Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पित्त वाढल्यावर शरीर देते ५ सिग्नल, आहारात करा साधे बदल - औषध न घेता पित्त होईल कमी

पित्त वाढल्यावर शरीर देते ५ सिग्नल, आहारात करा साधे बदल - औषध न घेता पित्त होईल कमी

Diet for pitta dosha in Marathi: How to cure acidity without medicine: शरीरातील पित्त वाढल्यावर काय करावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2026 13:06 IST2026-04-23T13:06:19+5:302026-04-23T13:06:53+5:30

Diet for pitta dosha in Marathi: How to cure acidity without medicine: शरीरातील पित्त वाढल्यावर काय करावं?

Symptoms of high pitta in body How to reduce pitta naturally at Home Ayurvedic remedies for acidity and nausea Pitta imbalance signs and symptoms | पित्त वाढल्यावर शरीर देते ५ सिग्नल, आहारात करा साधे बदल - औषध न घेता पित्त होईल कमी

पित्त वाढल्यावर शरीर देते ५ सिग्नल, आहारात करा साधे बदल - औषध न घेता पित्त होईल कमी

आयुर्वेदानुसार आपले शरीर वात, पित्त आणि कफ या तीन दोषांवर संतुलित असते. यांपैकी पित्त हे शरीरातील पचन आणि चयापचय क्रियेसाठी जबाबदार असते. बदलेली जीवनशैली, वेळेवर न जेवणे, अति तिखट-मसालेदार पदार्थांचे सेवन आणि वाढता मानसिक ताण यामुळे शरीरातील पित्ताचे प्रमाण बिघडते.(Diet for pitta dosha in Marathi) पण जेव्हा पित्त मर्यादेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा फक्त छातीत जळजळच होत नाही, तर त्याचे परिणाम आपल्या त्वचेपासून ते मानसिक आरोग्यापर्यंत दिसू लागतात.(How to cure acidity without medicine)
अनेकजण पित्त झाले की लगेच अँटासिड किंवा पित्ताच्या गोळ्या घेतात. या गोळ्यांमुळे तात्पुरता आराम मिळत असला तरी पित्ताची समस्या मुळापासून संपत नाही.(Foods to balance pitta dosha) सतत औषधे घेतल्याने शरीराची नैसर्गिक पचनप्रक्रिया मंदावू शकते. शरीराने दिलेले सुरुवातीचे संकेत ओळखून जर आपण आपल्या रोजच्या आहारात आणि सवयींमध्ये छोटे पण महत्त्वाचे बदल केले, तर कोणत्याही औषधाशिवाय आपण सहज पित्ताचा त्रास कमी करु शकतो. शरीरात कोणते बदल होतात पाहूया. 

१४ तास उपाशी आणि ३५ वर्षांपासून सकाळची एक सवय! दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्या 'एव्हरग्रीन' फिटनेसचं रहस्य- पाहा डाएट प्लान

पित्त वाढल्यावर शरीरात दिसणारे बदल 

1. सतत मळमळ होणे, छातीत आणि घशात जळजळ होणे आणि आंबट ढेकरे येणे ही पित्त वाढल्याची लक्षणे आहेत. कधीकधी पोट फुगल्यासारखे वाटते आणि भूक मंदावते. 

2. पित्त रक्तामध्ये मिसळल्यावर त्वचेवर लाल पुरळ येतात,खाज सुटते किंवा उष्णतेमुळे पिंपल्स येण्याच्या समस्या उद्भवतात. 

3. हातापायांच्या तळव्यांची आग होणे, खूप घाम येणे आणि सतत तहान लागणे हे पित्त वाढल्याचे लक्षण आहे. पित्त वाढल्यावर चिडचिड होणे, डोकेदुखी आणि मानसिक अस्वस्थता जाणवू लागते. 

4. सकाळी उठल्यावर तोंडाची चव बदलते. तोंडाची चव कडवट किंवा आंबट लागत असेल हे वाढलेल्या पित्ताचे संकेत आहेत.

आहारात कोणते बदल करावे? 

1. पित्त वाढल्यामुळे पोटात जळजळ होत असेल तर अर्धा कप थंड दूध प्या. ज्यामुळे पोटातील अॅसिडीटी लगेच न्यूट्रलाईज होते. 

2. आवळा हा पित्तावरचा सगळ्या मोठा शत्रू आहे. आपण आवळा कॅन्डी, ज्यूस किंवा चूर्ण घेऊ शकतो. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पित्त नैसर्गिकरित्या बाहेर पडते. 

3. रात्री मूठभर काळे मनुके पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे. जिरे थोडे गरम करुन पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने पोट शांत राहते. 

4. आहारात गाईच्या शु्द्ध तुपाचा वापर करा. तूप पित्तशामक असते. तसेच नारळ पाणी शरीरातील उष्णता शोषून घेते. जेवताना खूप पाणी पिऊ नका. जेवणाआधी अर्धा तास आणि जेवणानंतर पाऊण तासाने पाणी प्या. 

5. वाढलेले पित्त नियंत्रित ठेवण्यासाठी , तुम्ही तुमच्या आहारात काळे मनुके, बडीशेप आणि लिंबू यांचा समावेश करू शकता. रात्री काळे मनुके आणि बडीशेप पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर ते चावून खा. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने देखील आराम मिळतो. 

 

Web Title : एसिडिटी को प्राकृतिक रूप से नियंत्रित करें: 5 संकेत और सरल आहार परिवर्तन

Web Summary : एसिडिटी के संकेतों को जल्दी पहचानें। दूध, आंवला, किशमिश और घी जैसे शीतल खाद्य पदार्थों से अपने आहार को समायोजित करें। दवा के बिना पित्त को संतुलित करने के लिए देर से भोजन और मसालों से बचें।

Web Title : Control acidity naturally: 5 signals and simple dietary changes.

Web Summary : Recognize acidity signals early. Adjust your diet with cooling foods like milk, amla, raisins, and ghee. Avoid late meals and spices to balance Pitta without medication.