Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोण सांगत व्हेज पदार्थांत B-12 नसतं? 5 पदार्थ न चुकता खा, भरपूर मिळेल व्हिटामीन B-12

कोण सांगत व्हेज पदार्थांत B-12 नसतं? 5 पदार्थ न चुकता खा, भरपूर मिळेल व्हिटामीन B-12

5 Veg Food For Vitamin B-12 : आठवड्यातून २ ते ३ वेळा मशरूमचे सेवन केल्यास तुम्हाला व्हिटामीन बी-१२ मिळेल. सॅलेड्स, रूपच्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 16:46 IST2026-04-22T16:23:40+5:302026-04-22T16:46:45+5:30

5 Veg Food For Vitamin B-12 : आठवड्यातून २ ते ३ वेळा मशरूमचे सेवन केल्यास तुम्हाला व्हिटामीन बी-१२ मिळेल. सॅलेड्स, रूपच्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता.

5 Veg Food For Vitamin B-12 : Which Veg Food Is Best For Vitamin B-12 | कोण सांगत व्हेज पदार्थांत B-12 नसतं? 5 पदार्थ न चुकता खा, भरपूर मिळेल व्हिटामीन B-12

कोण सांगत व्हेज पदार्थांत B-12 नसतं? 5 पदार्थ न चुकता खा, भरपूर मिळेल व्हिटामीन B-12

व्हिटामीन बी-१२ (Vitamin B-12) ज्याला कोबालामिन असंही म्हणतात. आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांपैकी हे एक आहे. व्हिटामीन बी-१२ डिएनए सिन्थेसिससाठी तसंच लाल रक्ताच्या पेशी तयार करण्यासाठी महत्वाचे असते.  लोकांचा असा समज असतो की व्हिटामीन बी-१२ मांसाहारी अन्नातून मिळते आणि जे मांसाहार करत नाही त्याच्या शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासते.  असं नसून बरेच रोजच्या खाण्यातले पदार्थ व्हिटामीन बी-१२ चा उत्तम स्त्रोत आहेत. हे पदार्थ कोणते ते पाहूया. (Which Food Is Best For Vitamin B-12)

  व्हिटामीन बी-१२ साठी कोणते व्हेज पदार्थ खावेत? (Veg Food For Vitamin B-12)

1) डेअरी उत्पादनं

दूध, दही, पनीर हे पदार्थ व्हिटामीन बी-१३ चा समृद्ध स्त्रोत आहेत. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधनानुसासर एक ग्लास दूध किंवा एक वाटी दह्याचे नियमित सेवन शरीराच्या आवश्यक गरजेनुसार व्हिटामीन बी-१२ देते. बाजारात उपलब्ध असलेल्या फोर्टिफाईड अन्नातही  व्हिटामीन बी-१२ असते. जे रक्तात व्हिटामीन्सची पातळी वाढवण्यात मदत करते. 

2) मशरूम

सामान्यत: मशरूमध्ये व्हिटामीन बी-१२ कमी प्रमाणात असते. पण काही खास प्रकारच्या मशरूममधून तुम्हाला जास्त व्हिटामीन्स मिळतात. आठवड्यातून २ ते ३ वेळा मशरूमचे सेवन केल्यास तुम्हाला व्हिटामीन बी-१२ मिळेल. सॅलेड्सच्या स्वरूपच्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता.

3) फोर्टिफाईड सोया मिल्क

फार्म इजी. इनच्या रिपोर्टनुसार  सोया मिल्कमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन बी-१२ असते. शाकाहारी लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. सोया मिल्क फक्त लॅक्टोज फ्री नसते तर यात प्रोटीन, कॅल्शिमयमचे प्रमाणही जास्त असते. फोर्टिफाईड प्लांट बेस्ड दुधाचा आहारात नक्की समावेश करा. (Ref)

4) टोफू

टोफू हा पदार्थ सोयाबीन आंबवून तयार केला जाणारा पदार्थ आहे.  जपानी पदार्थांमध्ये याचा समावेश होतो. टोफू व्हिटामीन  बी-१२ नं परीपूर्ण असतो. तुम्ही भाजी, सूपच्या स्वरूपात टोफूचा आहारात समावेश करू शकता.

5) दही

शाकाहारी लोकांसाठी दही हा व्हिटामीन बी-१२ चा उत्तम स्त्रोत आहे. एक कप दह्यात बरीच पोषक तत्व असतात. जी शरीराला २८ टक्के पोषण प्रदान करतात. शरीरात व्हिटामीन बी-१२ वाढवण्याासठी  रोज दही खाणे फायदेशीर ठरते. जर तुम्हाला आहारातून योग्य प्रमाणात व्हिटामीन बी-१३ मिळत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्हिटामीन बी-१२ साठी सप्लिमेंट्स घ्या. ज्यामुळे शरीरातील व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर होण्यास मदत होईल.

Web Title : बी-12 के शाकाहारी स्रोत: इन 5 खाद्य पदार्थों का नियमित सेवन करें।

Web Summary : डीएनए संश्लेषण और लाल रक्त कोशिका उत्पादन के लिए महत्वपूर्ण बी-12, शाकाहारी खाद्य पदार्थों में पाया जाता है। डेयरी, मशरूम, फोर्टिफाइड सोया मिल्क, टोफू और दही उत्कृष्ट स्रोत हैं। नियमित सेवन से पर्याप्त बी-12 स्तर बनाए रखने में मदद मिलती है, जो समग्र स्वास्थ्य के लिए महत्वपूर्ण है।

Web Title : Vegetarian sources of B-12: Eat these 5 foods regularly.

Web Summary : B-12, crucial for DNA synthesis and red blood cell production, is found in vegetarian foods. Dairy, mushrooms, fortified soy milk, tofu, and yogurt are excellent sources. Regular consumption helps maintain adequate B-12 levels, vital for overall health.