर ही फक्त गरज नसून त्याची आपण नियमितपणे काळजी घ्यायला हवी.

7 Homemade herbal wash for intimate hygiene Natural remedies to prevent intimate area irritation and odor chemical-free intimate wash at Home | केमिकलने होतात आजार, इंटिमेट हायजीनसाठी ७ घरगुती हर्बल वॉश, नाजूक जागेची आग आणि दुर्गंधी टाळा

केमिकलने होतात आजार, इंटिमेट हायजीनसाठी ७ घरगुती हर्बल वॉश, नाजूक जागेची आग आणि दुर्गंधी टाळा

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराच्या बाह्य स्वच्छतेकडे खूप लक्ष देतो, परंतु इंटिमेट हायजीन किंवा अंतर्गत स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष होते. बाजारात मिळणारे बहुतांश इंटिमेट वॉश सुगंधी असले तरी त्यात केमिकल्स असतात.(Gentle and effective herbal intimate care tips) या केमिकल्समुळे आपल्या त्वचेचा नैसर्गिक पीएच समतोल बिघडू शकतो. ज्यामुळे खाज, जळजळ, पांढरे पाणी जाणे किंवा दुर्गंधी यांसारख्या समस्या उद्भवतात. ( How to maintain intimate pH balance naturally)
स्त्रियांच्या नाजूक त्वचेसाठी निसर्गाने आपल्याला अनेक प्रभावी औषधी वनस्पती दिल्या आहेत. या नैसर्गिक घटकांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे इन्फेक्शनपासून संरक्षण करतात. केमिकल्सला बाय-बाय म्हणून घरच्या घरी हर्बल वॉश बनवणे केवळ सुरक्षितच नाही, तर ते अत्यंत किफायतशीर देखील आहे.(intimate hygiene care) जेव्हा आपण नैसर्गिक घटकांचा वापर करतो, तेव्हा त्वचेला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही आणि आरोग्यही जपले जाते. आपण अशाच ७ प्रभावी हर्बल वॉशबद्दल पाहूया. जे आपल्याला दिवसभर फ्रेश आणि सुरक्षित ठेवतील.

२ कप चहासाठी दूध आणि पाण्याचे प्रमाण किती? अस्सल टपरी स्टाईल फक्कड चहाची सिक्रेट ट्रिक

न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्या मते इंटिमेट केअर ही फक्त गरज नसून त्याची आपण नियमितपणे काळजी घ्यायला हवी. स्वयंपाकघरातील काही घटक वापरुन आपण हा वॉश तयार करु शकतो. यात कोणतेही केमिकल्स नसल्यामुळे ते त्वचेसाठी अत्यंत सौम्य असतात. हा हर्बल वॉश कसा बनवायचा पाहूया. 

साहित्य 

कडुनिंबाची पाने
तुळशीची पाने
हळद
जिरे 
पाणी

कृती 

1. एका पातेल्यात पाणी घेऊन ते चांगले उकळून घ्या. उकळत्या पाण्यात कडुनिंब, तुळस, हळद आणि जिरे घाला. सर्व घटकांचा अर्क पाण्यात नीट उतरल्यानंतर काही मिनिटे चांगले उकळा. पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर गाळून घ्या. 

2. या हर्बल वॉशने इंटिमेट एरिया स्वच्छ करा. दिवसातून एकदा याचा वापर करु शकता. वापरल्यानंतर साध्या स्वच्छ पाण्याने तो भाग स्वच्छ करा. 

फायदे 

1. या वॉशमध्ये नैसर्गिक घटक असल्यामुळे संवेदनशील त्वचेसाठी फायदेशीर आहे. इंटिमेट एरियाची त्वचा अतिशय नाजूक असते. हर्बल वॉश या त्वचेवर सौम्यपणे काम करते, ज्यामुळे जळजळ किंवा कोरडेपणा येण्याची शक्यता कमी होते. 

2. कडुनिंब आणि हळद यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात. यामुळे दुर्गंधी, खाज आणि सौम्य जळजळ यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. 

 


Web Title : हर्बल इंटिमेट वॉश: इन 7 उपायों से संक्रमण और दुर्गंध से बचें

Web Summary : रासायनिक आधारित इंटिमेट वॉश प्राकृतिक पीएच संतुलन को बिगाड़ते हैं, जिससे जलन होती है। यह लेख नीम, तुलसी, हल्दी और जीरे के साथ घर का बना हर्बल वॉश का उपयोग करने का सुझाव देता है ताकि अंतरंग स्वच्छता बनाए रखने, संक्रमण को रोकने और गंध को खत्म करने के लिए एक सुरक्षित, प्रभावी और किफायती समाधान हो।

Web Title : Herbal Intimate Washes: Avoid Infections & Odor with These 7 Remedies

Web Summary : Chemical-based intimate washes disrupt natural pH balance, causing irritation. This article suggests using homemade herbal washes with neem, tulsi, turmeric, and cumin for a safe, effective, and affordable solution to maintain intimate hygiene, prevent infections, and eliminate odor.