Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health > हिवाळ्यात किडनीच्या आजाराने त्रस्त? आयुर्वेद सांगते ‘हे’ पाणी प्यायल्यास किडनी राहते निरोगी - तज्ज्ञांचा सल्ला

हिवाळ्यात किडनीच्या आजाराने त्रस्त? आयुर्वेद सांगते ‘हे’ पाणी प्यायल्यास किडनी राहते निरोगी - तज्ज्ञांचा सल्ला

Kidney health in winter: Ayurvedic kidney care: Best water for kidney health: आयुर्वेदानुसार हिवाळ्यात योग्य प्रकारे पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2025 11:30 IST2025-12-15T11:30:21+5:302025-12-15T11:30:55+5:30

Kidney health in winter: Ayurvedic kidney care: Best water for kidney health: आयुर्वेदानुसार हिवाळ्यात योग्य प्रकारे पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे.

Best water to drink for kidney health in winter according to Ayurveda Ayurvedic remedies to keep kidneys healthy during cold season What type of water is good for kidneys in winter | हिवाळ्यात किडनीच्या आजाराने त्रस्त? आयुर्वेद सांगते ‘हे’ पाणी प्यायल्यास किडनी राहते निरोगी - तज्ज्ञांचा सल्ला

हिवाळ्यात किडनीच्या आजाराने त्रस्त? आयुर्वेद सांगते ‘हे’ पाणी प्यायल्यास किडनी राहते निरोगी - तज्ज्ञांचा सल्ला

हिवाळा सुरु झाला की वातावरणात गारवा असतो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.(Kidney health in winter) हिवाळ्यात आपल्याला आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. पण या काळात शरीरातील अंतर्गत अवयवांकडे विशेष लक्ष दिले जात नाही.(Ayurvedic kidney care) त्यातही किडनीचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं असतं. किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करते. हवामानातील गारव्यामुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो.(Best water for kidney health) आपल्याला तहान कमी लागते, पाणी कमी प्यायलं जातं ज्याचा थेट परिणाम आपल्या किडनीवर होतो. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात योग्य प्रकारे पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे. (Ayurveda tips for kidneys)

अजरख प्रिंटेंड साडीचे ५ लेटेस्ट डिझाइन्स! डेली वेअर, पार्टी - ऑफिससाठी सुंदर पर्याय, दिसाल झक्कास

आचार्य बाळकृष्ण यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट केले की हिवाळ्यात कोमट पाणी पिणे हे सगळ्यात जास्त फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार कोमट किंवा किंचित गरम पाणी पिणे हे औषधाइतकेच उपयुक्त आहे. कोमट पाणी प्यायल्याने आपल्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. 

हवामान थंड असल्यामुळे आपले शरीर सुस्तावते. थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेचा वेग देखील मंदावतो. कोमट पाणी पोटात गेल्याने पचनक्रिया सक्रिय होते. ज्यामुळे गॅस, आम्लता सारख्या समस्या कमी होतात. ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य मजबूत होते. म्हणून हिवाळ्यात कोमट पाणी प्यायला हवे. 

हिवाळ्यात आपण कमी पाणी पितो, ज्यामुळे आपल्या किडनीवर दबाव येऊ शकतो. कोमट पाणी प्यायल्याने शरीराला पुरेसे पाणी मिळते. डिहायड्रेशन्सची समस्या कमी होऊन किडनी योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. कोमट पाणी प्यायल्याने मूत्रपिंडावर परिणाम होत नाही. त्याउलट आरोग्याला मदत होते. विषारी पदार्थ शरीरातून बाहेर निघण्यास मदत होतात. रक्ताभिसरण आणि लघवीचा प्रवाह देखील सुधारतो. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होण्यास मदत होते. जास्त गरम पाणी पिऊ नका. कोमट पाणी प्यायल्याने अन्नाचे विघटन लवकर होते. ज्यामुळे अपचन, पोट जड असण्याच्या समस्या कमी होतात. रक्ताभिसरण सुरळीत होते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. सकाळच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने केल्यास विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे त्वचा, पचन आणि चयापचय यांना फायदा होतो. तसेच सर्दी- खोकल्यासारख्या आजारापासून देखील आपल्याला आराम मिळतो. 

पाणी कसं प्यावं?

1. सकाळी १ ग्लास नियमितपणे कोमट पाणी प्यायला हवं. 
2. दिवसभर थंड पाणी पिण्याऐवजी आपण कोमट पाणी प्यावं
3. जास्त गरम किंवा उकळते पाणी पिऊ नका. यामुळे तोंडाला आणि घशाला इजा पोहोचू शकते. 
4. दिवसभरात ६ ते ८ ग्लास पाणी प्या. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होईल. 
 


Web Title : सर्दियों में किडनी की समस्या? स्वस्थ किडनी के लिए आयुर्वेद का पानी पिएं।

Web Summary : आयुर्वेद सर्दियों में किडनी के स्वास्थ्य के लिए गुनगुना पानी पीने का सुझाव देता है। यह पाचन में सहायता करता है, निर्जलीकरण को रोकता है, विषाक्त पदार्थों को निकालता है और परिसंचरण में सुधार करता है, जिससे किडनी की पथरी का खतरा कम होता है। रोजाना 6-8 गिलास पिएं, सुबह एक गिलास से शुरुआत करें, लेकिन बहुत गर्म पानी से बचें।

Web Title : Winter kidney woes? Ayurveda suggests this water for healthy kidneys.

Web Summary : Ayurveda suggests drinking lukewarm water in winter for kidney health. It aids digestion, prevents dehydration, removes toxins, and improves circulation, reducing the risk of kidney stones. Drink 6-8 glasses daily, starting with one in the morning, but avoid very hot water.