Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत अशक्तपणा-डोकंही दुखतं? मॅग्नेशियमच्या औषधांसोबत खा ‘हे’ पदार्थ, सुधारेल तब्येत

सतत अशक्तपणा-डोकंही दुखतं? मॅग्नेशियमच्या औषधांसोबत खा ‘हे’ पदार्थ, सुधारेल तब्येत

Foods For Magnesium : खाण्यापिण्यात काही पदार्थांचा बदल करून तुम्ही नैसर्गिकरित्या मॅग्नेशियमची कमतरता भरून काढू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:09 IST2026-04-30T13:48:08+5:302026-04-30T14:09:48+5:30

Foods For Magnesium : खाण्यापिण्यात काही पदार्थांचा बदल करून तुम्ही नैसर्गिकरित्या मॅग्नेशियमची कमतरता भरून काढू शकता. 

Foods For Magnesium : Foods For Magnesium Deficiency According To Dietitian | सतत अशक्तपणा-डोकंही दुखतं? मॅग्नेशियमच्या औषधांसोबत खा ‘हे’ पदार्थ, सुधारेल तब्येत

सतत अशक्तपणा-डोकंही दुखतं? मॅग्नेशियमच्या औषधांसोबत खा ‘हे’ पदार्थ, सुधारेल तब्येत

आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला बऱ्याच पोषक तत्वांची आवश्यकता असते. यापैकीच एक पोषक तत्व म्हणजे मॅग्नेशियम. हेल्थ रिपोर्ट्सनुसार मॅग्नेशियम ३०० पेक्षा जास्त शारिरीक कार्यांसाठी मदत करते. आजकाल तरूण वयापासूनच लोक मॅग्नेशियमच्या कमतरतेशी लढत आहेत.  खाण्यापिण्यात काही पदार्थांचा बदल करून तुम्ही नैसर्गिकरित्या कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकता.  (Foods For Magnesium)

 कॅल्शियमची कमतरता भासल्यास शरीरात कोणती लक्षणं दिसतात? (Magnesium Deficiency Symptoms)

प्रसिद्ध नॅच्युरोपॅथी डॉक्टर आणि रिसर्चरर्स जेनिन बॉवरिंग यांनी युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर  केला आहे. या व्हिडिओत ते सांगतात की मॅग्नेशियमच्या कमतरतेचा तुमच्या एनर्जी लेव्हलवर परिणाम होतो अशी व्यक्ती नेहमी थकलेली आणि कमकुवत असते. याशिवाय मॅग्नेशियमची कमतरता असल्यास पचनक्रिया कमी होणं, सतत पोटात गॅस तयार होणं, एसिडीटी, मसल्स क्रॅम्प जाणवतात. हात-पाय थंड पण किंवा नेहमी वेदना जाणवते. डॉक्टर सांगतात ही लक्षणं हळूहळू वाढतात आणि दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यानं तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

मॅग्नेशियम वाढवण्याचे सोपे उपाय (How To Increase Magnesium In Diet)

आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण करू शकता. हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी खाऊ शकता. नट्स किंवा सीड्स बदाम, काजू, सुर्यफुलाच्या बीयांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. राजमा, चना, मसूर डाळीत मॅग्नेशियम जास्त असते. होल ग्रेन्स जसं की ब्राऊन राईस, ओट्स क्विनोआ या मिनरल्सचे प्रमाण जास्त असते. तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता जे मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहे. केळी, एवाकॅडो खाऊ शकता. ही दोन्ही फळं पोटॅशियम, मॅग्नेशियम असतात.

रोजच्या आहारात केळी खा

हेल्थलाईननुसार केळीमध्ये उच्च पोटॅशियमसाठी ओळखले जाते.  रोज केळी खाल्ल्यानं रक्तदाब सुधारतो आणि हृदय रोग कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त मॅग्नेशियममध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी, व्हिटामीन बी६ आणि फायबर्स असतात. पिकलेली केळी, साखर, यात फायबर्स जास्त असतात. कच्ची केळी कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे रक्तातील साखर कमी होते, सूज कमी होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Web Title : कमजोरी और सिरदर्द? बेहतर स्वास्थ्य के लिए मैग्नीशियम से भरपूर खाद्य पदार्थ खाएं।

Web Summary : मैग्नीशियम की कमी से थकान, पाचन संबंधी समस्याएं और मांसपेशियों में ऐंठन होती है। हरी पत्तेदार सब्जियां, नट्स, बीज, फलियां, साबुत अनाज, डार्क चॉकलेट, केले और एवोकाडो के माध्यम से सेवन बढ़ाएं। केले रक्तचाप और हृदय स्वास्थ्य में सुधार करते हैं।

Web Title : Weakness and headaches? Eat these magnesium-rich foods for better health.

Web Summary : Magnesium deficiency causes fatigue, digestive issues, and muscle cramps. Increase intake through green leafy vegetables, nuts, seeds, legumes, whole grains, dark chocolate, bananas, and avocados. Bananas improve blood pressure and heart health.